नांदगाव मुरुड : गुप्त बातमीदारामार्फत मुरुड पोलिसांना ३१ जुलै रोजी मिळालेल्या माहितीनुसार मुरुड तालुक्यातील काशिद समुद्रकिनारी संशयास्पद प्लास्टिक गोणी सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी घटनास्थळी जात प्लास्टिक गोणींची तपासणी केली असता, त्यामध्ये चरससदृश्य अंमली पदार्थ आढळून आल्याने त्याबाबतचा पंचनामा करून या पोती जप्त करण्यात आल्या. त्याचे एकूण वजन सुमारे ११.१४८ ग्रॅम असून, एकूण किंमत ५५ लाख ७४ हजार रुपये आहे.
त्याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रतीक्षा खेतमाळीस, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दयानंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुडचे पोलीस निरीक्षक परशुराम काांबळे, पोलीस उपनिरिक्षक अविनाश पाटील यांनी केली आहे.