Saturday, October 25, 2025
Happy Diwali

दुखापतीमुळे ख्रिस वोक्स पाचव्या कसोटीतून बाहेर

दुखापतीमुळे ख्रिस वोक्स पाचव्या कसोटीतून बाहेर
लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये सुरू आहे. याच सामन्यात पहिल्या दिवशी भारताविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना ख्रिस वोक्सला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळे ख्रिस वोक्स पाचव्या कसोटीतून बाहेर पडला आहे. तो खेळण्याची शक्यता मावळली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी ख्रिस वोक्सच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. या दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागणार असल्यामुळे ख्रिस वोक्स पाचव्या कसोटीत पुढे खेळणार नाही, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केले आहे. भारताच्या पहिल्या डावातील ५७ व्या षटकात क्षेत्ररक्षण करताना वोक्सला दुखापत झाली. त्याने मिड-ऑफमधून चेंडूचा पाठलाग केला आणि चेंडू अडवण्यासाठी उडी मारली. ही उडी चुकली आणि त्याच्या डाव्या खांद्याला जबर मार लागला. डाव्या खांद्याला दुखापत झाली. बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्स यांच्या अनुपस्थितीत जोश टंग, गस अ‍ॅटकिन्सन आणि जेमी ओव्हरटन यांच्या खांद्यांवर इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीची धुरा आहे. वोक्सने भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १८१ षटके टाकली आणि ११ बळी घेतले.
Comments
Add Comment