
मुंबई : मुंबईमधील पवईमधील IIT मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. IITमधील हॉस्टेल इमारतीवरून उडी घेऊन विद्यार्थ्याने आत्महत्या केली. रोहित सिन्हा (२६) असं या विद्यार्थीचे नाव आहे. रोहित आयआयटी मुंबईत मेटा सायन्सच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. रोहितने नैराश्यातून आयुष्य संपवल्याचे बोललं जातंय.
काय घडलं नेमकं?
IIT मुंबईमध्ये ही घटना शुक्रवारी रात्री घडली. रोहितच्या मृत्यूने आयआयटी परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. रोहित हा हॉस्टेलच्या टेरेसवरून खाली पडला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना प्राथमिक तपासात आत्महत्येची शक्यता वाटत असली, तरी अन्य कारणांचाही शोध घेतला जात आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट आढळली नाही. पोलिसांनी रोहितच्या मित्रांचे आणि हॉस्टेलमधील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक तपासणीद्वारे घटनेचा तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आयआयटी प्रशासनाने या घटनेबद्दल खेद व्यक्त केला असून, रोहितच्या कुटुंबियांना संपर्क साधण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात शुक्रवारी रात्री झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार झाला आहे, ...
प्राथमिक माहितीनुसार, रोहित सिन्हा हा विद्यार्थी IIT मुंबईमध्ये शिक्षण घेत होता. शैक्षणिक दबावामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली असून, पवई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस रोहित सिन्हाचा मोबाइल, खोलीतील कागदपत्रे आणि इतर वस्तूंची तपासणी करत आहेत. या आधीही आयआयटीमध्ये अशा प्रकारच्या अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत.पोलिसांकडून अधिकृत माहिती येणे बाकी असून, शिक्षणसंस्थेने या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर विशेष लक्ष देण्याची गरज यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.