
मुंबई: भारताचा क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या वर्षी मार्चमध्ये घटस्फोट झाला होता. आता चहलने धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटाबाबत आपले मौन सोडले आहे. या लग्नात नेमके काय बिघडले याची त्याने खुलेपणाने चर्चा केली आहे. जेव्हा या वर्षाच्या सुरूवातीला त्याच्यावर फसवणुकीचे आरोप झाले तसेच घटस्फोटाच्या अफवा पसरल्या होत्या त्यावेळी तो मानसिक तणावात होता असेही त्याने यावेळी सांगितले.
युझवेंद्र म्हणाला, त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. त्याने एका यू्ट्यूब चॅनेलवर सांगितले, हे बराच काळा सुरू होते. आम्ही ठरवले की जिथून परतणे शक्य होणार नाही अशा स्थितीत पोहोचत नाही तोपर्यंत काहीही करायचे नाही. आम्ही सोशल मीडियावर सामान्य जोडप्याप्रमाणेच राहू.
यावेळेस त्याला विचारले की तो फक्त दिखावा करत होता का तर त्यावर त्याने हा म्हटले. चहल पुढे म्हणाला, नात्यामध्ये जर एक नाराज असेल तर दुसऱ्याला ऐकावे लागले. कधी कधी दोन लोकांचा स्वभाव मिळत नाही. मी इंडियासाठी खेळत होतो तीही आपले काम करत होती. हे १-२ वर्षे सुरू होते.
प्रत्येकाला आपले आयुष्य असते
मी इथेही वेळ देत होतो. तिथेही. मात्र नात्याबाबत विचार करण्यास वेळ उऱला नाही. प्रत्येक दिवशी असे वाटायचे की सोडूनद्या. प्रत्येकाला आपले आयुष्य असते तसेच आयुष्यात निर्धारित लक्ष्य असते. एक जोडीदार म्हणून तुम्हाला साथ द्यायची असते.
जेव्हा माझा घटस्फोट झाला तेव्हा लोकांनी मला धोकेबाज म्हटले. मात्र मी जीवनात कधीही कोणाला धोका दिला नाही. माझ्या दोन बहीणी आहेत. त्यामुळे महिलांचा सन्मान करणे हे मी माझ्या आई-वडिलांकडून शिकलो आहे.
युझवेंद्र यावेळी भावूक होत म्हणाला, माझ्या मनात त्यावेळेस आत्महत्येचे विचार येत होते. मी आयुष्याला थकलो होतो. मी २ तास रडायचो आणि २ तास झोपायचो. असे ४०-४५ दिवस सुरू होते. मला क्रिकेटमधून ब्रेक हवा होता. मी क्रिकेटमध्ये इतका व्यस्त होतो की लक्ष केंद्रित करू शकत नव्हतो. मी या गोष्टी मित्रासोबत शेअर केल्या.