Saturday, October 25, 2025
Happy Diwali

सीमा सुरक्षा दलाचा जवान बेपत्ता, शोध सुरू

सीमा सुरक्षा दलाचा जवान बेपत्ता, शोध सुरू
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगरच्या छावणीतून सीमा सुरक्षा दलाचा जवान बेपत्ता झाला आहे. जवान बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच सीमा सुरक्षा दलाने स्थानिक पोलिसांनी लेखी तक्रार नोंदवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२५ च्या रात्री सीमा सुरक्षा दलाचा जवान सुगम चौधरी बटालियन मुख्यालय, पांथाचौक येथून बेपत्ता झाला. जवान बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच सीमा सुरक्षा दलाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली. छावणी भोवतालच्या परिसरात शोधाशोध झाली. जवान सापडला नाही. अखेर जवान बेपत्ता असल्याची लेखी तक्रार सीमा सुरक्षा दलाने स्थानिक पोलिसांकडे नोंदवली आहे. सीमा सुरक्षा दलाने संबंधित जवानाचा फोटो आणि त्याच्याशी संबंधित आवश्यक ती माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनीही तक्रार नोंदवून घेतल्यानंतर जवानाचा शोध सुरू केला आहे. सीमा सुरक्षा दलाच्या साठाव्या बटालियनचा जवान सुगम चौधरी बटालियन मुख्यालय, पांथाचौक येथून बेपत्ता झाला आहे. याआधी डिसेंबर २०२३ मध्ये आणि मे २०२४ मध्ये सीमा सुरक्षा दलाचा प्रत्येकी एक जवान बेपत्ता झाला होता. मानसिक ताण असह्य झाल्यामुळे या घटना घडल्या होत्या. संबंधित जवान ड्युटीवरुन परस्पर बाहेर निघून गेले होते. आता पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >