Saturday, August 2, 2025

PM Modi: मोदींचा ९.७० कोटी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय....

PM Modi: मोदींचा ९.७० कोटी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय....
विकास प्रकल्पासह शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम होणार जमा

प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या वाराणसी मतदारसंघाला भेट देत मोठी घोषणा केली. आपल्या मतदार संघात भव्य विकास कामांचे उद्घाटन करत शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला. आपल्या मतदारसंघातील नागरिकांसाठी २ १८३.४५ कोटींच्या विकासकामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले आहे. तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २० वा हप्ता (Installment) पंतप्रधानांनी घोषित केला आहे. ९.७० कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळतो.स ध्या खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा असणार आहे. कारण या काळात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेतीचे उत्पादन घेणे शक्य होते.

त्यामुळे वाढीव उत्पादनात खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना ही रक्कम मोलाची मदत करू शकते. तसेच सर्वांत अधोरेखित बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षीही आपल्या विकास कामाचा सपाटा लावून अनेक पायाभूत सुविधेचे प्रकल्प घोषित केले होते. त्याचाच पुढचा अध्याय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मतदारसंघासाठी विविध क्षेत्रातील योजनांचे उद्घाटन केले आहे ज्यात शैक्षणिक, वैद्यकीय, रस्ते निर्मिती, रोड विस्तारीकरण, क्रीडा, पिण्याचे पाणी उपलब्धता, शेती संसाधन विकास, पर्यटन, लाय ब्ररी,डॉग केअर सेंटर,इलेक्ट्रिसिटी, व इतर पायाभूत सुविधा अशा विविध योजना आणि विकास प्रकल्पाचा समावेश आहे.

भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी म्हटल्याप्रमाणे, पंतप्रधान मोदींनी रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर जनतेला दिलेली ओवाळणी असल्याचे म्हटले होते. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, त्यांचे दोन्ही उपमुख्य मंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजे श पाठक यांच्यासह अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी आणि भाजपचे राज्य युनिट अध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी उपस्थित होते.  याशिवाय पंतप्रधान मोदींनी व्हिलचेअर, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना, दिव्यांगासाठी व्हिलचेअर, व्हिज्युअल इफेक्ट्स अशा कार्यक्रमाला उपस्थित दर्शविली होती.
Comments
Add Comment