
मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत महा मुंबई मेट्रोने आपल्या वेगवान यशाची मुहूर्तमेढ रोवली आहे.
४ ऑगस्ट २०२५ – ही तारीख महा मुंबई मेट्रोसाठी केवळ एक आकड्यांची भर नाही, तर एक साक्ष आहे मुंबईकरांच्या विश्वासाची, त्यांच्या रोजच्या प्रवासात मेट्रोने दिलेल्या सोयीची आणि या महानगराच्या धकाधकीला दिलेल्या स्मार्ट पर्यायाची. २ एप्रिल २०२२ रोजी सुरू झालेली दहिसर ते अंधेरी पश्चिम (मेट्रो लाईन २अ) आणि दहिसर ते गुंदवली (लाईन ७) ही सेवा आता मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. या दोन मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या केवळ दररोजच्या गर्दीत नाही, तर आकड्यांच्या बाबतीतही विक्रमी ठरली आहे. पहिल्याच दिवशी १९ हजारांहून अधिक प्रवासी मेट्रोतून प्रवास करत होते. तेच आज २० कोटींवर पोहोचले आहेत. अवघ्या ९ महिन्यांत १ कोटी, २५ महिन्यांत १० कोटी, ३३ महिन्यांत १५ कोटी आणि आता ३९ महिन्यांत २० कोटी प्रवासी! हा प्रवास आकड्यांचा नाही, तर मुंबईच्या वेगाचा आणि विश्वासाचा आहे. हे यश सहज शक्य झालेलं नाही. संपूर्ण मेट्रो टीमच्या अथक प्रयत्नांमुळे, व्यवस्थापनाच्या दूरदृष्टीमुळे आणि अर्थातच, मुंबईकरांच्या अपार प्रेमामुळे हे शक्य झालं आहे. विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत, नोकरदारांपासून ते प्रवासप्रेमींपर्यंत – प्रत्येकाने मेट्रोला आपलंसं केलं. ही केवळ वाहतूक नाही; ही आहे एका शहराला त्याच्या भविष्याच्या दिशेने नेणारी चळवळ. मेट्रोने मुंबईला वेळ दिला, श्वास दिला आणि गर्दीच्या कुशीतून स्वच्छंदपणे पुढं जाण्याचा आत्मविश्वास दिला.
फेडरल बँक बनली चौथ्या क्रमांकाची खाजगी बँक 'असा' आहे निकाल
मोहित सोमण: तिमाही निकालासह फेडरल बँक खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. बँकेने आपला तिमाही निकाल ...