Saturday, August 2, 2025

नागरिकांना मोठा दिलासा; गॅस सिलेंडर दरात सलग पाचव्यांदा कपात! तुमच्या शहरात किती स्वस्त झाला सिलेंडर ?

नागरिकांना मोठा दिलासा; गॅस सिलेंडर दरात सलग पाचव्यांदा कपात! तुमच्या शहरात किती स्वस्त झाला सिलेंडर ?

नवी दिल्ली : महागाईने हैराण झालेल्या सामान्य जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग पाचव्यांदा घसरण झाली.  यामुळे गृहिणींपासून ते छोट्या उद्योगांपर्यंत सर्वांनाच मोठा दिलासा मिळालाय. सरासरी ३४ रुपयांनी किंमती स्वस्त झाल्या. मार्च महिन्यापासून आतापर्यंत सलग पाच महिन्यात १७० रुपयांची घसरण आली. जागतिक बाजारात नैसर्गिक गॅसच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याने किंमती घसरल्या आहेत.



गॅस सिलेंडरच्या किंमती जसेच्या तसे 


एप्रिल महिन्यात मोदी सरकारने घरगुती गॅसच्या किंमतीत ५० रुपयांची दरवाढ झाली होती. तेव्हापासून त्यात कपात झालेली नाही. भारतभर गॅस सिलेंडरच्या किंमतीत घसरण दिसून आली. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती जसेच्या तसे आहेत. एप्रिल महिन्यात यापूर्वी घरगुती गॅसच्या किंमतीत बदल दिसून आला होता. तर दुसरीकडे सलग पाचव्यांदा व्यावसायिक गॅसच्या किंमतीत मोठी कपात दिसून आली.


सलग ५ व्या महिन्यात आनंदवार्ता


IOCLच्या आकडेवारीनुसार, देशाच्या राजधानीसह चार महानगरातील व्यावसायिक गॅसच्या किंमतीत सलग ५ व्या महिन्यात घसरण दिसून आली. देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत ३३.५ रुपयांची घसरण दिसली. आता हा भाव १६३१.५० रुपयांवर आला आहे. तर मुंबईत व्यावसायिक गॅसच्या किंमतीत ३४ रुपयांची घसरण झाली. आर्थिक राजधानीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १५८२. ५० रुपयांवर आली. कोलकत्ता आणि चेन्नईत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत ३४.५ रुपयांची कपात झाली. दोन्ही शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरची क्रमशः १७३४.५० आणि १७८९ रुपये अशी किंमत आहे.


तुमच्या शहरात किती दर ?



  • मुंबई : ₹८८०

  • पुणे : ₹९००

  • दिल्ली : ₹८७०

  • कोलकाता : ₹८९५

  • चेन्नई : ₹८८५


घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत नाही बदल


घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत एप्रिल महिन्यानंतर कोणताच बदल झाला नाही. एप्रिल महिन्यात किंमतीत ५० रुपयांची दरवाढ झाली होती. ८ एप्रिल रोजी मोदी सरकारने याविषयीची घोषणा केली होती. त्यानंतर किंमतीत कोणताही बदल दिसला नाही. IOCL च्या आकड्यांनुसार, चार मोठ्या शहरातील घरगुती गॅस सिलेंडरची किंमत जशीच्या तशीच आहे. यामध्ये दिल्लीत ८५३ रुपये, कोलकातामध्ये ८७९ रुपये, मुंबईमध्ये ८५२.५० आणि चेन्नईमध्ये गॅस सिलेंडरची किंमत ८६८.५० रुपये इतकी आहे. जागतिक बाजारात नैसर्गिक गॅसच्या किंमती कमी झाल्याने व्यावसायिक गॅसच्या किंमती कमी झाल्याचे समोर आले आहे.
Comments
Add Comment