Saturday, August 2, 2025

US Federal: युएस फेडचा आणखी एक मोठा निर्णय! फेड व्याजदर जैसे थे ! आजच्या बाजारात त्याचा परिणाम होईल?

US Federal: युएस फेडचा आणखी एक मोठा निर्णय! फेड व्याजदर जैसे थे ! आजच्या बाजारात त्याचा परिणाम होईल?
मोहित सोमण: अमेरिकेने टेरिफ वाढीनंतर आणखी एक महत्वाचा निर्णय काही क्षणापूर्वी घेतला आहे. युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात न करता 'स्थिर' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची घोषणा जेरोमी पॉवेल यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्टपर्यंत व्याजदरात कुठलीही कपात होणार नाही असे बँकेने स्पष्ट केले.२९ ते ३० जुलैपर्यंत ही पतधोरण समितीची बैठक घेण्यात आली ज्यामध्ये ९:२ अशा फेड मंडळाच्या बहुमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन गव्हर्नरचा विरोध अस तानाही हे धोरण बहुमताच्या आधारावर पारित करण्यात आली. सध्याची अमेरिकेतील अर्थव्यवस्थेतील आकडेवारी पाहता अमेरिकेत अस्थिरतेबरोबर राजकीय परिस्थिती सुलभ नाही. असे असतानाही पतधोरणात कुठलाही बदल न केल्याने ट्रम्प आणखी नाराज होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी वारोवार व्याजदरात कपात करावी ही मागणी सातत्याने केली होती. मात्र जेरोमी पॉवेल यांनी व्याजदर स्थिर ठेवल्याने हे दर ४.५ ते ४.२५% पातळीवर कायम राहणार आहेत.

तथापि, या निर्णयाला गव्हर्नर मिशेल बोमन आणि क्रिस्टोफर वॉलर यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले आहे. या दोघांनी व्याजदर स्थिर ठेवण्याविरोधी मतदान केले होते. या दोघांनीही फेडने चलनवाढ नियंत्रणात आहे आणि श्रमिक बाजार लवकरच कमकुवत हो ण्यास सुरुवात केली आहे याची कबुली देण्यासाठी फेडला मदत केली आहे असा युक्तिवाद केला. सन १९९३ च्या उत्तरार्धानंतर ही पहिलीच वेळ होती की अनेक राज्यपालांनी दराच्या निर्णयावर कोणतेही मत दिले नाही असेही आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी आप ल्या वृत्तात नमूद केले आहे. अमेरिकेतील तज्ञांच्या मते यावर्षी आणखी दोनदा कपात होईल असे सूतोवाच केले असले तरी अजूनही त्यावर निर्णय झाला नाही. यातच ट्रम्प जेरोमी पॉवेल यांना सातत्याने लक्ष करत असल्यामुळे आगामी घडामोडीचा बाजारावर काय परिणाम होईल तसेच त्यामुळे याचा भारतावर काय परिणाम होईल हे लवकरच स्पष्ट होईल.

विशेषतः शेअर बाजारात व्याजदरात कपात न केल्यामुळे एफआयआय काय निर्णय घेतील यावर बाजाराचे वेटेज देखील ठरू शकते. गेल्या महिनाभरात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Institutional Investors FII) यांनी मोठी गुंतवणूक भारतीय बाजारपेठेतून काढून घेतली ज्याच्यामुळे बाजारात फटका बसला. व्याज दर जैसे थे ठेवल्याने परदेशी गुंतवणूकदार आणखी आपली रोख रक्कम काढतील का वाढवतील हे मात्र अनिश्चित आहे. जर व्याजदरात कपात झाली असती भारतीय बाजारात आणखीन चिं तेचे वातावरण होते मात्र आता स्थिर ठेवल्याने पुढील गुढ कायम आहे.
Comments
Add Comment