
आता प्रत्येक गावात पोहोचणार थेट इंटरनेट
नवी दिल्ली : अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांची कंपनी स्टारलिंक आता भारतात उपग्रह-आधारित इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, स्टारलिंकला भारतात सेवा सुरू करण्यासाठी एकात्मिक परवाना देण्यात आल्याची घोषणा केली आहे.
या निर्णयामुळे देशातील दुर्गम खेडी आणि शहरांमधील इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी क्रांती घडण्याची शक्यता आहे.
देशातील पहिल्या मोबाइल कॉलला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, ‘स्टारलिंकला भारतात उपग्रह इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी एकात्मिक परवाना देण्यात आला आहे.