Monday, August 4, 2025

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर विक्रीत जुलैत 'इतकी' वाढ

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर विक्रीत जुलैत 'इतकी' वाढ
मागील महिन्याच्या तुलनेत कंपनीच्या एकूण विक्रीत २०% वाढ झाली

मुंबई: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर विक्रीत मागील जून महिन्याच्या तुलनेत या जुलैत ५१५३७८ युनिट्सची विक्री नोंदवण्यात आली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. ४६६३३१ युनिट्सची देशांतर्गत विक्री झाली असून ४९०४७ युनिट्स निर्यात करण्यात आ ल्याचे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. विशेष म्हणजे, जून२०२५ च्या तुलनेत जुलैमध्ये होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) च्या एकूण विक्रीत २०% वाढ झाली आहे असे कंपनीने आकडेवारी जाहीर करताना म्हटले.आर्थिक वर्ष २०२५-२६ (एप्रिल ते जुलै २०२५) या कालावधीत, कंपनीने एकूण १८८८२४२ युनिट्स विकल्या असून यामध्ये १६०९३०३६ युनिट्स देशांतर्गत विक्री आणि १९५२०६ युनिट्स निर्यात केल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

जुलै २०२५ मधील आकडेवारी -

कंपनीच्या निवेदनानुसार कंपनीने रस्ते सुरक्षेच्या आपल्या बांधिलकीला पुढे नेत देशभरातील १३ शहरांमध्ये जनजागृती मोहिमा राबवल्या यामध्ये सोनिपत, सांगली, कटक, हाथरस, रोहरू, उदयपूर, भावनगर, झाशी, त्रिशूर, बीड, हैदराबाद, मैसूर आणि कांठई यां चा समावेश होता. कंपनीने म्हटल्याप्रमाणे, या उपक्रमांचा मुख्य उद्देश तरुणांना जबाबदारीने वाहन चालवणे, सुरक्षित प्रवासाचे नियम आणि रस्त्यावरील शिस्त यांची माहिती देणे होता. याशिवाय, लुधियाना येथील ट्रॅफिक ट्रेनिंग पार्कच्या (TTP) नवव्या वर्धापन दि नानिमित्त HMSI ने रस्ते सुरक्षा आणि ट्रॅफिक शिस्त यावरचा आपला फोकस या निमित्ताने स्पष्ट केला.

CSR Initiatives -

सीएसआर: होंडा इंडिया फाउंडेशनने (एचआयएफ) युवक सशक्तीकरण आणि डिजिटल शिक्षणाच्या दिशेने आपली बांधिलकी अधिक मजबूत करत मिजोराममध्ये 'प्रोजेक्ट बुनियाद – आत्मनिर्भरतेचा आधार' या उपक्रमाचा पुढचा टप्पा सुरू केला. हा उपक्र म आयझॉलमधील मिजोराम युवा आयोगाच्या कार्यालयात सुरू करण्यात आला. या अंतर्गत, एचआयएफने मिजोराम युवा आयोगाच्या डिजिटल शिक्षण प्रणालीच्या सुधारणेसाठीही पाठिंबा दिला. याच उपक्रमाचा विस्तार करत एचआयएफने सिक्कीम सरकारच्या कौशल्य विकास विभागाच्या हस्तकला प्रशिक्षण व योजना संचालनालयासोबत सामंजस्य करार केला. या करारामुळे जागतिक बँकेच्या पाठिंब्याने राबवण्यात येणाऱ्या 'सिक्कीम इंस्पायर्स कार्यक्रमा'अंतर्गत सिक्कीममध्येही 'प्रोजेक्ट बुनियाद'ची सुरुवात झाली अ सून, आत्मनिर्भरतेसाठी आवश्यक मूलभूत कौशल्ये निर्माण करण्याच्या एचआयएफच्या उद्दिष्टाला अधिक बळ मिळणार आहे.

Production -

उत्पादन: कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतात एचएमएसआयने आपल्या २५ व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून दोन नव्या दुचाकींचा शुभारंभ केला आहे.सीबी१२५ हॉर्नेट आणि शाईन १०० डीएक्स (या नव्या मॉडेलसह) शहरी तरुणांसाठी तयार केलेली सीबी १२ ५ हॉर्नेट ही आधुनिक वैशिष्ट्यांनी समृद्ध असून रस्त्यावरील आकर्षक डिझाईन आणि जोशपूर्ण कामगिरी यांचा उत्तम संगम असल्याचे कंपनीने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे शाईन मालिकेची परंपरा पुढे नेत, शाईन १०० डीएक्स ही नव्या युगातील कि फायतशीरतेला (Affordable) प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांसाठी सुसज्ज स्वरूपात सादर करण्यात आली आहे. या दोन्ही दुचाकींसाठी नोंदणी सुरु झाली असून ग्राहकांना होंडाच्या नव्या तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.

Motorsports -

मोटरस्पोर्ट्स: जुलै २०२५ मध्ये जर्मनी आणि झेक प्रजासत्ताक येथे मोटो जीपी स्पर्धा पार पडली. तसेच, जपानमध्ये पार पडलेल्या २०२५ एफआयएम आशिया रोड रेसिंग अजिंक्यपदाच्या तिसऱ्या फेरीत IDEMITSU होंडा रेसिंग इंडियाच्या रायडर्सनी आपल्या कामगिरीची परंपरा कायम राखली. आशिया प्रॉडक्शन २५०सीसी वर्गात, केविन क्विंटल आणि योहान रीव्ह्स यांनी पहिल्या शर्यतीत अनुक्रमे १५व्या आणि २४व्या क्रमांकाने, तर दुसऱ्या शर्यतीत ३१व्या आणि २५व्या स्थानावर शर्यत पूर्ण केली.
Comments
Add Comment