
मोहित सोमण: सकाळच्या सत्रात सारडा एनर्जी कंपनीच्या समभगाने (Shares)बाजारात तुफान कामगिरी केली आहे. सकाळच्या सत्रात सुरूवातीलाच कंपनीच्या समभागात १९% व २०% पेक्षा अधिक वाढ झाली होती. आज दुपारी १ वाजेपर्यंत सारडा कंपनी च्या शेअर्सने १८.७८% उसळी मारली आहे. प्रामुख्याने ही वाढ कंपनीने तिमाही निकाल घोषित केल्यावर झाली. रायपूर स्थित असलेल्या कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३८६ कोटींचा निव्वळ नफा (Net Profit) या तिमाहीत मिळाल्याने कंपनीच्या शे अर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.
कंपनीने फंडामेंटलसह फायनांशियलमध्ये चांगली कामगिरी केली. गेल्या वर्षीच्या तिमाहीत १८१ कोटींच्या तुलनेत यंदा ११३% वाढ झाल्याने दरपातळी कंपनीचा निव्वळ नफा १८१ कोटीवरून ३८६ कोटीवर पोहोचला आहे. तर उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या ऑपरेशनन्समधून मिळालेल्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर ९८% वाढ झाली आहे तर हा महसूल मागील वर्षाच्या तिमाहीतील तुलनेत या तिमाहीत ६५९ कोटींवरुन १३०६ कोटींवर पोहोचला आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,कंपनीच्या ईबीटा (करपूर्व कमाई EBITDA) मध्ये मागील वर्षी तिमाहीतील १९० कोटींच्या तुलनेत १७६ टक्के वाढत ५२४ कोटींवर वाढली आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटल्यानुसार, या तिमाहीत, ऊर्जा क्षेत्र वाढीचे इंजिन म्हणून उदयास आले, ज्याने ८०० कोटी महसूल आणि ४६७ कोटी ईबीटा (EBITDA) मध्ये योगदान दिले, ज्यामुळे सारडा कंपनीला (SEML) ऊर्जा पॉवरहाऊसमध्ये रूपांतरित केले गेले आहे. याशिवाय धातू क्षेत्राने कमी प्राप्ती असूनही स्थिर कामगिरी केली आहे. त्यामध्ये स्थिर व्हॉल्यूम वाढ दर्शविली आहे जी ऑपरेशन ल लवचिकता (Operational Flexibility) दर्शवते, असे सारडा एनर्जीने पुढे म्हटले आहे.
कंपनीने दिलेल्या रेग्युलेटरी फायलिंगमधील माहितीप्रमाणे, '२१ ऑगस्ट २०२४ रोजी, ग्रुपने राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने मंजूर केलेल्या रिझोल्यूशन प्लॅन (‘आरपी’) नुसार, दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता, २०१६ (‘IBC’) च्या कॉर्पोरेट दिवाळखो री आणि निराकरण प्रक्रिया (सीआयआरपी) अंतर्गत १३ ऑगस्ट २०२४ रोजीच्या आदेशानुसार एसकेएस पॉवर जनरेशन (छत्तीसगड) लिमिटेड (‘SKS एसकेएस’) चे अधिग्रहण पूर्ण केले. एनसीएलएटीमध्ये त्यांचे अपील फेटाळल्यानंतर, आमच्या रिझोल्यूशन प्लॅ नच्या मंजुरीला माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. पुढे, आरपीनुसार, ग्रुपने १ सप्टेंबर २०२४ च्या नियुक्त तारखेपासून एसकेएसच्या संपूर्ण उपक्रमासह सर्व मालमत्ता, मालमत्ता, दायित्वे, परवाने, परवाने, गुंतवणूक इत्यादी स्वतःमध्ये एकत्रित केल्या. चालू आणि तात्काळ मागील तिमाहीच्या निकालांमध्ये एसकेएसची संख्या समाविष्ट आहे, म्हणून मागील कालावधीच्या पहिल्या तिमाहीशी तुलना करता येत नाही.'असे कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे.
सारडा कंपनीच्या निकालातील माहितीनुसार, कंपनीच्या मार्जिनमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदाही वाढ झाली आहे. मागील तिमाहीत कंपनीला २८.१ % मार्जिन होते जे या तिमाहीत ३७.८% पर्यंत पोहोचले आहे. यापूर्वी बाजार विश्लेषकांनी या शेअरला ५७० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीवर (Target Price TP) वर 'Buy'Call दिला होता. शुक्रवारी सारडा एनर्जीचे शेअर्स १.८३% ने घसरून ४३९.३ रुपयांवर बंद झाले, तर बेंचमार्क इंडेक्स निफ्टी ५० मध्ये बंद होताना ०.८२% घट झाली होती. आज मात्र शेअर्समध्ये तुफान वाढ झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार बीएसईवर गेल्या दोन आठवड्यात दररोज सरासरी २०००० शेअर्सची खरेदी-विक्री झाली, तर ५.३६ लाख शेअर्सची विक्री झाली आहे.