Saturday, August 2, 2025

साप्ताहिक राशिभविष्य, ३ ऑगस्ट ९ ऑगस्ट २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ३ ऑगस्ट ९ ऑगस्ट २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ३ ऑगस्ट ९ ऑगस्ट २०२५






















































उत्पन्न वाढेल


मेष : आपल्याला कामाच्या अनेक संधी येणार आहेत. संधीचा योग्य तो फायदा घ्या. तुमच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. मिश्र ग्रहमान असणार आहे. मालमत्तेच्या व्यवहारातून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक वाद असतील, तर निकाल आपल्या बाजूने लागेल. नोकरीमध्ये पगार वाढीची शक्यता आहे. सुखात वाढ होणार आहे. आरामदायी वस्तूंवर खर्च होणार आहे. नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे. धर्म आणि अध्यात्म यामध्ये रुची घेणार आहात. भागीदारीमधील लाभ मिळणार आहे. नोकरीमध्ये अपेक्षित घटना घडेल. उत्पन्न वाढेल. व्यवसाय- धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील.


धनलाभ होण्याची शक्यता


वृषभ : हा सप्ताह आपणास चांगला आहे. आपल्या कामाचे श्रेय आपल्याला मिळणार आहे. तुमच्या कामाचा गौरव होईल. तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामांच्या जबाबदाऱ्या पार पाडणार आहात. नातेवाइकांशी चांगले संबंध असणार आहे. स्वतःच्या क्षमतेवर आपला विश्वास असणार आहे. उच्च राहणीमानाचे जीवन जगण्याची शक्यता आहे. दूरचे प्रवास होण्याची शक्यता. धार्मिक कामे होतील. आपल्या कामामध्ये फायदा होणार आहे, आपले काम चांगले होईल याकडे अधिक लक्ष देणे फायद्याचे आहे. या कालावधीत समस्या आणि काही आरोग्याचे मुद्दे समोर येतील. त्यामुळे एखाद्या वेळेला कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेकानेक मार्गानी धनलाभ होण्याची शक्यता.

आदर आणि सन्मान मिळेल


मिथुन : हा कालावधी आपल्यासाठी अनुकूल असणार आहे. आपल्याला अत्यंत सकारात्मक ऊर्जा राहणार आहे. आपण अनेक व्यक्तींशी चांगले संबंध जोडाल. यातून चांगल्या प्रकारची देवाण-घेवाण होणार आहे. हा कालावधी तुमच्या भावंडांसाठी आनंद आणि यश घेऊन येईल. आपण आपल्या घराकडे अधिक लक्ष द्या. कुटुंबातील समस्यांचे चांगल्या तऱ्हेने निवारण करा. कोणतेही लहान-मोठे निर्णय शांतचित्ताने घ्या. आर्थिक व्यवहारांबद्दल सतर्क राहा. आपली इच्छापूर्ती आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न करा. समाजाकडून आपला आदर आणि सन्मान केला जाईल. तुम्ही मित्र-मैत्रिणी प्रिय व्हाल. धनलाभाचे योग.

कारकिर्दीत प्रगती होणार आहे


कर्क : तुमच्या कारकिर्दीत प्रगती होणार आहे. तुमची काम करण्याची तयारी असणार आहे. तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. गुंतवणूक मात्र हुशारीने करा. कोणतेही लहान-मोठे निर्णय पूर्ण विचारांती घेणे गरजेचे आहे. तसेच नवीन गुंतवणूक करताना जाहिरातींना किंवा कोणाच्या गोड बोलण्याला फसू नका. सावध राहणे गरजेचे आहे. कुटुंबातील सदस्यांकडून आपणास सहकार्य मिळणार आहे. आपल्या हातून भरपूर खर्च होण्याची शक्यता आहे. तुमच्या वरिष्ठांशी आणि अधिकाऱ्यांशी सुसंवाद राहील.तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

यश मिळणार आहे


सिंह : या कालावधीमध्ये आपण आक्रमक होऊ नका. मित्रांसोबत वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या घरातले व्यवहार सुरळीत राहणार आहेत. उच्चभ्रू वर्गापासून तुम्हाला मदत मिळणार आहे. तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक यांच्याकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. जमिनीच्या व्यवहारात चांगला फायदा होईल. चांगल्या कार्यासाठी दानधर्म होईल. आपल्या मुलांना यश मिळणार आहे. सहकुटुंबासोबत धार्मिक स्थळी भेट देण्याचे योग आहेत. आपल्या हातून दानधर्म होईल.

विचारपूर्वक निर्णय घ्या


कन्या : नवीन मित्र व नाती जोडली जाणार आहेत. नव्याने व्यवसाय सुरू करण्याचे विचार असतील तर पूर्णपणे विचारपूर्वक निर्णय घ्या. आपल्या व्यापार व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पदावरील प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. आपले विचार समतोल असू द्यावेत. अध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही सक्रिय असाल. आपली बढती होण्याची अपेक्षा आहे. अचानक होणारा प्रवास आपल्यासाठी फलदायी ठरेल. उत्पन्नाचा स्त्रोत व्यवस्थित राहील. कौटुंबिक आयुष्यात आनंद असेल.

शुभवार्ता कानी येतील


तूळ : व्यापार व्यवसाय चांगले यश मिळणार आहे. ज्यामुळे तुम्हाला मोबदला आणि ओळख असे दोन्ही मिळणार आहे. आपला व्यवसाय-धंदा एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवण्यात यश मिळेल. तुमच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नात वाढ होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना नोकरीची चांगली संधी मिळू शकते किंवा पगार वाढ होऊ शकते. सोन्याची किंवा जागेची खरेदी करू शकता. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. भागीदार आणि सहकाऱ्यांकडून लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सुख मिळून मुलांकडून शुभवार्ता कानी येतील. घरातील वातावरण सुखावह राहील.

अनावश्यक खर्च टाळणे


वृश्चिक : तुमच्या समोरील आव्हानांना मात करण्यासाठी प्रयत्नशील राहा. नवीन संकल्पना तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहज पार पडतील. एकापेक्षा अनेक स्रोत उत्पन्नाचे वाढणार आहेत. पण त्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. चैनीच्या वस्तूंवर खर्च होणार आहे. अनावश्यक खर्च टाळणे आपल्या हातात आहे. आपल्या घरामध्ये धार्मिक कार्य होतील. आर्थिक बाबींचा विचार करता हा कालावधी चांगला आहे. नवीन योजना आणि प्रकल्प कार्यान्वित करण्याची शक्यता आहे. तणावाचे प्रसंग येऊ शकतात.

शैक्षणिक यश


धनु : तुमच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. अध्यात्मिक जगामध्ये जास्त रमणार आहात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळणार आहे. तुमच्या कष्टाला यश मिळणार आहे. नवीन संधी तुम्हाला मिळतील. व्यवसाय-धंद्यात नवीन करारांच्या संधी मिळतील. आर्थिक आलेख उंचावेल. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. घर किंवा कार्यक्षेत्रामध्ये होणारे बदल आपल्यासाठी चांगले असणार आहेत. तुम्ही या काळात घेतलेले निर्णय प्रगतिपथावर नेतील.

यशस्वी होणार आहात


मकर : कामाशी आणि समाजाशी संबंधित तुमची तत्त्वे व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. तुम्ही तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यास यशस्वी होणार आहात. त्यातून आपल्याला आर्थिक लाभ होणार आहे. दीर्घ काळ रखडलेले स्थायी संपत्ती अथवा जमीन, जंगले यांचे व्यवहार गतिमान होऊन मार्गी लागतील. त्यातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चित वाढणार आहे. आपल्यामध्ये आत्मविश्वास भरपूर असणार आहे. महत्त्वाची कामे करताना नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मक राहणे कधीही चांगले. नवीन नातेसंबंध जास्त वाढणार नाही. काही वाद होण्याची शक्यता आहे.

प्रयत्नांना यश मिळेल


कुंभ : तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. आपल्या कामात अडचणी आल्या तरी त्यावर व्यवस्थित मात होईल. तुम्ही शत्रूचा पराजय करण्यास यशस्वी होणार आहात. आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर व व्यवहार कुशलतेने आपल्या शत्रूंवर विजय मिळवाल. मात्र आपल्या बोलण्यावर व वागणुकीवर नियंत्रण हवे. नोकरीमध्ये चांगला कालावधी आहे. कायदेशीर बाबींमध्ये यशदायी कालावधी आहे. आपल्या विचारांमध्ये विश्वास असल्याने कामे सुरळीत होणार आहेत. बढती मिळण्याची शक्यता आहे. प्रवास होण्याची शक्यता. भावंडांकडून आणि जोडीदाराकडून सहकार्य मिळणार आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या तक्रारी असू शकतात.

सहकार्य मिळणार आहे


मीन : आताचा काळ आपल्यासाठी समृद्धीचा काळ असणार आहे. या कालावधीचा पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न करा. कुटुंबाकडून आपल्याला सहकार्य मिळेल. भौतिक सुखसुविधा वाढविण्यासाठी आपण खर्च कराल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. नोकरीमधील उत्पन्न वाढेल. तुमची प्रगती निश्चित आहे. उद्योग-व्यवसायात आपल्याला यश मिळणार आहे. नोकरीमध्ये पण आपणास अनुकूल कालावधी आहे. अचानक प्रवासाची शक्यता आहे. प्रवास कार्य सिद्ध राहतील. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी येऊ शकतात. आपण काही भौतिक सुखाच्या वस्तू खरेदी कराल.

Comments
Add Comment