पहिल्यांदाच Stock Split साठी संचालक मंडळाची परवानगी -
टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशनने पहिल्यांदाच आपल्या शेअर्सच्या एका शेअरचे दोन शेअर्समध्ये विभागणी करण्यास कंपनीच्या संचालक मंडळाने (Borad of Directors) ने मान्यता दिली आहे. १० रुपयांच्या दर्शनी मूल्यासह या शेअर्सची विभागणी होईल यावर अ धिक माहिती पुढे आली नसली तरी १० रूपयांच्या दर्शनी मूल्याच्या शेअरची १ रूपया प्रति शेअर दर्शनी मूल्याप्रमाणे विभागणी होऊ शकते. किरकोळ गुंतवणूकदारांंना अधिक तरलता (Liquidity) व किफायतशीर दरात शेअर उपलब्ध करण्यासाठी कंपनीने धो रणात्मक निर्णय घेतल्याचे आपल्या निवेदनात स्पष्ट केले. या निर्णयाला कंपनीच्या भागभांडवलधारकांची अंतिम परवानगी आवश्यक असते त्याबद्दल अद्याप निर्णय बाकी आहे. मात्र याआधीही कंपनीने २००५ साली १:२ प्रमाणात बोनस शेअर इशू केले होते. सध्या कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ३५४५७.१८ कोटी रुपये आहे.
स्टॉक स्प्लिटबाबत बोलताना टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनने त्यांच्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये (Regulatory Filing) म्हटले आहे की, स्टॉक स्प्लिटचा उद्देश त्यांचे इक्विटी शेअर्स अधिक परवडणारे बनवणे आणि कंपनीच्या मालकीमध्ये व्यापक किरकोळ सहभागा ला प्रोत्साहन देणे आहे. शेअरहोल्डर्सकडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर, कंपनी योग्य वेळी शेअर्सच्या उपविभाजनासाठी रेकॉर्ड डेट जाहीर करेल.
तिमाही निकाल जाहीर होताच कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ -
निकाल (Q1 Results) जाहीर झाल्यावरच कंपनीच्या शेअर्सने ३.८% उसळी मारली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये २.९३% वाढ झाल्याने प्रति शेअर मूल्य ६९८१ रूपयांवर पोहोचले होते.