
प्रतिनिधी: आयकर विभागाने कर भरण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत करदात्यांना मुदतवाढ दिली आहे. तुम्ही टॅक्स भरणार आहात तर ही माहिती नक्की वाचा. सध्या तुम्ही आयकर (Income Tax) भरत असाल तर तुम्हाला जुनी कर प्रणाली व नवी कर प्रणाली असे दोन पर्याय कर भरण्यासाठी मिळतात. अर्थात तुम्हाला फायलिंग डेटपूर्वीच आयटीआर फॉर्म भरणे आवश्यक आहे. अर्थात तुम्हाला प्रश्न पडला असेल की नवी कर प्रणाली स्विकारावी का नवी? अर्थातच हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. जर तुम्हाला जुनी करप्रणाली स्विकारण्याची इच्छा असेल तर तुम्ही स्विकारू शकतात. मात्र एकदा स्विकारल्यास पुन्हा ती बदलता येत नाही. जे प्रथमदर्शनी पहिल्यांदाच कर भरणार आहेत त्यांच्यासाठी बाय डिफॉल्ट नवी करप्रणाली स्विकारावी लागेल. यासाठी तुम्हाला आयटीए १० फॉर्म भर णे अनिवार्य असेल.
परंतु तुम्हाला हा देखील प्रश्न डोळ्यासमोर असेल की नवी कर प्रणाली का जुनी करप्रणाली स्विकारावी?
तर त्याचे दोन्ही फायदे नुकसान दोन्ही करप्रणालीत आहेत. उदाहरणार्थ घरभत्ता (Housing Rent Allowance HRA), सुट्टी प्रवास भत्ता (Leave Travel Allowance LTA), आयकर कायदा 80 C, 80U अंतर्गत कपात तसेच घर अर्ज असल्यास तर तितक्या च प्रमाणात 24b अंतर्गत दिलासा या गोष्टी अंतर्भूत आहेत.
नव्या करप्रणालीत हा पर्याय उपलब्ध नाही. मात्र नव्या करप्रणालीत १२ लाख उत्पन्नावर पूर्ण टॅक्स रिबेट उपलब्ध आहे. १२ लाखापुढील उत्पन्नावर कर लागू होतो. त्यामुळे आपली गरज आपली गुंतवणूक व इतर निकषांचा विचार केल्यास तुम्हाला जुन्या अथवा नवी न करप्रणालीचा फायदा उचलता येऊ शकतो.
नव्या करप्रणालीत याशिवाय कॅपिटल गेन, घर विकल्यानंतर होणारा नफा तोटा किंवा व्यवयासिक उत्पन्न पुढील करमोजणीसाठी ग्राह्य धरले जात नाहीत त्यामुळे कर तज्ञांच्या मते, जुनी करप्रणाली ही ज्यांचे घर कर्ज असून दोन लाखांपर्यंत सवलत घ्यायची अस ल्यास, तसेच एचआरए तसेच इतर सवलत, त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
याशिवाय नव्या करप्रणालीत मात्र हे फायदे नसून बँक्रेट 80CCD 2, बँक्रेट 80CCH2 या अंतर्गत अपवाद वगळता इतर सवलत (Deductions) उपलब्ध नाही. त्यामुळे तुमचे उत्पन्न, भविष्यातील तरतूद, अंगावर असेलेले कर्जाचे ओझे, भविष्यातील तरतूद यांचा विचार करतच आपली करप्रणाली निवडावी जी भविष्यात फायदेशीर ठरू शकते. याशिवाय आपल्या कर तज्ञांचा अथवा कर सल्लागारांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी महत्वाचे ठरेल.