Saturday, August 2, 2025

स्वच्छतेचे महत्त्व सांगणारा ‘विराट’

स्वच्छतेचे महत्त्व सांगणारा ‘विराट’

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल 


‘अवकारिका’ या मराठी चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावणारा व दक्षिणात्य चित्रपटात देखील आपल्या अभिनयाची पताका फडकवत ठेवणारा अभिनेता म्हणजे विराट मडके. विराटचा जन्म जरी मुंबईत झाला, तरी त्याचं बालपण, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरात झालं. इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत त्याचे शिक्षण छत्रपती शाहू विद्यालयात झाले. प्रत्येक वर्षी शाळेच्या स्नेहसंमेलनात त्याचा सहभाग असायचा. इयत्ता पाचवीला आंतरशालेय कार्निवल होत असे. त्यामध्ये विराटचा सहभाग असायचा. विराटला एन. सी. सी. मध्ये ए ग्रेड मिळालेला आहे. पुण्याच्या एम. आय. टी. मधून त्याने इंजिनीअरिंग केले, नंतर एम.बी.ए. केले. पुण्यात अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडेशी भेट झाली. ‘संगीत नवा बकरा’ या त्याच्या प्रायोगिक नाटकाला बेस्ट अँक्टरचा पुरस्कार मिळाला. नाटकाला पुरुषोत्तम करंडक मिळाला. हा त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरला.


दिग्दर्शक सुजय डहाकेनी विराटला ‘केसरी’ चित्रपटात काम दिले, परंतु लॉकडाऊन लागल्याने तो चित्रपट काही रिलीज झाला नाही. नंतर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तो चित्रपट रिलीज झाला. अखेर त्याचा अभिनय प्रेक्षकांनी पाहिला. नंतर मकरंद मानेचा ‘सोयरिक’ चित्रपट त्याने केला. नंतर भार्गवी, राजे शिवाजी, वीर दौडले सात व एक दक्षिणात्य चित्रपट, जो मराठी भाषेत व इतर तीन दक्षिणात्य भाषेत तो डब केला आहे. हा चित्रपट त्याने केला आहे. सत्या नावाची व्यक्तिरेखा त्याने साकारली आहे. त्या चित्रपटात स्वच्छता दूताची भूमिका त्याने साकारली आहे. स्वच्छतादूत हा कष्टकरी वर्ग अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत कष्ट उपसत असतात. या लोकांच्या संघर्षाकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यांच्या जीवनात आर्थिक सुरक्षितता, सामाजिक कलह, आरोग्य समस्या अशा अनेक आव्हानाचा डोंगर उभा ठाकलेला आहे. या गोष्टीकडे लक्ष वेधून सत्या नावाच्या सफाई कामगाराची कथा या चित्रपटामध्ये दाखविण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशनकडून या चित्रपटाला पाठिंबा मिळाला आहे. त्याचा लोगो देखील चित्रपटात पाहू शकतो. अरविंद भोसले यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कोणत्याही आर्थिक फायद्यासाठी, प्रसिद्धीसाठी त्यांनी हा चित्रपट केलेला नाही, केवळ या विषयाची त्यांची तळमळ होती, म्हणून त्यांनी हा चित्रपट केला. स्वच्छता कामगार जिथे काम करतो, तिथे आपण एक मिनीट थांबू शकत नाही; परंतु ते कोणत्याही रोगाची पर्वा न करता काम करीत असतात. विराटने या चित्रपटाच्या शूटिंगच्या अगोदर स्वच्छतादूतासोबत काही काळ घालवला होता.


आपण अनावश्यक कचरा टाळला तर त्यांच्यावरील कामाचा बोजा नक्कीच कमी होईल. त्यांचा आदर राखला गेला पाहिजे. या चित्रपटामध्ये तीन गाणी आहेत. पहिलं गाण आहे ते मुलगी व वडील यांच्या नातेसंबंधावर आहे. ते गाणं सुनिधी चौहानने गायले आहे. दुसरे गाणे कचरा कामगारांची व्यथा सांगणार गाणं आहे. तिसरं गाणं स्वच्छतेवर आधारित आहे ते, कैलास खैर याने गायले आहे.
त्याचा दक्षिण भाषेतील व मराठी भाषेतील एक चित्रपट येतोय त्यामध्ये त्याची नक्षलवाद्यांची भूमिका आहे. विराटला त्याच्या दोन्ही चित्रपटांसाठी हार्दिक शुभेच्छा!

Comments
Add Comment