
मुंबईहून कोलकाताला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइट 6E-138 मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रवाशाने अचानक फ्लाइटमधील दुसऱ्या प्रवाशाला चापट मारली. त्यावेळी पीडित प्रवाशाला पॅनिक अटॅक आला होता. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
समाज पूरी तरह सड़ चूका है pic.twitter.com/l03axtIqSc
— Adil siddiqui (azmi) (@adilsiddiqui7) August 1, 2025
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, पॅनिक अटॅक आलेल्या प्रवाशाला एअर होस्टेस मदत करत होती. त्याच वेळी दुसऱ्या प्रवाशाने कोणत्याही चिथावणीशिवाय तिथे येत त्याला जोरदार चापट मारली. या घटनेनंतर, विमानातील दुसऱ्या एका प्रवाशाने आरोपीला वारंवार विचारले की त्याने असे का केले? ज्यावर आरोपीने उत्तर दिले की मला या गोष्टीचा त्रास होत आहे. मात्र, त्यानंतर दुसऱ्या एका प्रवाशाने सांगितले की तुम्हाला कोणावरही हात उचलण्याचा अधिकार नाही.
विमानातील सहप्रवाशाला चापट मारणाऱ्या आरोपीचे नाव हाफिजुल रहमान असे आहे. विमान कोलकाता येथे पोहोचताच, त्याला प्रथम सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर, त्याला विमानतळावरील एनएससीबीआय पोलिस ठाण्यात नेण्यात आले, जिथे त्याला विधाननगर पोलिसांनी अटक केली.
इंडिगो एअरलाइन्सने काय म्हटले?
We are aware of an incident involving a physical altercation on board one of our flights. Such unruly behaviour is completely unacceptable and we strongly condemn any actions that compromise the safety and dignity of our passengers and crew.
Our crew acted in accordance with…
— IndiGo (@IndiGo6E) August 1, 2025
या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, इंडिगो एअरलाइन्सने अधिकृत निवेदन जारी केले आहे आणि आरोपीच्या कृतीचा तीव्र निषेध केला आहे. इंडिगोने म्हटले आहे की आमच्या एका विमानात झालेल्या या हाणामारीच्या घटनेची माहिती आम्हाला मिळाली आहे. असे अनुशासनहीन वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि आमच्या प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला आणि प्रतिष्ठेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
विमान कंपनीने असेही म्हटले आहे की, विमान कोलकाता येथे पोहोचताच आरोपी प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले, आणि त्याला बेशिस्त घोषित करून सुरक्षा एजन्सींच्या स्वाधीन करण्यात आले. इंडिगोने सांगितले की त्यांच्या क्रू टीमने निर्धारित मानक कार्यपद्धती (एसओपी) नुसार काम केले. सध्या, सुरक्षा एजन्सींकडून या प्रकरणात पुढील कारवाई केली जात आहे.