
त्यामुळे अडीअडचणीच्या काळात व घरातील मोठ्या कार्याला या पैशातून खिश्याला आधार मिळू शकतो. याआधी आर्थिक वर्ष २०१७ मध्ये ईपीएफओ (Employee Provident Fund Organisation EPFO) ने कंपोझिट क्लेम फॉर्म चालू केला होता ज्यामध्ये थोड्या प्रमाणात का होईना पैसे काढ ण्याची प्रक्रिया सोपी केली होती. आता मात्र विनाकारण त्रास न होता नव्या बदलांमुळे तुमचे पैसे तुमच्या गरजेला उपलब्ध असतील असे सरकारने स्पष्ट केले आहे. आता खातेधारक फक्त त्यांच्या घोषणेच्या आधारे पैसे काढू शकतात. पूर्वी, असे अनेक वेळा घडायचे की लोक बँक पासबुक किंवा चेकचे खराब दर्जाचे फोटो अपलोड करायचे, ज्यामुळे त्यांचे दावे नाकारले जात होते.
ही समस्या देखील आता दूर झाल्याने व्यवहार सोपा होऊ शकतो. मार्केट रिपोर्टनुसार, ३ एप्रिलपासून चेक किंवा पासबुकची प्रतिमा अपलोड करण्याची आवश्यकता दूर झाली आहे. यामुळे केवायसी आणि बँक खाते पडताळणीमधील समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. सरकारच्या माहितीनुसार,आतापर्यंत १.९ कोटींहून अधिक ईपीएफ खातेधारकांना या नवीन प्रक्रियेचा फायदा झाला आहे.ही संख्या २२ जुलै २०२५ पर्यंत आहे. ईपीएफओ दावे सोपे आणि विश्वासार्ह बनवण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आम्ही उचलल्याचे सरकारने संसदेत खासदाराने विचारलेल्या प्रश्नावर स्पष्ट केले आहे.
आता लोक कोणत्याही कागदपत्रांच्या त्रासाशिवाय त्यांच्या गरजेच्या वेळी पैसे काढू शकतात. हा बदल विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त आहे ज्यांना आपत्कालीन परिस्थितीत अडकले आहे आणि त्यांना त्वरित पैशांची आवश्यकता आहे. ईपीएफओचे हे पाऊल डिजिटल इंडिया आणि सरकारी प्रक्रिया सुलभ करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. जर तुम्हीही तुमच्या ईपीएफ खात्यातून पैसे काढण्याचा विचार करत असाल, तर आता तुम्ही कोणत्याही तणावाशिवाय ऑनलाइन प्रक्रिया सुरू करू शकता.