पाकिस्तानात ५.१ रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये रविवारी (३ ऑगस्ट) भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. पाकिस्तानच्या नॅशनल सिस्मिक मॉनिटरिंग सेंटर (एनएसएमसी) नुसार या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केलवर नोंदवली गेली. हे झटके शनिवारी व रविवारीच्या दरम्यान मध्यरात्री १२:१० वाजता जाणवले.

पाकिस्तानच्या नॅशनल सिस्मिक मॉनिटरिंग सेंटर नुसार, या भूकंपाचे केंद्र रावतपासून १५ किमी दक्षिण-पूर्वेला होते आणि त्याची खोली केवळ १० किमी होती. भूकंपाचा प्रभाव खैबर पख्तूनख्वा, इस्लामाबाद, रावळपिंडी आणि आसपासच्या अनेक भागांमध्ये जाणवला गेला. इस्लामाबाद आणि रावळपिंडीसोबतच मर्दान, मुर्री, हरिपूर, चकवाल, ताला गंग आणि कलर कहारपर्यंत हे झटके जाणवले गेले.

यापूर्वी शनिवारीदेखील ५.४ तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्याचे केंद्र अफगाणिस्तानमधील हिंदुकुश पर्वतीय भागात होते. एनएसएमसीने सांगितले की , त्या भूकंपाचे झटके पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानच्या अनेक भागांमध्ये जाणवले गेले. खैबर पख्तूनख्वा भागात शनिवारी(दि.२) जे झटके जाणवले, ते पेशावर, स्वात, मलकंद, नौशेरा, चारसद्दा, करक, दीर, मर्दान, मोहम्मद, शांगला, हंगू, स्वाबी, हरिपूर आणि एबटाबाद या भागांमध्ये होते. त्याचप्रमाणे, इस्लामाबाद, रावळपिंडी, लाहोर, अटॉक, टेक्सिला, मुर्री, सियालकोट, गुजरांवाला, गुजरात, शेखुपुरा, फिरोजवाला आणि मुरिदके या भागांमध्येही हे झटके जाणवले.

आत्तापर्यंत या दोन्ही भूकंपांमुळे कोणतीही जीवित वा मालमत्तेची हानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. मात्र लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Comments
Add Comment

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना

अमेरिकेतील नोकऱ्यांवर टांगती तलवार

एच१बी व्हिसाच्या नव्या नियमांमुळे शेकडो नागरिक अडकले भारतातच वॉशिग्टन : अमेरिकेत नोकरी करणारे शेकडो भारतीय एच१

बांगलादेशात रक्तरंजित राजकीय संघर्ष

आणखी एका हसीनाविरोधी नेत्याला घरात घुसून घातल्या गोळ्या बांग्लादेश : बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आणखी एका

बांगलादेशमध्ये उस्मान हादी पाठोपाठ मोहम्मद मोतालेब शिकदारची हत्या

ढाका : बांगलादेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील हंगामी

दक्षिण आफ्रिकेत गोळीबारात १० जण ठार

जोहान्सबर्ग : ऑस्ट्रेलियामध्ये बाँडी बीचवर बेछूट गोळीबार करण्याची घटना ताजी असतानाच आता दक्षिण आफ्रिकेतील

बांगलादेशातील चितगावमधील भारतीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली (प्रतिनिधी): बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने