इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा त्रास होणाऱ्या एका प्रवाशाला त्याच विमानातील दुसऱ्या प्रवाशाने कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या गोंधळानंतर संबंधित तरुण बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.


ही घटना शुक्रवारी घडली. विमान मुंबई विमानतळावर उड्डाणासाठी तयार होत असताना, होसैन अहमद मजुमदार (मूळगाव – कचर, जिल्हा, आसाम) याला अचानक पॅनिक अटॅक आला. तो घाबरून रडू लागला आणि "मला विमानातून उतरू द्या" अशी जोरजोरात विनंती करू लागला. या वेळी जवळच बसलेल्या प्रवाशाने त्याला थेट थापड मारली, आणि विमानात एकच खळबळ उडाली.



व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात विमानातील इतर प्रवासी आणि कर्मचारी या धक्कादायक प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया देताना दिसतात. होसैनला नंतर सर्वांनी मिळून शांत केलं आणि त्याला सीटवर बसवलं. विमान कोलकात्याला पोहोचल्यावर मात्र होसैन अचानक गायब झाला, आणि तिथून पुढच्या फ्लाइटसाठी तो सिल्चरला रवाना झालाच नाही.



गायब कसा झाला?


होसैन मुंबईतील एका जिममध्ये नोकरी करत होता आणि गावी परतत होता. कोलकात्यात उतरल्यावर त्याने सिल्चरकडे जाणाऱ्या कनेक्टिंग फ्लाइटसाठी चेक-इन केलं नव्हतं. त्याचा फोनही स्विच ऑफ असून, सिल्चर विमानतळावर त्याच्या कुटुंबीयांनी तासन्तास वाट पाहिली, पण तो दिसला नाही.


नातेवाईक जुबेरुल इस्लाम मजुमदार यांनी स्थानिक पोलीस स्टेशन, उधरबंद (सिल्चर) येथे तक्रार केली आहे. मात्र अद्याप होसैनचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.



विमानतळ प्रशासनाने त्याला वैद्यकीय मदत दिली का?


तो विमानतळातून बाहेर गेला की ताब्यात घेतला?


पॅनिक अटॅकनंतर त्याच्यावर कोणते उपचार झाले?


इंडिगोने काय म्हटलं?


इंडिगो एअरलाईन्सने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत ही घटना दुर्दैवी आणि "अस्वीकार्य" असल्याचं म्हटलं आहे. कंपनीने संबंधित प्रवाशाला कोलकात्यात सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिल्याची माहिती दिली आहे. "प्रवाशांचे आणि कर्मचाऱ्यांचे संरक्षण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे," असं इंडिगोने स्पष्ट केलं.



आता पुढे काय?


कोलकाता आणि सिल्चर पोलिसांकडून तपास सुरू आहे. इंडिगोच्या SOP (Standard Operating Procedure) अंतर्गत कोणती कार्यवाही केली गेली आणि बेपत्ता प्रवाशाला योग्य मदत मिळाली का, यावर आता लक्ष केंद्रीत झालं आहे.


या प्रकारामुळे विमानप्रवासातील मानसिक आरोग्याची संवेदनशीलता, प्रवाशांच्या आचरणाची जबाबदारी आणि एअरलाइनच्या सुरक्षाव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव

अज्ञात वैमानिकाच्या पत्रात 'इंडिगो'वर ‘गैरव्यवस्थापन,’ आणि ‘अपमान’ केल्याचा आरोप

नवी दिल्ली : देशातील एक विमान सेवा कंपनी सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेला

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर