Gold Rate Today: सलग तिसऱ्यांदा सोन्यात वाढ कायम !

मोहित सोमण: जागतिक पातळीवरील सोन्यात किरकोळ वाढ झाल्याने भारतीय बाजारपेठेतही सोन्याच्या दरात सलग तिसऱ्यांदा किरकोळ वाढ झाली आहे. विशेषतः जागतिक पातळीवरील अस्थिरतेमुळे सोन्याच्या निर्देशांकात चढउतार होत असताना जागति क सोन्याच्या निर्देशांकात सकाळीच ०.२५% वाढ झाल्याने भारतीय बाजारातही सोन्याचे दर वधारले आहेत. ' गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ५ रुपयाने, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ५ रूपये, १८ कॅरेट सो न्याच्या प्रति ग्रॅम दरात ४ रूपये वाढ झाली असल्याने सोन्याचे प्रति ग्रॅम दर प्रत्येकी २४ कॅरेटसाठी १०१४० रूपये, २२ कॅरेटसाठी ९२९५ रूपये, १८ कॅरेटसाठी ७६०५ रूपयावर पोहोचला.

संकेतस्थळावरील माहितीनुसार,२४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ५० रुपयांंनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ५० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ४० रूपये दरवाढ झाली. त्यामुळे सोन्याची प्रति तोळा किंमत अनुक्रमे २४ कॅरेट साठी १०१४०० रूपये, २२ कॅरेटसाठी ९२९५० रूपये, १८ कॅरेटसाठी ७६०५० रूपयांवर गेली आहे.आज सकाळीच जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात किरकोळ वाढ झाली होती. ती सकाळी ११ वाजेपर्यंत कायम होती.जागतिक स्तरावरील युएस गो ल्ड स्पॉट किंमतीत ०.१७% घसरण झाल्याने दरपातळी प्रति डॉलर ३३५६.९० औंसवर गेली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) यामध्ये सोन्याच्या निर्देशांकात ०.५६% वाढ झाल्याने सकाळपर्यंत सोन्याचे एमसीएक्स दर १००३१४.०० रुपयांवर गेले आहेत.

मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे सरासरी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १०१४० रूपये, २२ कॅरेटसाठी ९२९५ रूपये, १८ कॅरेटसाठी ७६०५ रूपयांवर पोहोचली आहे. इंडियन बुलियन असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, ३ तारखेच्या प्रति ग्रॅम दरात वाढ झाल्याने दर ९९०४० रूपयांवर गेले होते. हे दर विना जीएसटी अथवा इतर खर्चाविरहित असतात.

जागतिक अस्थिरतेच्या फटक्यानंतर भारतीय बाजारपेठेतही सकारात्मकता कायम आहे ती म्हणजे बाजारात नवीन एमपीसी बैठकीचा ट्रिगर मिळाल्याने गुंतवणूकदारांना आशा आहे की सोन्यात कदाचित घसरण होऊ शकेल. मात्र डॉलरच्या तुलनेत रुपयाची घस रण कायम असल्याने भारतीय सराफा बाजारात प्रत्यक्षात किती चढउतार होईल ते इतर एकत्रित कारणांमुळे ठरू शकते. बुधवारी ६ ऑगस्टला आरबीआयची वित्तीय पतधोरण समितीची बैठक (MPC) पूर्ण होणार असून आरबीआयचे गर्व्हनर संजय मल्होत्रा आ पला रेपो दरावरील निर्णय स्पष्ट करतील ज्याचा परिणाम बाजारातील तरलता (Liquidity) सह कर्जाच्या दरावर होणार आहे. जर आरबीआयने दरकपात कायम ठेवल्यास बाजारातील तरलता अधिक प्रमाणात वाढू शकते व सोन्यातील अतिरिक्त गुंतवणूकीत घट होऊ शकते. त्यामुळे बाजारात पुढील सोन्याचे दर जागतिक पातळीवरील मागणी पुरवठ्यासह आरबीआयच्या आगामी बैठकीवर निश्चित होऊ शकतात.
Comments
Add Comment

शाळेच्या व्हॅनमध्ये चालकाकडून चिमुरडीवर अत्याचार

बदलापूर : काही महिन्यांपूर्वी शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना बदलापूरमध्ये घडली होती. आता

महालक्ष्‍मी येथील उड्डाणपुलाचे काम ५५ टक्के पूर्ण

अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍याकडून स्‍थळ पाहणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महालक्ष्‍मी

अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडली आहे. जानेवारी २०२५ मध्येच ट्रम्प प्रशासनाने जागतिक

जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी तब्बल ७ हजार ६९५ अर्ज

पंचायत समितीच्या निवडणुकीतही चुरस; १ हजार ४६२ जागांसाठी १३ हजार उमेदवार रिंगणात मुंबई : महापालिका निवडणुकीचा

महापौरपदासाठी भाजपमधील केरकर,शिरवडकर,कोळी, सातम, गंभीर, तावडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग करता आरक्षित झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेना

राज ठाकरेंच्या परवानगीनेच शिवसेना आणि मनसेत युती

उबाठाचा दावा ठरला फोल; ठाकरे बंधूंच्या एकीवरही प्रश्नचिन्ह मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेत