
मुंबई: वास्तूशास्त्रानुसार, घरात पैसे कोणत्या दिशेला ठेवले जातात, याला खूप महत्त्व आहे. जर पैसे चुकीच्या दिशेला ठेवले, तर आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात आणि घरात अशांती येऊ शकते. असे मानले जाते की, ज्या घरात पैसे चुकीच्या दिशेला ठेवले जातात, तिथे देवी लक्ष्मीचा वास नसतो आणि नकारात्मक ऊर्जा पसरू लागते. वास्तू टिप्स काय सांगतात आणि कोणत्या दिशेला पैसे ठेवणे टाळावे, ते जाणून घेऊया
पैसे ठेवण्यासाठी योग्य आणि अयोग्य दिशा
१. आग्नेय दिशा- येथे पैसे ठेवणे टाळा. वास्तुशास्त्रानुसार, आग्नेय दिशेला पैसे ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. ही दिशा अग्नी तत्वाशी संबंधित आहे. या दिशेला पैसे ठेवल्यास ते खर्च होतात, टिकत नाहीत आणि व्यक्तीला आर्थिक नुकसान तसेच कर्जाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या दिशेला तिजोरी किंवा पैशाची जागा ठेवणे टाळावे.
२. पश्चिम दिशा - येथेही पैसे ठेवू नका:
पश्चिम दिशा देखील पैसे ठेवण्यासाठी अशुभ मानली जाते. या दिशेला पैसे ठेवल्याने आर्थिक अडचणी वाढू शकतात आणि उत्पन्नात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे पश्चिम दिशेत पैसे ठेवणे टाळावे.
३. उत्तर दिशा - येथे ठेवा पैसे:
वास्तूशास्त्रानुसार, पैसे ठेवण्यासाठी किंवा तिजोरी ठेवण्यासाठी उत्तर दिशा सर्वात शुभ मानली जाते. उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा मानली जाते. या दिशेला पैसे ठेवल्याने घरात धनवृद्धी होते, आर्थिक स्थिरता येते आणि समृद्धी वाढते. कुबेर देवाचा आशीर्वाद लाभल्याने घरात पैशाची कमतरता भासत नाही.
४. ईशान्य दिशा - पैसे ठेवणे टाळा:
घरातील ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर-पूर्व दिशा. या दिशेतही पैशाची जागा किंवा तिजोरी ठेवणे टाळावे. हे वास्तूदोषाला आमंत्रण देते असे मानले जाते.
वास्तुशास्त्राचे नियम पाळून पैसे योग्य दिशेला ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि धन-धान्याची कमतरता भासत नाही. तर चुकीच्या दिशेने ठेवल्यास आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.