Friday, August 1, 2025

Stock Market: सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळला, अमेरिकेच्या निर्णयाचे शेअर बाजारावर परिणाम

Stock Market: सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळला, अमेरिकेच्या निर्णयाचे शेअर बाजारावर परिणाम
मोहित सोमण : आजही शेअर बाजारात दबाव कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरणच कायम आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ५९.११ अंकाने व निफ्टी ५० ७८.१५ अंकाने घसरला आहे. आज जर अखेरपर्यंत ही घसरण कायम राहिल्यास सलग पाचव्या दिवशी बाजार 'लाल' रंगात बंद होईल याशिवाय आजही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतली तर घरगुती गुंतवणूकदार (DII) व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) यांच्यातील गुणोत्तर १०% या निचांकी पातळीवर जाण्याची शक्यता आहे.

सकाळच्या सत्रात सेन्सेक्स बँक निर्देशांकात ६३.७९ अंकाने व बँक निफ्टीत ११२.४५ अंकाने घसरला आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६४%,०.३० घसरण झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.७५%,०.७६% घसरण झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) यामध्ये आयटी एफएमसीजी (१.१३%), मिडिया (०.३२%) समभागात झालेली वाढ वगळता इतर सगळ्या समभागात घसरण झाली. सर्वाधिक घसरण फार्मा (२.२६%), हेल्थकेअर (१.८५%),ऑटो (१.०५%), मिडस्मॉल हेल्थकेअर (१.१३%) समभागात घसरण झाली.

आज सकाळच्या सत्रातही दबाव कायम होता. नुकत्याच डोनाल्ड ट्रम्प यांनी ४१ देशांवरील अतिरिक्त रेसिप्रोकल टेरिफ जाहीर केलेल्या अधिकृत कागदपत्रांवर सह्या केलय केल्या आहेत ज्यांची अंमलबजावणी ७ दिवसात होणार आहे. प्रत्येक देशांप्रमाणे १० ते ४१% पर्यंत टेरिफ हे लागू केले जातील. त्यामुळे बाजारात आणखी दबाव पातळी वाढली. दुसरीकडे भारतीय काही तेल कंपन्यांवर युएसने प्रतिबंध लावल्यानंतर नवी दिल्ली व वॉशिंग्टन यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. याशिवाय युएस फेडरल बँकेचे गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांनी व्याजदरात कपात न केल्यामुळे यावरही शेअर बाजारातील गुंतवणूकदारांकडून प्रतिक्रिया व्यक्त केली जाऊ शकते. आज वीआयएक्स अस्थिरता निर्देशांक (VIX) ८.१% उसळल्याने अस्थिरतेचे वारे सलग पाचव्यांदा कायम राहू शकतात. काही नुकत्याच जाहीर झालेल्या निराशाजनक निकालाने आगामी तिमाही निकालावर गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित आहे.

काल युएस बाजारातही टेरिफ अनिश्चिततेनंतर दबाव निर्माण झाला होता. काल युएस बाजारातील डाऊ जोन्स (०.०२%),एस अँड पी ५०० (०.३७%),नासडाक (०.०३%) या तिन्ही बाजारात गुंतवणूकदारांना नुकसान झाले. युरोपियन बाजारातील परिस्थिती वेगळी नव्हती. एफटीएसई (०.०५%),सीएसी (१.१६%),डीएसी (०.८२%) बाजारात घसरण झाली. सकाळच्या सत्रात आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.१९%) सह निकेयी २२५ (०.४५%), स्ट्रेट टाईम्स (०.०७%), हेगंसेंग (०.४५%), तैवान (०.६९%), कोसपी (३.३५%), शांघाई कंपोझिट (०.१९%) बाजारात झाली.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ चालेट हॉस्पिटल (१०.५१%), नेटवेब टेक्नॉलॉजी (६.७३%), सुझलोन एनर्जी (४.९४%), रेडिको खैतान (४.५३%), झेन टेक्नॉलॉजी (३.९७%), हिताची एनर्जी (३.४३%), नेटवर्क १८ (२.८१%), हिन्दुस्तान युनिलिव्हर (२.३६%), एचडीएफसी बँक (०.३४%) समभागात झाली आहे.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण पीएनबी हाउसिंग फायनान्स (१५.१५%), निवा बापू हेल्थ (५.८९%), आय आयएफएल फायनान्स (५.४७%), सोलार इंडस्ट्रीज (३.७८%), सनफार्मा (३.३८%), स्विगी (३.४९%), सिप्ला (२.२९%), जेएसडब्लू स्टील (१.९७%), ओएनजीसी (१.८८%), फेडरल बँक (१.७५%), टाटा पॉवर (१.३७%), विप्रो (१.१८%), अदानी पॉवर (०.०२%) समभागात झाली आहे.

आजच्या सुरूवातीच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना चॉईस इक्विटी ब्रोकिंग रिसर्चचे डेरिएटिव विश्लेषक हार्दिक मतालिया म्हणाले की,' गिफ्ट निफ्टीने दर्शविल्याप्रमाणे, भारतीय बेंचमार्क निर्देशांक आज नकारात्मक पातळीवर उघडण्याची अपेक्षा आहे, जे निफ्टी ५० मध्ये सुमारे १२८ अंकांची लक्षणीय घसरण दर्शवते. वाढत्या अस्थिरतेमुळे आणि मिश्रित जागतिक संकेतांमुळे बाजारातील भावना सावधपणे आशावादी राहते.

निफ्टी ५० मागील सत्रात कमकुवत स्थितीत उघडला आणि सुमारे १३३ अंकांनी पुनर्प्राप्त होण्यापूर्वी २४७०० पातळीच्या त्याच्या इंट्राडे सपोर्टच्या खाली थोडक्यात घसरला - तो एक अत्यंत अस्थिर दिवस बनला. या उसळीनंतरही, निर्देशांक २४८०० पातळीच्या वरची हालचाल टिकवून ठेवल्याशिवाय असुरक्षित राहतो. या पातळीच्या वर बंद झाल्यास २५००० च्या पातळीकडे जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. नकारात्मक बाजूने, तात्काळ सपोर्ट (Immediate Support) २४६०० पातळीवर आहे, त्यानंतर २४,५०० हे दोन्ही घसरणीवर खरेदीच्या संधी देऊ शकतात.

बँक निफ्टीने सापेक्ष ताकद दाखवली, जवळजवळ ४१३ अंकांनी वाढ झाली, ज्यामुळे खरेदीची आवड अजूनही कायम असल्याचे दिसून येते. प्रमुख आधार पातळी आता ५५७३० पातळीवर आहेत, त्यानंतर ५५५०० आणि ५५००० पातळीवर आहेत. या पातळींपेक्षा जास्त राहिल्याने आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, तर ५६२५०-५६६०० झोनच्या आसपास प्रतिकार अपेक्षित आहे. या बँडच्या वर ब्रेकआउटमुळे मानसिक ५७००० पातळीच्या पातळीवर वाढ होऊ शकते.

संस्थात्मक आघाडीवर, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) ३१ जुलै रोजी सलग नवव्या सत्रात त्यांची विक्रीची मालिका वाढवली, ५,५८८ कोटी किमतीच्या इक्विटीजची विक्री केली. याउलट, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DIIs) सलग १९ व्या सत्रात निव्वळ खरेदीदार राहिले, त्यांनी बाजारात ६,३७२ कोटी गुंतवले.

वाढत्या अस्थिरतेची आणि परस्परविरोधी तांत्रिक सिग्नलची प्रचलित परिस्थिती लक्षात घेता, व्यापाऱ्यांना विशेषतः लीव्हरेज वापरताना सावधगिरी बाळगून "विक्री-ऑन-राइज" दृष्टिकोन अवलंबण्याचा सल्ला दिला जातो. रॅली दरम्यान आंशिक नफा बुक करणे आणि कडक ट्रेलिंग राखणे
नफ्याचे रक्षण करण्यासाठी स्टॉप-लॉसची शिफारस केली जाते. जर निफ्टी २५००० पातळीच्या वर टिकून राहिला तरच नवीन लॉन्ग पोझिशन्सचा विचार केला पाहिजे. एकंदरीत, व्यापक बाजारातील प्रभाव सावधपणे तेजीत राहतो, परंतु प्रमुख पातळी आणि जागतिक घडामोडींचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की,' जुलैमध्ये निफ्टीमध्ये ३.१% घसरण झाल्यानंतर ऑगस्ट मालिकेची सुरुवात कमकुवत झाली आहे. नजीकच्या काळात बाजारावर टेरिफशी संबंधित बातम्यांचा प्रभाव पडेल. सुधारित टेरिफ दरांच्या अंमलबजावणीची तारीख ७ ऑगस्ट असल्याने, देशांना वाटाघाटी करण्यासाठी आणि टेरिफ कमी करण्यासाठी वेळ मिळतो. ते घडू शकते.

कालच्या बाजारातील कृतीवरून असे दिसून येते की बाजार २५% टेरिफला अल्पकालीन समस्या म्हणून पाहतो. या महिन्यापासून सुरू होणाऱ्या वाटाघाटींच्या पुढील फेरीनंतर हा दर कमी होण्याची शक्यता आहे.

बाजारातील एक महत्त्वाचा ट्रेंड म्हणजे व्यापक बाजारपेठेतील कमकुवतपणा, विशेषतः स्मॉलकॅप्स... या सेगमेंटच्या उच्च मूल्यांकनांमुळे हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे.

एफआयआयकडून सतत विक्री होत राहणे नकारात्मक आहे. डॉलर निर्देशांक १०० पर्यंत वाढल्याने एफआयआय (FIIs) विक्री सुरू ठेवण्यास प्रवृत्त होतील आणि लार्जकॅप्सवरही दबाव येईल. गुंतवणूकदार वाटा आणि पाहण्याची रणनीती स्वीकारू शकतात.'

आजच्या निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले की,'२४९६० पातळीचा अडथळा ओलांडण्याचा आणखी एक प्रयत्न नाकारण्यात आला. सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये काही कपात होण्याची अपेक्षा आहे, परंतु जोपर्यंत घसरण २४६७५ पातळीच्या वर राहते तोपर्यंत आणखी एक वरचा प्रयत्न अपेक्षित आहे. परंतु, २४६५०-६०० क्षेत्राने हार मानली तर २४४५० पातळीची अपेक्षा करा, परंतु कालही राखल्याप्रमाणे घसरण कमी अपेक्षित आहे. पर्यायी, २५००० पातळीच्या वर थेट वाढ २५३३० पातळीची हालचाल सेट करू शकते.'

यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारासोबत भारतीय गुंतवणूकदार आज काय निर्णय घेतात ते अखेरच्या सत्रात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा