Friday, August 1, 2025

Gold Silver Rate: सोन्यात सामान्य व चांदीत मोठी घसरण! 'या' विस्तृत कारणांमुळे काय आहे जागतिक सोन्याचांदीतील हालचाल जाणून घ्या तज्ञाकडून

Gold Silver Rate: सोन्यात सामान्य व चांदीत मोठी घसरण! 'या' विस्तृत कारणांमुळे काय आहे जागतिक सोन्याचांदीतील हालचाल जाणून घ्या तज्ञाकडून

मोहित सोमण: कालच्या वाढीनंतर आज मात्र सोने स्वस्त झाले आहे. भारतीय सराफा बाजारातील सोन्याच्या मागणी घटल्याने व युएस डॉलर रुपयाच्या तुलनेत उसळल्याने आज सोन्यात व चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. त्यामुळेच वर्ल्ड गोल्ड काऊन्सिल (World Gold Council) संस्थेने म्हटल्याप्रमाणे आर्थिक वर्ष २०२५ मध्ये पाच वर्षांतील सोन्याच्या वापरातील सर्वाधिक घसरणीकडे पातळी पोहोचली आहे. बाजारातील माहितीनुसार, आरबीआयनेही सोन्याच्या खरेदीत घसरण केली असल्याने भारतीय बाजारात सोने स्वस्त झाले. 'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २१ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १६ रूपये घसरण झाली. त्यामुळे सोन्याचे दर अनुक्रमे २४ कॅरेटसाठी ९९८२ रूपये,२२ कॅरेटसाठी ९१५० रूपये, १८ कॅरेटसाठी ७४८७ रूपयावर पोहोचले आहेत.


माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत २१० रूपयांची घसरण झाली असून २२ कॅरेट सोन्याच्या किंमतीत २०० रूपयांनी व १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १६० रूपयांनी घसरण झाली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर ९९८२० रूपये, २२ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर ९१५००, १८ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर ७४८७० रूपयांवर गेला आहे. आज मुंबई, पुण्यासह महत्वाच्या शहरात सरासरी सोन्याचा दर २४ कॅरेट प्रति ग्रॅमसाठी ९९८२ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमसाठी ९१५० रूपयांवर पोहोचला आहे. जागतिक अस्थिरतेच्या तोंडावर सोन्याच्या जागतिक निर्देशांकात देखील दिवसभरात ०.५० ते १% घसरण झाली आहे. दुपारपर्यंत गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.३२% घसरण झाली होती. तर युएस गोल्ड स्पॉट दरात दुपारपर्यंत ०.११% घसरण झाली होती ज्यामुळे सोन्याचे दर प्रति डॉलर ३२८७.१४ औंसवर पोहोचले होते.


शुक्रवारी अमेरिकन डॉलर निर्देशांक दोन महिन्यांहून अधिक काळातील उच्चांकावर गेली होती.अंदाजे तीन वर्षांतील सर्वोत्तम साप्ताहिक वाढीवर कालपर्यंत पोहोचला होता. डॉलरमुळे मोठी वाढ झाल्याने इतर चलनांच्या धारकांसाठी सोने महाग होते मात्र जागतिक पातळीवर डॉलर वाढत असताना आज मात्र डॉलर निर्देशांकात घसरण झाली असून भारतीय रूपयातही डॉलरच्या तुलनेत ४० पैशाने वाढ झाल्याने सोन्यातील सपोर्ट लेवल घसरली. त्यामुळे आज सोने स्वस्त झाले. भारतीय बाजारपेठेतील कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (MCX Multi Commodity Exchange) ०.४०% घसरण झाल्याने कमोडिटी बाजारातील दरपातळी ९८३७० रूपयांवर पोहोचली. कालपर्यंत डॉलरमध्ये झालेली वाढ मात्रफेडरल रिझर्व्हने व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय आणि अमेरिकेच्या व्यापार हालचालींशी जोडलेल्या धोरणात्मक अनिश्चिततेमुळे डॉलरला चालना मिळाली होती.


आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना मौल्यवान धातू संशोधनातील (Precious Metal Research) मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे विश्लेषक मानव मोदी म्हणाले आहेत की,'सोन्याच्या किम तीत व्यापक प्रमाणात व्यवहार झाले, तर औद्योगिक धातूंच्या किमतीत घसरण झाल्याने चांदी मंदावली आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्ट रोजी वाटाघाटी संपवण्याची अंतिम मुदत दिली आहे. ट्रम्प यांनी सांगितले की त्यांनी मेक्सिकोसोबतचा विद्यमान व्यापार करार ९० दिवसांसाठी वाढवण्यास आणि त्या कालावधीत नवीन करारावर स्वाक्षरी करण्याच्या उद्देशाने चर्चा सुरू ठेवण्यास सहमती दर्शविली आहे. अमेरिकेच्या उच्च शुल्क दरांच्या अंतिम मुदतीपूर्वी ब्राझील आणि दक्षिण कोरियामधून आयाती सह अनेक शुल्क घोषणा केल्यानंतर हे घडले. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदर ४.२५%-४.५०% श्रेणीत स्थिर ठेवले आणि या निर्णयानंतर अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या टिप्पण्यांमुळे सप्टेंबरमध्ये दर कपातीची आशा धूसर झाली. डेटाच्या बाबतीत, अपेक्षेपेक्षा चांगले जीडीपी आणि खाजगी वेतनवाढीनंतर, महागाईतही सुधारणा होण्याची चिन्हे दिसली. आयातीवरील शुल्कामुळे काही वस्तूंच्या किमती वाढू लागल्याने जूनमध्ये अमेरिकेचा महागाई दर वाढला. मे महिन्यात सुधारित ०.२% वाढीनंतर गेल्या महिन्यात पीसीई (Personal Consumption Expenditure) निर्देशांक ०.३% वाढला. आजचे लक्ष अमेरिकेतील बिगर-शेती वेतन डेटा आणि दरांबाबतच्या कोणत्याही अपडेटवर केंद्रित आहे.'


या विविध कारणांमुळे आज सोन्यात घसरण झाली आहे.


चांदीत तुफान घसरण !


चांदीत तुफान घसरण झाली आहे. आज 'गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २ रूपयांनी घसरण झाली असून प्रति किलो दरात २००० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेतील चांदीचे दर प्रति ग्रॅम ११३ रूप ये व प्रति किलो दर ११३००० रुपयांवर पोहोचले आहेत. जागतिक बाजारपेठेतील चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात ०.५४% घसरण झाली असून भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीची निर्देशांकात ०.५५% घसरण झाली असल्याने चांदीची दर पातळी १०९३७१ रूपयांवर पोहोचली आहे.


चांदीत का घसरण झाली ?


युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक पातळीवरील व्यापारात एकूण सरासरी १०% टेरिफ वाढवल्याने चांदीच्या व्यापारात दबाव निर्माण झाला होता. प्रासंगिक कराराने चांदीच्या मागणीत घसरण झाली. ती होत असतानाच कालपर्यंत वाढत असलेला डॉलर निर्देशांकही आज घसरल्याने, औद्योगिक धातूंच्या किमतीत घसरण झाल्याने चांदी स्वस्त झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा