Monday, August 4, 2025

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: बाजार उसळले! दोन दिवसांच्या घसरणीला 'या' ट्रिगरचा 'स्पीडब्रेकर'

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: बाजार उसळले! दोन दिवसांच्या घसरणीला 'या' ट्रिगरचा 'स्पीडब्रेकर'
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाने दोन दिवसांच्या घसरणीला 'स्पीडब्रेकर' लावण्याचे काम केले आहे. आठवड्याच्या सुरुवातीचा दिवस तेजीत गेल्याने गुंतवणूकदार काही प्रमाणात का होईना आश्वस्त असतील. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स ४१८.८१ अंकाने वाढत ८१०१८.७२ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी ५० १५७.४० अंकाने वाढत २४७२२.७५ पातळीवर स्थिरावला. आज शेअर बाजारात वाढीचे संकेत सकाळच्या सत्रापूर्वीच गिफ्ट निफ्टी वाढीसह मिळाले होते. परंतु अगदी सत्र सुरूवातीस बाजारात गुं तवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला असल्याने किरकोळ घसरण झाली. तरी पुन्हा आपल्या मूळ तेजीत बाजार परतल्याने अखेरीस सकारात्मक रॅली झाली आहे.

अखेरच्या सत्रात सेन्सेक्स बँक निर्देशांक मात्र सकाळप्रमाणेच संध्याकाळीही घसरण कायम राहिली. सकाळी २४ अंकांने घसरलेला बँक सेन्सेक्स अखेरच्या सत्रात ११.२२ अंकाने घसरला व बँक निफ्टीतही सकाळची घसरण संध्याकाळपर्यंत सपाट निर्देशांकात बं द झाली. बँक निफ्टीत कुठलाही बदल झाला नाही. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.११%,०.७६% वाढ झाली आहे. तर निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.४०%,१.२७% वाढ झाली आहे. विशेषतः मिडकॅपपेक्षा बाजारातील अधिक चिंता ब्लू चिप्स व स्मॉल कॅप समभागात (Stocks) मध्ये वाढ होईल की नाही याकडे आजच्या दिवशी अधिक होती किंबहुना सकाळच्या सत्रात मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये घसरण झाली होती जी वाढल्याने बाजार आज हिरव्या रंगात बंद होण्यास मदत झाली आहे. याशिवाय संख्यात्मक दृष्ट्या ब्लू चिप्स कंपनीच्या समभागांनी बरी कामगिरी केल्याने शेअर बाजार उसण्यास मदत झाली. विशेष उल्लेख म्हणजे आज अस्थिरता निर्देशांकाने आपले रूपडे बदलल्याने आज खरा 'लेवरेज' किरकोळ गुंतवणूकदारांना (Retail Investors) ला मिळाला आहे. सकाळी वीआयएक्स अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) पातळी ४% पेक्षा अधिक पातळीने उसळला होता जी गुंतवणूकदारांसाठी धोक्याची पातळी होती मात्र अखेरच्या सत्रात अस्थिरता निर्देशांक चक्क ०.०६% पातळीने घसरला ज्या च्या लाभ बाजारात झाला.

मुख्यतः बाजारात आगामी रेपो दर (Repo Rate) निश्चितीकरणाचा 'ट्रिगर' कायम होता. ज्यामध्ये बाजारातील वातावरणात सकाळपासूनच उत्साह जाणवला.आजपासून आरबीआयच्या वित्तीय पतधोरण समितीची (RBI Monetary Policy Committee MPC) बैठक सुरू झाली. तिचा निकाल परवा ६ जुलैला स्पष्ट होईल. त्याचवेळी आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा आपला रेपो दराविषयी निर्णय जाहीर करतील. रेपो दरात कपात झाल्यास अर्थव्यवस्थेला अधिक चालना व तरलता (Liquidty) मिळू शकते अनेक अर्थत ज्ज्ञांनी देखील सेंट्रल बँक रेपो दरात किमान २५ बेसिस पूर्णांकाने कपात करेल असे म्हटले असले तरी गव्हर्नर जागतिक अस्थिरतेच्या पातळीवर आधारित काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. विशेषतः मागील बैठकीनंतर मल्होत्रा यांनी रेपो दरात ५० बेसिस पूर्णांकाने कपात करून आरबीआयच्या इतिहासातील मोठा धक्का गुंतवणूकदारांना दिला. त्यामुळेच रेपो दर ६ वरून ५.५०% गेल्याने गुंतवणूकदारांमध्ये खुशीचे वातावरण होते. अखेरच्या सत्रात आज फायनांशियल सर्व्हिसेस शेअर्समध्ये घसरण झाल्याने बाजारातील रॅली मर्यादित स्वरूपात राहिली होती. मात्र मेटल,आयटी, एनर्जी सारख्या समभागांनी उसळी घेतल्याने घसरणीचा धोका टाळता आला.

निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) यामध्ये सर्वाधिक वाढ मेटल (२.४८%), आयटी (१.६०%), पीएसयु बँक (१.२६%), खाजगी बँक (०.१३%), मिडिया (१.५१%), रिअल्टी (१.७७%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (१.१५%), मिडस्मॉल फायनां शियल सर्व्हिसेस (२.१०%) समभागात वाढ झाली आहे. तर केवळ दोन दिवस तेजीत असलेल्या एफएमसीजीत (०.१०%) झाली.आज शेअर बाजारातील बीएसईत (BSE) ४३०७ समभागापैकी २२८६ समभागात वाढ झाली असली तरी १८४७ समभागात घसरण झाली आहे. एनएसईत (NSE) मध्ये ३०९३ समभगापैकी १८३३ समभागात वाढ झाली तरी ११६८ समभागात घसरणही झाली. आज बाजारात वाढ झाली असली तरी एनएसईत ८६ शेअर्स लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.

आज दिवसभरात सोन्याचा निर्देशांकात वाढ झाली होती. जागतिक अस्थिरतेच्या तोंडावर सोन्याच्या मागणीसह डॉलरच्या निर्देशांकात वाढ झाल्याने ही वाढ कायम राहिल्याने आजही बाजारात सोन्याची वाढ कायम राहिली. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या जागतिक पा तळीवरील गोल्ड निर्देशांकात ०.३१% वाढ झाली आहे.आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाली तरी त्या तुलनेत बाजार स्थिर राहिले. डॉलरच्या तुलनेत रुपयाची ५२ पैशांनी घसरण झाली.अमेरिका सातत्याने भारताला रशियाकडून तेल खरेदी न कर ण्याचा सल्ला देत असले तरी भारताकडे रशिया शिवाय कच्चे तेल खरेदी करण्यासाठी दुसरा पर्याय तूर्तास उपलब्ध नाही. ४० ते ५०% कच्च्या तेलाची आयात भारत रशियातून करतो सुत्रांच्या माहितीनुसार,सध्या देशाला रशियन तेलाकडे दुर्लक्ष करून चालणार ना ही यासाठीच अमेरिकेला ठोकरून रशियाकडून भारत कच्चे तेल (Crude Oil) आयात करेल ज्यामुळेच देशात तेलाचे दर नियंत्रित राहू शकतात. दुसरीकडे ओपेकने तेलाचे उत्पादन वाढविण्यासाठी अंतरिम मंजूरी दिल्याने बाजारातील कच्च्या तेलावरील दबाव कमी झाला आहे. तरीही अमेरिकेतील अस्थिरता पुढे काय वळण घेते यावररील तेलाच्या निर्देशांकातील हालचाली व घडामोडी निश्चित होतील. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकात १.८०% घसरण व Brent Future निर्देशांकात १.६१% घसरण झाली आहे.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ सारडा एनर्जी (१९.३४%), आदित्य बिर्ला कॅपिटल (१०.७४%),नेटवेब टेक्नॉलॉजी (७.९१%), युपीएल (७.००%), एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी (६.५५%), मन्नपुरम फायनान्स (६.५३%), हिरो मोटोकॉर्प (५.०२%), एमसीएक्स (५.०३%), जे एसडब्लू एनर्जी (५.११%), टाटा स्टील (४.२८%), जेएम फायनांशियल (३.४८,%), बीएसई (३.१२%), अदानी पोर्टस (३.०१%), मदर्सन (२.८९%), श्रीराम फायनान्स (१.७४%), विप्रो (१.३६%), इंडियन हॉटेल्स (१.०३%), इन्फोसिस (०.७४%) समभागात झाली.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण थर मॅक्स (६.३४%), पीएनबी हाउसिंग (३.०७%), जेपी पॉवर वेचंर (३.४३%), आर आर केबल्स (३.१२%), आरती इंडस्ट्रीज (२.७७%), रेमंड (२.६९%),सुंदरम फायनान्स (२.३९%), झेन टेक्नॉलॉजी (२.३८%),जिलेट इंडिया (१. ५८%),रेडिको खैतान (१.४३%), बिकाजी फूडस (१.२६%), पेज इंडस्ट्रीज (१.२६%), एमआरएफ (१.११%), सिमेन्स (०.९९%), एचडीएफसी बँक (०.८८%),ओएनजीसी (०.८३%), वरूण बेवरेज (०.६४%), आयसीआयसीआय बँक (०.५७%), किर्लोस्कर ब्रदर्स (०.०५%), हिन्दुस्तान युनिलिव्हर (०.३९%) समभागात झाली.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,' धातू आणि वाहन क्षेत्रातील चांगल्या कामगिरीमुळे देशांतर्गत शेअर बाजार तेजीत राहिला. कमकुवत होत चाललेला अ मेरिकन डॉलर, मजबूत मासिक वाहन विक्री आणि आघाडीच्या वाहन उत्पादकांकडून मिळालेल्या प्रोत्साहनपर तिमाही निकालांमुळे या क्षेत्रांमध्ये गुंतवणूकदारांचा रस पुन्हा वाढण्यास मदत झाली. पहिल्या तिमाहीतील उत्पन्नाचा सारांश दर्शवितो की मागणीत वा ढ झाल्यामुळे उपभोग-केंद्रित कंपन्यांना फायदा होत आहे. दरम्यान, अमेरिकेत वाढती बेरोजगारी आणि मंदावलेली रोजगार निर्मिती यामुळे संभाव्य फेड (FED) दर कपातीची अपेक्षा बळावली आहे. तथापि, उच्च अमेरिकन शुल्कामुळे अजूनही सावधगिरी बाळ गण्याची जागा आहे.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,' जागतिक पातळीवर सातत्याने घसरण होत असतानाही, भारतीय शेअर बाजार आज स्थिर स्थितीत उघडला. निफ्टीने २४५९६ पातळीवर सत्रा ची सुरुवात केली, काही काळासाठी तो २४५५४ पातळीच्या इंट्रामॅक्स नीचांकी पातळीवर पोहोचला आणि नंतर २४७२२ पातळीच्या उच्चांकावर पोहोचला, ज्यामुळे दिवसभर सकारात्मक वातावरण राहिले. धातू, ऑटोमोबाईल्स, मीडिया, बांधकाम आणि आयटी समभागांमध्ये जोरदार वाढ झाली, ज्यामुळे वाढीकडे लक्ष असलेल्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूकदारांचा रस कायम असल्याचे दिसून आले. उलट, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा आणि वित्तीय सेवा समभागांवर विक्रीचा सौम्य दबाव होता.

जागतिक आघाडीवर, निराशाजनक अमेरिकन रोजगार आकडेवारीमुळे फेडरल रिझर्व्ह सप्टेंबरच्या बैठकीत व्याजदर कपात करण्याचा पर्याय निवडू शकते अशा अटकळांना तीव्रता मिळाली आहे. या जागतिक मॅक्रो पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांची आगामी धोर णात्मक संकेतांबद्दल संवेदनशीलता वाढली आहे. स्थानिक पातळीवर, आता लक्ष आरबीआयच्या बुधवारी होणाऱ्या धोरण घोषणेकडे लागले आहे, अशी अपेक्षा आहे की मध्यवर्ती बँक संभाव्य अमेरिकन टेरिफपासून होणारे धोके कमी करण्यासाठी आणि आर्थिक स्थिरता राखण्यासाठी दर स्थिर ठेवेल. डेरिव्हेटिव्ह्ज बाजारात, आगाऊ-घसरण गुणोत्तर तेजीचा इशारा देते. नुवामा, एबीबी, दिल्लीव्हरी, बॉश लिमिटेड आणि सुझलॉन सारख्या शेअर्समध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट वाढ दिसून आली, जी व्यापाऱ्यांमध्ये मजबूत सह भाग आणि आशावाद दर्शवते. एकंदरीत, बदलत्या देशांतर्गत आणि जागतिक संकेतांमध्ये बाजाराचा रचनात्मक प्रभाव सावध आशावाद दर्शवितो.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' शुक्रवारी कमकुवत रुपया आणि निराशाजनक अमेरिकन नॉन-फार्म पेरोल डेटामुळे सोन्याच्या किमती खूप मजबूत झाल्या आणि ७५० रूपयाने वाढून १००५५० पातळीवर पोहोचल्या. कमकुवत कामगार डेटामुळे कॉमेक्स सोन्याला पाठिंबा मिळाला, जो $३३५५ वर पोहोचला, ज्यामुळे एमसीएक्स (MCX) सोने ९८२५० पातळीच्या नीचांकी पातळीवरून झपाट्याने वर आले. टे रिफशी संबंधित चिंता आणि रुपयाच्या घसरणीने वाढीच्या गतीत भर घातली. पुढे पाहता, आगामी RBI धोरण आणि यूएस उत्पादन डेटावर लक्ष केंद्रित केले जाईल. ९८००० ते १०२५०० पातळीच्या विस्तृत श्रेणीत सोने अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे.'

आजच्या बाजारातील रुपयांच्या परिस्थितीवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' रुपयाची कमजोरी कायम राहिली. ८७.२० वर उघडल्यानंतर एका लहान अंतरानंतर ८७.६८ वर बंद झा ली. डॉलर निर्देशांकात किरकोळ मजबूती असली तरी, अमेरिकेने लादलेले २५% कर हे प्रमुख कारण राहिले आहे, ज्यामुळे रुपयावर दबाव राहिला आहे. सुरुवातीचे नफा लवकर विकले गेले, जे सतत मंदीची भावना दर्शवते. बाजार आता बुधवारी आरबीआय च्या चलनविषयक धोरणाची वाट पाहत आहेत, ज्यामुळे अस्थिरता वाढण्याची अपेक्षा आहे. नजीकच्या काळात रुपया ८७.२५ ते ८८.०० पातळीच्या श्रेणीत व्यापार करण्याची शक्यता आहे.'

आजच्या बाजारातील निफ्टीतील हालचालीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक रूपक डे म्हणाले की,'सकारात्मक सुरुवातीनंतर, निर्देशांक दिवसभर हिरव्या रंगात राहिला. तासिक चार्टवर, त्याने २१ ईएमए(Exponent ial Moving Average EMA) वर पुन्हा वर आला आहे, जो सुधारित भावना दर्शवितो. रिलेटिव स्ट्रेंथ निर्देशांक (RSI) ने पुन्हा सकारात्मक विचलन (Positive Divergence) प्रदर्शित केले आहे, जो गती सुधारण्याकडे निर्देश करतो. शिवाय दैनिक चार्टवर एक ते जीचा 'हारामी' पॅटर्न तयार झाला आहे, जो मंदीचा दर कमी होत असल्याचे दर्शवितो ज्यामुळे अल्पावधीत पुनर्प्राप्ती होऊ शकते. वरच्या टोकावर, तो २४८५०/२५००० पातळीच्या दिशेने जाऊ शकतो. खालच्या टोकावरील आधार २४६५०/२४५०० पातळीवर आहे.'

आजच्या बाजारातील विश्लेषण करताना मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्व्हिसेस वेल्थ मॅनेजमेंटचे हेड ऑफ रिसर्च सिद्धार्थ खेमका म्हणाले की,'गेल्या आठवड्यात २७२ अंकांनी घसरल्यानंतर, निफ्टी पुन्हा २४७२३ पातळीवर बंद झाला, जो १५ ७ अंकांनी (+ ०.६%) वाढला, जो चालू Q1FY26 च्या निकालांमुळे आणि ४-६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आरबीआय (RBI) चलनविषयक धोरण समिती (MPC) च्या बैठकीपूर्वी समर्थित होता. व्यापक बाजारपेठांमध्ये तेजी आली, निफ्टी मिडकॅप १०० आणि स्मॉल कॅप १०० अनुक्र मे १.४% आणि १.३% वाढले. निफ्टी एफएमसीजी (FMCG) वगळता, सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. टीव्हीएस मोटरच्या मजबूत कमाईमुळे आणि हिरो मोटोकॉर्पच्या जुलैमध्ये २१% वार्षिक वाढीमुळे निफ्टी ऑटो (+१.६%) ने वाढ नोंदवली, जी २. ३% वाढली. कमकुवत अमेरिकन डॉलरमुळे जागतिक कमोडिटी किमती वाढल्या, ज्यामुळे संपूर्ण क्षेत्रातील भावना उंचावल्या. निफ्टी मेटल (+२.५%) ने देखील चांगली कामगिरी केली. गुंतवणूकदार आता उद्या येणाऱ्या यूएस सर्व्हिसेस आणि मॅ न्युफॅक्चरिंग पीएमआयसह महत्त्वाच्या जागतिक मॅक्रो डेटाची वाट पाहत आहेत - तसेच भारती एअरटेल, अदानी पोर्ट्स, प्रेस्टिज इस्टेट्स, भारती हेक्साकॉम आणि ल्युपिन यांच्या प्रमुख कमाईचीही वाट पाहत आहेत, ज्यामुळे आरबीआयच्या धोरणात्मक निकाला पूर्वी स्टॉक-विशिष्ट कृती होण्याची शक्यता आहे.'

यामुळेच उद्याही बाजारात चढत्या बाजाराचे संकेत मिळत असले तरी निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील विशिष्ट कामगिरी, तिमाही निकाल, अस्थिरता निर्देशांक, जागतिक घडामोडी, टेरिफविषयी नवीन घडामोडी यांचा एकत्रित परिणाम उद्या बाजारातील निर्देशांकात होण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा