
आज अखेरच्या सत्रात मोठ्या प्रमाणात बाजारातील पडझड कायम राहिली आहे. ट्रम्प यांच्या २५% टेरिफनंतर भारताने संयमाने प्रतिकिया देत आम्ही यावर नक्की याचा काय परिणाम देशावर होईल याचा अभ्यास करून मत मांडू असे म्हटले होते याशिवाय देश हिताशिवाय कुठलीही व्यापारी तडजोड शक्य नाही असेही संकेत सरकारने विशेषतः पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने दिले होते. मात्र गुंतवणूकदारांना आता पुढे काय? या प्रश्नाने वादळ निर्माण केले असल्याने आजही बाजारात नुकसान झाले.वि शेषतः मिड व स्मॉलकॅपमध्ये आज मोठे नुकसान झाल्याने मोठ्या प्रमाणात किरकोळ गुंतवणूकदारांना याचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरवर ईडीने मोठे छापे टाकल्यानंतर आता रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडून यासंबंधीचे स्पष्टीकरण दिले गेले आहे. त्यांच्या मते त्यांना आपले म्हणणे सांगण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही याशिवाय कंपनीचा निधी ६५०० कोटींचा असताना १००० ० कोटींचा आरोप केवळ बातम्या हे सनसनाटी निर्माण करण्यासाठी केले गेले असल्याचा दावा कंपनीने केला. याशिवाय इंडस ईंड बँकेच्या इनसायडर ट्रेडिंग प्रकरणी सेबीने कारवाई तेज केल्याने बाजारातील वातावरण संधूक असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय जा गतिक पातळीवरील शेअर बाजारातही अमेरिका रशिया व अमेरिका शीतयुद्ध व जग यांच्यातील टेरिफ वाढीची रस्सीखेच यांचा प्रभावही बाजारात कायम होता. याशिवाय आजही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात रोख गुंतवणूक काढल्याच्या शक्यतेनेही बाजारात परिणाम झाला.आज जाहीर झालेले तिमाही निकालही समाधानकारक पातळीवर नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फार्मा शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने बाजार सकारात्मक पद्धतीने आज उभाच राहू शकला नाही. फार्माशिवाय आयटी,फा यनांशियल सर्व्हिसेस,हेल्थकेअर, तेल व गॅस समभागात घसरण कायम राहिल्याने व विशेषत या निफ्टी क्षेत्रीय विशेष मिडस्मॉल कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने त्याचा परिणाम निर्देशांकात परावर्तित झाला.
काल सकाळच्या सत्रात झालेली घसरण अखेरच्या सत्रात अर्ध्याहून अधिक प्रमाणात सावरली होती तोच कित्ता आज मात्र बाजाराने गिरवला नाही. गुरुवारी अमेरिकन बाजार घसरणीसह बंद झाले. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी ३३०.३० अंकांनी (०.७४%) घस रून ४४१३०.९८ पातळीवर बंद झाली. एस अँड पी ५०० २३.५१ अंकांनी (०.३७%) घसरून ६३३९.३९ वर बंद झाला, तर नॅस्डॅक कंपोझिट ७.२३ अंकांनी (०.०३%) घसरून २११२२.४५ पातळीवर बंद झाला होता.
आज सुरूवातीच्या कलात युएस बाजारातील डाऊ जोन्स (०.८३%), एस अँड पी ५०० (०.३७%), नासडाक (०.०३%) या तिन्ही बाजारात घसरण झाली. सुरुवातीच्या कलात युरोपियन बाजारात आजही घसरण झाली आहे. एफटीएसई (०.५३%), सीएससी (१.९८ %), डीएएक्स (१.६१%) बाजारात घसरण झाली.आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.९७%) सह निकेयी २२५ (०.५५%), स्ट्रेट टाईम्स (०.४८%), हेंगसेंग (१.३८%), तैवान वेटेड (०.४६%), कोसपी (४.०४%), सेट कंपोझिट (१.९७%), शांघाई कंपोझिट (०.३७ %) बाजारात घसरण झाली केवळ वाढ जकार्ता कंपोझिट (०.७१%) बाजारात दिसत आहे
आज दिवसभरात सोन्याचा व चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जागतिक सोन्याच्या निर्देशांकात व डॉलरमध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांना हैराण केले होते.मात्र आज डॉलर निर्देशांक स्थिरावून रूपया डॉलरच्या तुलनेत वधारला ज्यामुळे सोनेही स्वस्त झाले. आज कच्च्या तेलाच्या निर्देशांकात दबाव कायम होता ज्याचा फटका आज शेअर बाजारातील तेल व गॅस निर्देशांकात दिसून आला. युएसकडून भारताविरुद्ध मोर्चेबांधणी करण्यासाठी पाकिस्तान प्रथम रिफायनरी स्थापन करण्याचे ट्र म्प यांनी नमूद केले होते. याशिवाय भारताविरुद्ध कुरघोडी करिता युएसने इराण कडून तेल घेतल्याच्या आरोपाने सहा शिपिंग कंपन्यांवर प्रतिबंध लावले होते ज्याचा परिणामही तेलाच्या निर्देशांकात झाला. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून रशियन तेलाचे उत्पा दन बंद करण्याचा संभाव्य परिणाम म्हणजे आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ होईल कारण जागतिक द्रवपदार्थांच्या वापराच्या ७% वाटा रशियन तेल निर्यातीचा आहे असे बाजार तज्ञांनी म्हटले त्यामुळे कच्च्या तेलाच्या निर्देशांकात दबाव कायम राहि ला. या चढउताराताचा खेळात आज मात्र तेल संध्याकाळपर्यंत स्वस्त झाले आहे.
जागतिक दबावापोटी, उत्पादन वाढेल अशी गुंतवणूकदारांना आशा निर्माण झाल्याने, तसेच वाढलेल्या मागणीत वाढलेल्या पुरवठ्यामुळे कच्चे तेल (Crude Oil) स्वस्त झाले. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकात ०.१९% घसरले असून Brent Future निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.३८% घसरण झाली आहे. विशेष म्हणजे दोन्ही बाजारात घसरण होत असताना एनएसईत ८० कंपन्यांचे शेअर्स अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत.
अखेरच्या सत्रात आज सर्वाधिक वाढ सुझलोन एनर्जी (७.०६%), इंडिजेन (६.३२%), नेटवेब टेक्नॉलॉजी (५.०१%),झेन टेक्नॉलॉजी (४.७२%), सीसीएल प्रोडक्ट इंडिया (४.८४%), झेन टेक्नॉलॉजी (४.७२%),रेडिको खैतान (३.८२%), ट्रेंट (३.२३%), अंबुजा सिमेंट (२.५७%), आयशर मोटर्स (१.०९%), आयटीसी (१.०९%), डाबर इंडिया (१.०१%), नेटवर्क १८ (३.५५%), इमामी (३.१०%), आदित्य बिर्ला फॅशन (१.२५%) समभागात झाली.
आजच्या सत्रात सर्वाधिक घसरण पीएनबी हाउसिंग फायनान्स (१७.६१%), आयआयएफएल फायनान्स (१०.६२%), आर आर केबल्स (७.९४%), ग्राफाईट इंडिया (७.९४%),सोनाटा सॉफ्टवेअर (६.९७%), न्यू इंडिया ॲशुरन्स (५.३३%), जेएम फायनांशियल (३. ७४%), सिप्ला (३.३३%), टाटा स्टील (३.१२%), आयडीबीआय बँक (२.६८%), डॉ रेड्डीज (३.९१%), अदानी पॉवर (३.५९%) समभागात झाली.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले की,' अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत.आज संपूर्ण जग अमेरिकेच्या टेरिफमुळे त्रस्त आहे .भारत युके बरोबर फ्री ट्रेड करार झालेलाच आहे.आता युरोपीय देशांशी बोलणे सुरू आहे .आणि आजपर्यंत जे युरोपीय देश भारताचा व्यापारासाठी विचार करत नव्हते त्या सर्वाना आज जगभरात व्यापार वाढवणे गरजेचे आहे हे प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळेच भारताच्या अनेक वर्षाच्या प्रयत्नांना यश नक्की मिळणार हे जाणवत आहे.अमेरिकेच्याच उद्दामपणामुळेच आज जग भानावर आले आहे आणि अमेरिकेशी व्यापार कमी करायचा विचार अमलात आणत असल्याचे दिसत आहे. नॉर्वे,स्वीस अशा ५ देशांशी सकारात्मक बोलणी झालेली आहेत. एकंदरी त अनेक युरोपिय देश आपला दंभ सोडून व्यापार वाढवणार असल्याचे चित्र दिसत आहे. एकदा नाटो देशांचा अमेरिकेवरील विश्वास कमी होत गेला तर खरा अर्थाने जग जवळ येईल. ते दिवस ही लांब नाहीत.हे सर्व पुढील व्यापार संबंधित आहे. जे आज अमेरिकेने टेरिफचे परीणाम आपला बाजार अस्थिर करत आहेत.विदेशी गुंतवणूकदारांकडून या आठवड्यात १६,१७ हजार करोड रूपयांची विक्री करण्यात आली आहे.हे काही दिवस अजून चालेल असं दिसतंय. पुढील काही दिवसा त बाजार सावरेलच. ज्या कंपनीची नि र्यात अमेरिकेला आहे ते स्टॉक्स खाली येत आहेत. पुढील काही दिवस कळ सोसावी लागणार असं दिसतंय. विदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी मोठ्या प्रमाणात होणारी विक्री हाच चिंतेचा विषय आहे.बाकी भारताची ग्रोथ स्टोरी इटॅक आहे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की,' शुक्रवारी बेंचमार्क इक्विटी निर्देशांकांमध्ये मोठी विक्री झाली, ज्यामुळे कमकुवत आंतरराष्ट्रीय संकेत, सततचा FII (परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार) आउटफ्लो आ णि संभाव्य यूएस टेरिफ कृतींबद्दलच्या चिंता यामुळे जागतिक जोखीम-बंद भावना निर्माण झाल्याचे दिसून आले. सत्राच्या सुरुवातीच्या काळात निफ्टी५० रेंज-बाउंड राहिला परंतु उत्तरार्धात तीव्र विक्रीच्या दबावाला बळी पडला, २४६०० पातळीचा टप्पा ओलांडून दिवसा च्या नीचांकी २४५६५.३५ पातळीच्या जवळ बंद झाला, २०३ अंक किंवा ०.८२% घसरण झाली. यूएस फेडरल रिझर्व्हच्या सततच्या आक्रमक स्वभावामुळे, दर कपातीच्या दिशेने कोणत्याही संकेतांशिवाय,जोखीम मालमत्तेसाठी गुंतवणूकदारांची भूक कमी झाल्या मुळे ही घसरण आणखी वाढली. दिवसाच्या उत्तरार्धात अमेरिकेतील प्रमुख समष्टि आर्थिक छाप्यांमुळे (Key Macroeconomic prints) बाजारातील सहभागी देखील बाजूला राहिले ज्यामुळे अनिश्चितता वाढली. क्षेत्रीय आघाडीवर बाजाराची व्याप्ती मो ठ्या प्रमाणात नकारात्मक होती. निफ्टी फार्मा ३.३% घसरणीसह आघाडीवर राहिला, त्यानंतर निफ्टी आयटी आणि निफ्टी मेटल यांचा क्रमांक लागला, दोन्हीही १.५% पेक्षा जास्त घसरले. निफ्टी रियल्टी आणि निफ्टी ऑटो यांनाही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला त्यांनी अनुक्रमे १.८% आणि १.०४% सुधारणा केली. व्यापक ट्रेंडला मागे टाकत, निफ्टी एफएमसीजी एकमेव वाढणारा म्हणून उदयास आला, जो ०.६९% वाढला, वाढत्या अस्थिरतेदरम्यान बचावात्मक खरेदीमुळे तेजी आली.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की,' निर्देशांकाने मोठ्या प्रमाणात मंदीचा कँडल बनवला, ज्यामध्ये कमी उच्च आणि कमी कमी पातळी सुधारात्मक घसरणीचे संकेत देत राहतील. अमेरिका-भारत शुल्क निर्णया ची प्रगती आणि आरबीआय दर निर्णय यासारख्या प्रमुख मॅक्रो ट्रिगर्समुळे येत्या आठवड्यात अस्थिरता वाढण्याची अपेक्षा आहे. निर्देशांकाला २४५०० २४४०० पातळींभोवती प्रमुख आधार आहे, जो मागील स्विंग लो १००दिवसांचा ईएमए (Exponential Moving Average EMA) आणि मागील वरच्या हालचालीचा प्रमुख रिट्रेसमेंट लेव्हल (२३९३५-२५६६९) यांचा संगम (Consolidation) आहे. समर्थन क्षेत्राच्या वर निर्देशांक धारण केल्याने २४४००-२५००० पातळीच्या श्रेणीत एकत्रीकरण होईल. तर २४४०० पातळी खाली गेल्यास येत्या आठवड्यात २४२०० पातळींकडे घसरण उघडेल.'
आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की,' बँक निफ्टीने एक बेअर कॅन्डल तयार केली जी मागील सत्राच्या किंमत श्रेणीमध्ये बंद राहिली आणि घसरणीसह एकत्रीकरणाचे संकेत देत होती. निर्देशांकाला ५५५००- ५५००० क्षेत्राभोवती (Zone) प्रमुख आधार आहे जो १०० दिवसांच्या ईएमए (EMA) आणि मागील वरच्या हालचालीच्या प्रमुख फिबोनाची रिट्रेसमेंट पातळींचा संगम आहे. वरच्या बाजूला की रेझिस्टन्स ५६३००-५६५०० पातळींवर ठेवला आहे जो अलीकडच्या ब्रे कडाउन क्षेत्राचा खालचा बँड आहे. त्याच्या वरच्या हालचालीमुळेच डाउनट्रेंडमध्ये विराम मिळेल. एकूणच, येत्या सत्रांमध्ये निर्देशांक ५५०००-५६४०० पातळीच्या श्रेणीत एकत्रित होण्याची शक्यता आहे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,' बँक निफ्टीने एक बेअर कॅन्डल तयार केली जी मागील सत्राच्या किंमत श्रेणीमध्ये बंद राहिली आणि घसरणीसह एकत्री करणाचे संकेत देत होती. निर्देशांकाला ५५५००-५५००० क्षेत्राभोवती प्रमुख आधार आहे जो १००-दिवसांच्या EMA आणि मागील वरच्या हालचालीच्या प्रमुख फिबोनाची रिट्रेसमेंट पातळींचा संगम आहे. वरच्या बाजूला की रेझिस्टन्स ५६३००-५६५०० पातळींवर ठे वला आहे जो अलीकडच्या ब्रेकडाऊन क्षेत्राचा खालचा बँड आहे. त्याच्या वरच्या हालचालीमुळेच डाउनट्रेंडमध्ये विराम मिळेल. एकूणच, येत्या सत्रांमध्ये निर्देशांक ५५०००-५६४०० पातळीच्या श्रेणीत एकत्रित होण्याची शक्यता आहे.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक रूपक डे म्हणाले की,' गुरुवारी जोरदार रिकव्हरी असूनही, निफ्टीने ताशी चार्टवर २००- डीएमए (Direct Moving Average DMA) पुन्हा मिळवण्यात अपयशी ठरल्याने आणखी एक तीव्र घसरण पाहिली. दिवसभर, ताशी वेळेच्या फ्रेमवर निर्देशांक ५० ईएमएच्या खाली राहिला. दैनिक चार्टवर, तो २४६०० पातळीवर अलीकडील एकत्रीकरण समर्थनाच्या खाली तुटला आहे. भावना कमकुवत राहिल्या आहेत, सुधा रणा २४४००-२४४५० पातळीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जर तो २४४०० पातळीच्या खाली घसरला तर आणखी घसरण होण्याची शक्यता आहे; अन्यथा, रिकव्हरी अपेक्षित आहे. वरच्या बाजूला, २४६००-२४६५० आणि २४८५० पातळीवर प्रतिकार दिसून ये तो.'
आजच्या बाजारातील सोन्यावर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' एमसीएक्समध्ये सोन्याचा भाव ३५० रुपयांनी घसरून ९७७०० रुपयांवर बंद झाला. कॉमेक्स सोन्याच्या किमतीत मंदी आ ली आणि तो ३२९० डॉलर्सच्या आसपास होता. अमेरिकन फेडच्या सततच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि जवळच्या काळात व्याजदर कपातीचे कोणतेही संकेत नसल्याने ही घसरण झाली आहे. यामुळे सुरक्षित मालमत्तांबद्दलच्या भावना मंदावल्या आहेत. याव्यति रिक्त आज नंतर जाहीर होणारा महत्त्वाचा अमेरिकन डेटा सहभागींना सावध करत आहे. सोन्याचा भाव ९७००० ते ९८५०० रुपयांच्या आत अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे.'
आजच्या बाजारातील रुपयांच्या हालचालीवर भाष्य करताना बजाज एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' डॉलर निर्देशांक १०० रुपयांच्या जवळ पोहोचल्याने आणि अमेरिकेने भारतावर २५% कर लादल्याने एकूण भावनेवर दबाव राहिला, तरीही रुपया १० पैशांनी सकारात्मक व्यापार करत ८७.५३ रुपयांवर पोहोचला. चालू करविषयक चिंतांमुळे भांडवली बाजारात सततची कमकुवतपणा रुपयावर परिणाम करत आहे. याव्यतिरिक्त, बाजारातील सहभागी आजच्या प्रमुख यूएस डेटा रिलीझ - बिगर-शेती वेतन आणि बेरोजगारी दर - वर बारकाईने लक्ष ठेवून आहेत जे डॉलरच्या दिशेवर लक्षणीय परिणाम करू शकतात. रुपया ८७.२५ ते ८८.०० रुपयांच्या श्रेणीत अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे.'
यामुळे उद्याच्या बाजारातील परिस्थितीही बिकट राहण्याची शक्यता असली तरी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना भारतीय गुंतवणूकदार काय उत्तर देतात ते उद्याच्या ओपनिंग सेशनला संकेत मिळतील मात्र मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये होत असलेल्या हालचा ली पाहता ब्लू चिप्स कंपनीचे शेअर्सचे निरिक्षण करणेही महत्वाचे ठरू शकते.