
मुंबई: 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' या चित्रपटासाठी राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तब्बल ३० वर्षाच्या अथक परिश्रमानंतर तिला हा सन्मान मिळाल्यामुळे, मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन तिने बाप्पांचा आशीर्वाद घेतला. ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राणी मुखर्जीचे हे फोटो सिद्धिविनायक मंदिराच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत.
सिद्धिविनायक मंदिराच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोवर राणी मुखर्जीचे चाहते तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करताना दिसून येत आहेत. राणी मुखर्जीचा 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिने देबिका चॅटर्जीची भूमिका साकारली होती. राणीचा हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे.
View this post on Instagram
राणी मुखर्जीच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'राजा की आयेगी बारात' या चित्रपटापासून झाली. त्यानंतर 'गुलाम', 'कुछ कुछ होता है', 'हम तुम', 'बंटी और बबली', 'कभी अलविदा ना कहना', 'तलाश' आणि 'हिचकी' असे अनेक सुपरहिट चित्रपट तिने केले. राणी लवकरच 'मर्दानी ३' मध्ये दिसणार आहे.