
हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा जैन नावाच्या महिलेने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना तिचे पतीने अरुण कुमार जैन कार्यालयात असताना घडली.
'देवाला भेटण्यासाठी' उचलले धक्कादायक पाऊल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा जैन गेल्या काही दिवसांपासून खूप धार्मिक आणि आध्यात्मिक बनल्या होत्या. घटनेच्या ठिकाणी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. या नोटमध्ये पूजाने स्पष्टपणे लिहिले आहे की, त्या 'देवाला भेटण्यासाठी' स्वतःचा जीव देत आहे. तिने लिहिले आहे की, "देवाच्या जवळ जाण्यासाठी मी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने हे पाऊल उचलत आहे."
शेजाऱ्यांनीही सांगितली ही माहिती
शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, पूजा जैन गेल्या काही काळापासून ध्यान, पूजा-अर्चा आणि धार्मिक ग्रंथांमध्ये जास्त रस घेऊ लागली होती. ती अनेकदा सांसारिक जीवनातून मुक्ती मिळवण्याची आणि देवाच्या चरणी आश्रय घेण्याची इच्छा व्यक्त करत असे.
पोलिसांनी पूजा जैनचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे आणि घटनेचा तपास सुरू केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात कोणतीही कटकारस्थान किंवा मानसिक आजाराचा संशय आलेला नाही. पूजाने केवळ धार्मिक कारणांमुळे हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.