
याशिवाय को-लोकेशन आणि डार्क फायबर अँक्सेसशी संबंधित प्रकरणांसह इतर चालू आणि मोठ्या प्रकरणांमध्ये एनएसईला अजूनही छाननीचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे त्यांच्यावरील अडचणीचे सावट कायम आहे. स्टॉक एक्सचेंजने २० जून रोजी त्या प्रकरणांमध्ये स्वतंत्र सेटलमेंट अर्ज (Settlement Application) दाखल केले आहेत आणि नियामकाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत.
आणखी काय घडले?
या प्रकरणात कंपनीच्या गोपनीय घोषणा सार्वजनिक होण्यापूर्वी त्यांच्याशी संबंधित ॲनालिटिक्सला केल्याचा माहितीचाही समावेश आहे. सेबीला असे आढळून आले की फेब्रुवारी २०२१ ते मार्च २०२२ दरम्या एनएसईने औपचारिक करार न करता संवेदनशील डेटा तृतीय-पक्ष विक्रेत्याला (Third Party Vendor) आणि त्यांच्या उपकंपनीला एनएसई डेटा अँड अँनालिटिक्स (एनडीएएल) ला देण्याची परवानगी दिली. त्यानंतर या उपकंपनीने इनसाइडर ट्रेडिंग नियमांचे उल्लंघन करून आपल्या क्लायंटना डेटा प्रसारित (Broadcast) केला.
सेटलमेंट ऑर्डरमध्ये असलेल्या माहितीप्रमाणे,एनएसईमधील सिस्टम आर्किटेक्चरमुळे एनडीएएल क्लायंटना एक्सचेंजच्या वेबसाइटवर सार्वजनिक प्रकाशनापूर्वी किंमत-संवेदनशील घोषणांचा अँक्सेस उपकंपनी (Subsidiary) ला मिळाला. यामुळे सेबीने म्हट ल्याप्रमाणे, इनसाइडर ट्रेडिंग प्रतिबंध नियम २०१५ यासह अनेक नियमांचे उल्लंघन एनएसईकडून झाले. सेबीने इतर प्रशासन समस्या अधोरेखित केल्या ज्यामध्ये,'योग्य मंजुरीशिवाय दंड माफ करण्याचा समितीचा अधिकार आणि असंबंधित संस्थात्मक गुंतवणूक दारांमधील क्लायंट कोड बदलांवर देखरेख करण्यातील त्रुटी अशा इतर समस्यांचाही आरोपपत्रात समावेश होता.