
उत्तरकाशी: उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे सर्वत्र हाहाकार पसरला आहे. येथील धारली गावात आलेल्या अतिवृष्टीमुळे एक नाला ओसंडून वाहू लागला. ज्यांचे पाणी डोंगरावरून अतिशय वेगाने खाली वाहत आले, या पाण्यासोबत भरपूर कचरा असेच गाळ देखील वाहून आल्यामुळे लोकवस्तीची प्रचंड हानी झाली आहे. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्यामुळे अनेक घरं वाहून गेली असून, या नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर अनेकजण ढिगाऱ्यात गाडले गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
गंगोत्री धाम आणि मुखवा जवळील धारली गावात मंगळवारी अचानक झालेल्या ढगफुटीमुळे तेथील एक नाला ओसंडून वाहू लागला. या नाल्याचे पाणी डोंगरावरून सखल भागात खूप वेगाने वाहत आले, ज्यामुळे अनेक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. ही घटना अतिशय गंभीर आहे आणि त्यामुळे स्थानिक लोक चिंतेत आहेत. नाल्याच्या पाण्यासोबत कचरा आणि गाळदेखील आला आहे, ज्यामध्ये अनेक लोक गाडले जाण्याची भीती आहे. प्रभावित क्षेत्र गंगोत्री धाम जवळ आहे.
ढगफुटीनंतर नाल्यात पाणी भरून वाहू लागल्याने संपूर्ण परिसरात घबराट पसरली होती, आता परिसरात मदत आणि बचाव कार्यालय सुरुवात झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने अपघाताची पुष्टी केली आहे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'धाराली (उत्तरकाशी) परिसरात ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, जिल्हा प्रशासन आणि इतर संबंधित पथके मदत आणि बचाव कार्यासाठी युद्धपातळीवर कार्यरत आहेत.'
View this post on Instagram
लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला
धाराली गावात ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे प्रशासनाने लोकांना सतर्क राहण्याचा सल्लाही दिला आहे. प्रशासनाने सांगितले की हर्षिल परिसरातील खिर गडच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने धाराली शहरात मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस, एसडीआरएफ, महसूल, सैन्य आणि आपत्ती पथके घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत. प्रशासनाने लोकांना नदीपासून अंतर राखण्याचे आवाहन केले आहे आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ढगफुटीच्या या घटनेनंतर, गंगोत्री धामचा जिल्हा मुख्यालयाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. धारली येथे वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे बाजारपेठ आणि घरांचे बरेच नुकसान झाले आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसारख्या डोंगराळ राज्यांमध्ये सतत मुसळधार पाऊस आणि ढगफुटी होत आहेत. या अपघातांमध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले आहे.