‘बिन लग्नाची गोष्ट’, लिव्ह-इन रिलेशनशिप संकल्पनेवर आधारित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Movie Teaser: नात्यांच्या पारंपरिक चौकटींना धक्का देणारा आणि एक नव्या विचारांची झलक देणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा टीझर लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या आधुनिक संकल्पनेवर आधारित असून, नात्यांची नवीन व्याख्या मनोरंजनात्मकरित्या मांडतो.

चित्रपटाच्या टीझरमध्ये उमेश कामत आणि प्रिया बापट यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. लिव्ह-इनमध्ये राहात असलेल्या या जोडप्याच्या आयुष्यात लग्नाआधीच गरोदरपणाचे वळण येते आणि त्यात एक अनपेक्षित ट्विस्टही दिसतो. याचबरोबर गिरीश ओक आणि निवेदिता सराफ यांचे नातेही पारंपरिक चौकटींपेक्षा काहीसे वेगळे असल्याचे दिसत आहे.

दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात,“प्रेक्षकांकडून टीझरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट एक वेगळी संकल्पना घेऊन येतोय आणि त्यात नात्यांचा भावनिक प्रवास उलगडतो. उमेश आणि प्रिया यांच्या नैसर्गिक अभिनयामुळे ही कथा अधिक वास्तवदर्शी वाटते.”

निर्माते नितीन वैद्य म्हणतात, “चित्रपटाची गोष्ट हटके असली तरी ती आपलेपणाची भावना देणारी आहे. निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांसारखे अनुभवी कलाकार या कथेला अधिक भावनिक खोली प्रदान करतात. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच भावेल, असा विश्वास वाटतो.”

‘बिन लग्नाची गोष्ट’ हे चित्रपट गॉडगिफ्ट एंटरटेन्टमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स यांनी निर्मित केला असून, तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत आहे. या चित्रपटात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कथा समीर कुलकर्णी यांची असून, दिग्दर्शन आदित्य इंगळे यांचे आहे.

?si=Td-61BHjFRZrxT2T

 
Comments
Add Comment

मल्टिप्लेक्स तिकिटदर १०० ते १५० रुपये ठेवण्याची मागणी ; मंत्रालयात चित्रपट संघटनेची बैठक

मुंबई : राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांसाठी कायमस्वरूपी स्क्रीन राखून ठेवावी आणि तिकिट दर

कंगना रणौतला कोर्टाचा दिलासा, वादग्रस्त प्रकरणातून जामीन मंजूर

मुंबई : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत हिला वादग्रस्त ट्वीट प्रकरणी कोर्टानं दिलासा दिला आहे. देशात

ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर ‘कांतारा- चैप्टर 1’ या तारखेला दिसणार ओटीटीवर!

मुंबई : ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कांतारा- चैप्टर 1’ आता लवकरच ओटीटीवर येणार आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये

'ह्युमन कोकेन' हिंदी सायकॉलॉजिकल थ्रिलर लवकरच होणार रिलीज ! पुष्कर जोगचा नवा प्रयोग

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीत क्वचित पाहिलेलं, वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषा मिटवणारं जग आता पडद्यावर येणार

'जामतारा २' फेम सचिन चांदवडेची २५ व्या वर्षी आत्महत्या, 'असुरवन'च्या प्रदर्शनापूर्वीच संपवली जीवनयात्रा

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेता सचिन चांदवडे (Sachin Chandavade) याने २५ व्या

'I popstar' मधून व्हायरल झालेली राधिका भिडे नक्की आहे तरी कोण ?

मुंबई : ओटीटी विश्वातील 'I popstar' या कार्यक्रमाचा प्रोमो झळकला आणि लक्ष वेधून घेतलं ते गोड आवाजाच्या गोड दिसणाऱ्या