
कंपनीच्या कामकाजातून मिळालेल्या महसूलात (Revenue from Operations) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३१% वाढ नोंदवली गेली. मागील वर्षाच्या तिमाहीत कंपनीला महसूल ६९५६.३२ कोटी होता जो वाढत या तिमाहीत ९२१६.१४ कोटी होता.कं पनीच्या बॉटम लाईन (Bottom Line) मध्ये मागील तिमाहीतील तुलनेत इयर ऑन इयर बेसिसवर ९.५% वाढले जे ३०२३.१० कोटीवर पोहोचले. कंपनीच्या ईबीटा (करपूर्व कमाईत EBITDA) मध्ये १३% वाढ झाली. ज्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेतील ४८४८ को टींच्या तुलनेत यंदा तिमाहीत ५४९५ कोटींवर कमाई गेली आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, तिच्या लॉजिस्टिकस व्यवसायात महसूल २ पटीने वाढत ११६९ कोटींवर तर मरिन व्यवसायातील महसूल २.९ पटीने वाढत इयर ऑन इयर बेसिसवर ५४१ कोटींवर पोहोचला. निकाल जाहीर होताच कंपनीच्या शेअर्समध्ये दुपारी २.१० वाजे पर्यंत २.१७% घसरण झाली असल्याने कंपनीचा समभाग १३५९.३० रुपयांवर गेला आहे.
कंपनीच्या घरगुती पोर्ट महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर १४% वाढ झाली असून आंतरराष्ट्रीय पोर्ट व्यवसायातून २२% वाढ झाली. त्यामुळे घरगुती पोर्ट महसूल ६१३७ कोटीवर व आंतरराष्ट्रीय पोर्ट महसूल ९७३ कोटीवर गेला आहे. आगामी काळात कंपनीच्या महसूलात १६ ते २२% वाढ अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे. आगामी काळात कंपनी ११ ते १२ हजार कोटींची भांडवली गुंतवणूक (Capital Expenditure) करू शकते.