सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना कडक शब्दात फटकारले. सच्चा भारतीय असं बोलणार नाही, या शब्दात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले.

राहुल गांधी म्हणाले होते की चिनी सैन्य सीमेवर भारतीय सैनिकांना मारत आहे. हे वक्तव्य भारतीय सैन्याची मानहानी करणारे आहे असा आक्षेप घेत राहुल गांधींविरुद्ध एक खटला दाखल झाला होता. याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले. जर तुम्ही खरे भारतीय असाल तर तुम्ही असे बोलू शकत नाही, असेही सर्वोच्च न्यायालय म्हणाले.

तुम्हाला जे बोलायचे होते ते संसदेत का बोलला नाही ? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना विचारला. चीनने भारतीय भूभाग ताब्यात घेतला असे म्हणता मग त्याचे पुरावे का सादर करत नाही ? असाही प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना विचारला. जेव्हा सीमेवर अशांतता असते तेव्हा दोन्ही बाजूंचे नुकसान होत असते; असेही सर्वोच्च न्यायालय म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधींच्या वतीने अभिषेक मनु संघवी वकील म्हणून उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींचे वकील म्हणून अभिषेक मनु संघवी वकील यांना फटकारले.

न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी मसीह यांच्या खंडपीठाने खटल्याला स्थगिती देऊन राहुल गांधींना दिलासा दिला. खंडपीठाने तोंडी टिप्पणीत राहुल गांधींना गंभीर आरोप करताना ठोस पुरावा सादर करण्याचा सल्ला दिला.
Comments
Add Comment

Gas Supply Changes : स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यात होणार बदल

नवी दिल्ली : स्ट्रेट ऑफ होर्मुझ भागातील वाढत्या लष्करी आणि राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने

Randhir Jaiswal : पीओजेकेतील निवडणुका दिखावा, मानवी हक्क उल्लंघन लपवण्याचा प्रयत्न- रणधीर जयस्वाल

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीर (पीओजेके) येथे घेतल्या जात असलेल्या तथाकथित विधानसभा

Narendra Modi : आसाममधील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची खासदारांसोबत आढावा बैठक

नवी दिल्ली : आसाममधील भीषण पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यातील

Uttarakhand : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार; चारधाम यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित

पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस, मालदेवतामध्ये २३३ मिमी पावसाची शक्यता देहरादून : उत्तराखंडमध्ये सक्रिय

Himachal Pradesh : भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Suneel Anand Passed Away : अभिनेते देव आनंद यांच्या मुलाचे निधन; ज्या रुग्णालयात वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, तिथेच लेकाचाही मृत्यू

लंडन : हिंदी चित्रपटसृष्टीचे सदाबहार अभिनेते दिवंगत देव आनंद (Dev Anand) यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला