
धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने श्री तुळजाभवानी देवीच्या जिर्णोद्धार प्रक्रियेचे धार्मिकदृष्ट्या योग्य मार्गदर्शनाने व भक्तिभावाने संचालन सुरू आहे.या प्रक्रियेच्या एक महत्त्वपूर्ण टप्प्यांतर्गत दिनांक १६ जून २०२५ रोजी काशीस्थित पद्मश्री प.पू.गणेश्वर द्राविड शास्त्री व ब्रह्मवृंद,तसेच महंत,पुजारी वर्ग,सेवेकरी, कर्मचारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत "दुर्गासप्तशती संपुटीत अनुष्ठान" पार पडले होते.

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया पोस्टमुळे उसळलेल्या जातीय हिंसाचार (communal ...
या विधी दरम्यान वापरण्यात आलेली तलवार ही अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वाची समजली जाते.हिचे स्थानिक स्तरावर दैनंदिन पूजेच्या अनुषंगाने वाकोजीबुवा मठाचे मठाधिपती महंत तुकोजीबुवा गुरु बजाजीबुवा यांच्याकडे जबाबदारी सुपूर्त करण्यात आले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सदर तलवारची नित्य पूजा वाकोजीबुवा मठामध्ये करण्यात येत आहे.
दरम्यान, २ ऑगस्ट रोजी काही प्रसारमाध्यमांद्वारे ही तलवार चोरीस गेल्याची अफवा पसरविण्यात आली होती. मात्र, ती पूर्णपणे निराधार, चुकीची व दिशाभूल करणारी असल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संबंधित तलवार ही संपूर्णपणे सुस्थितीत व सुरक्षित असून, वाकोजीबुवा मठातच आहे, असे तुळजाभवानी मंदिर ट्रस्टकडून कळविण्यात आले आहे.
तलवार चोरीच्या खोट्या बातम्या पसरवून जनतेत संभ्रम निर्माण करणाऱ्या अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.