
मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील साक्षीदार महिबूब मुजावर यांनी माध्यमांसमोर येऊन अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले. रामजी कलसांग्रा, संदीप डांगे आणि दिलीप पाटीदार यांचा खून करण्यात आलेला असताना ते जिवंत आहेत म्हणून दोषारोप ठेवण्यात आले. तपास करण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली होती. जे मेलेले आहेत, ते जिवंत आहेत हे दाखवण्यासाठी मला त्यांच्या घरी जाऊन धाडी टाकायला सांगितल्या. हे सगळं खोटं असल्याचं माझ्या लक्षात आलं. या सगळ्यात आपला वापर करण्यात येत असल्याचंही माझ्या लक्षात आल्याचं मुजावर म्हणाले.
सोचिए, एक ATS अधिकारी से कहा गया!
"संघ प्रमुख मोहन भागवत जी को उठाओ, भगवा आतंकवाद की कहानी बनाओ!"
अगर 2014 में मोदी जी न आए होते,
तो हिंदू आतंकवाद का नाम लेकर हर हिंदू को अपमानित किया जाता।
देश ने खुद को बचा लिया — मोदी जी को चुनकर।🙏#MalegaonVerdict pic.twitter.com/MZFErVbyXI
— Sunil Deodhar (@Sunil_Deodhar) August 1, 2025
मोहन भागवत यांना धरुन आणा, असा एक गोपनीय आदेश देण्यात आल्याचा दावाही एटीएसचे माजी पोलीस निरीक्षक महिबूब मुजावर यांनी केला. मी या आदेशाचं पालन टाळलं होतं. तपास झाल्यानंतर वरिष्ठांना ही बाब लक्षात आली. मी काम केलं नाही म्हणून माझ्यावर खोटे गु्न्हे दाखल केले. त्यात मला अटक केली. मग सात-आठ वर्ष मी त्या प्रकरणात अडकून गेलो आणि त्यातून मी निर्दोष सुटलो,' असे एटीएसचे माजी पोलीस निरीक्षक महिबूब मुजावर म्हणाले.
'निर्दोष सुटताना सीआरपीसीच्या कलम ३१३ च्या अंतर्गत मी जबाब दिला. त्यात मी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तीच कागदपत्रं यांनाही (आज निकाल लागलेल्या प्रकरणात) पुरवण्यात आली. न्यायालयानं निकालात नेमका कशाचा उल्लेख केला याची मला कल्पना नाही, असे एटीएसचे माजी पोलीस निरीक्षक महिबूब मुजावर म्हणाले. त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाविषयी समाधान व्यक्त केले.