
मुंबई : विधान परिषदेच्या २०२२ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेत दोन गट झाले. हे असे का झाले एकनाथ शिंदे पक्ष नेत्यांशी न बोलता राज्याच्या बाहेर का गेले ? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.
२१ जून २०२२ ला विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन विधीमंडळाच्या बाहेर पडले. आपल्या ४० आमदारांना घेऊन ते गुवाहाटी ला गेले त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले . देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एका मुलाखतीत भाष्य केलं.
उद्धव ठाकरे हे पक्षात पडलेल्या दोन गटांसाठी आम्हाला दोष देऊ शकत नाहीत. त्यांनी तयार केलेल्या यंत्रणेमुळे पक्षात दोन गटात अंतर निर्माण झाले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंना मानणारे कट्टर शिवसैनिक. ते पक्षातून बाहेर पडलेच नसते. पण ज्यावेळी एकनाथ शिंदेंना हे समजलं की उद्धव ठाकरे आपला वापर करत आहे . आदित्य ठाकरेंना नेते म्हणून पुढे आणण्यासाठी आपले पंख कापले जात आहेत . हे शिंदेंना सहन झाले नाही .
सगळ्या बाबतीत उद्धव तडजोड करु लागले . एकनाथ शिंदेंकडे जे खातं होतं त्याच्या बैठकाही आदित्य ठाकरे घेऊ लागले होते. उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेल्याने ते हिंदुत्वाबाबत काही बोलू शकत नव्हते. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचे असे पंख कापणं सुरू केलं. त्यानंतर शिंदेंनी पक्ष सोडायचा विचार केला . उद्धव ठाकरेंनी जी व्यवस्था निर्माण केली होती त्या व्यवस्थेला एकनाथ शिंदे आणि इतर आमदार वैतागले होते.
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी एकनाथ शिंदेंना बाहेर बसवण्यात आलं होतं. तो अपमान झाला आणि एकनाथ शिंदेंनी तोच दिवस निवडला. कारण एकनाथ शिंदेंना बाहेर बसवण्यात आलं होतं. जेव्हा एकनाथ शिंदेंच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. त्यामुळे त्यांनी उठाव केल्याचं फडणवीस म्हणाले. याच रागातून शिंदे निवडणुकीनंतर ४० आमदारांसह पक्षातून बाहेर पडले.