फरहान अख्तरच्या ‘१२० बहादूर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मुंबई : ‘१२० बहादुर’ चित्रपटाच्या पोस्टरच्या धमाकेदार अनावरणानंतर एका दिवसातच चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘१२० बहादुर’ चा टीझर प्रदर्शित केला आहे, ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. हा टीझर प्रचंड स्केल, भावना आणि जोशपूर्ण देशभक्तीने भरलेला आहे. रितेश सिधवानी व फरहान अख्तर (एक्सेल एंटरटेनमेंट) तसेच अमित चंद्रा (ट्रिगर हैप्पी स्टुडिओज) निर्मित ‘१२० बहादुर’ हा चित्रपट २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


या टीझरमध्ये अभिनेता फरहान अख्तर हा मेजर शैतान सिंह भाटी यांच्या दमदार भूमिकेत झळकत आहेत. पहिली झलकच स्पष्टपणे दाखवते की हा चित्रपट धैर्य आणि बलिदान यांच्याशी संबंधित एक जबरदस्त युद्धपट ठरणार आहे. १९६२ च्या रेजांग ला लढाईच्या खरी शौर्यगाथेवर आधारित या कथेत, टीझरमध्ये दाखवले आहे की केवळ १२० भारतीय जवानांनी हजारो शत्रूंना सामोरे जात इतिहास घडवला. या सगळ्यातून एक प्रभावी संवाद सतत ऐकायला येतो “हम पीछे नहीं हटेंगे!” हा संवाद प्रत्येक फ्रेममध्ये चित्रपटाची खरी भावना अधोरेखित करतो.



निर्मात्यांनी आपल्या ऑफिशियल सोशल मीडिया हँडलवर टीझर शेअर करत लिहिले आहे की, फरहान अख्तर यांची ही दमदार पुनरागमनाची झलक आहे. या टीझरमध्ये ते एका गंभीर, संयमी आणि मनाला भिडणाऱ्या अंदाजात दिसत आहेत. मेजर शैतान सिंह यांच्या रूपातील त्यांचे अभिनय प्रामाणिकते आणि शांत पण प्रभावी शैलीसाठी आधीच कौतुकास पात्र ठरत आहे.

लडाख, राजस्थान आणि मुंबई येथे चित्रित करण्यात आलेला हा चित्रपट आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या स्केलवर तयार करण्यात आला आहे, जो युद्धभूमीचं वास्तव अत्यंत प्रामाणिकपणे पुन्हा जिवंत करतो. बर्फाच्छादित थरथरत्या जमिनीपासून ते युद्धभूमीच्या शांततेपर्यंत प्रत्येक फ्रेम एक गंभीरता आणि गहनता घेऊन येते.
Comments
Add Comment

मोना सिंग यांचा मोठा खुलासा: TVF च्या मालिकेमुळे करिअरची दिशा बदलली, OTT वर झाली नव्या पर्वाची सुरुवात

TVF (द व्हायरल फीव्हर) हे भारतातील सर्वात मोठ्या कंटेंट प्रोड्यूसर्सपैकी एक असून, प्रेक्षकांना सातत्याने सर्वाधिक

KGF २ च्या असिस्टंट डायरेक्टरवर कोसळला दुःखाचा डोंगर; कीर्तन नादगौडांचा साडेचार वर्षीय मुलगा अपघातात दगावला

बंगळुरू : घरात लहान मूल असताना क्षणभराचे दुर्लक्षही किती मोठी किंमत मोजायला लावू शकते, याचा हृदयद्रावक अनुभव

हाय-प्रोफाइल लग्नातही करण जोहर जेवत नाही; कारण ऐकून बसाल थक्क

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते करण जोहर आपल्या चित्रपटांसोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही

दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकातील सहावे पुष्प भेटीला

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत त्यांच्या

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर

ज्येष्ठ संगीतकार ओ. पी नय्यर यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मंत्री आशिष शेलार यांची घोषणा; गायिका उत्तरा केळकर यांना मोहम्मद रफी पुरस्कार मुंबई: हिंदीमधील अजरामर