
सत्य परेशान हो सकता है पर पराजित नहीं…!
आज मालेगाव बॉम्बब्लास्ट प्रकरणातील सर्व ७ आरोपींना कोर्टाने निर्दोष घोषित केलं. ही केवळ एक न्यायालयीन निकालाची बातमी नाही, तर काँग्रेसच्या विषारी आणि विखारी राजकारणाचा चेहरा पुन्हा उघड झाला आहे. त्यांच्या मोहोब्बतच्या दुकानात… pic.twitter.com/BiHlvoQ1ij
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 31, 2025
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकाल ही केवळ एक न्यायालयीन निकालाची बातमी नाही, तर काँग्रेसच्या विषारी आणि विखारी राजकारणाचा चेहरा पुन्हा उघड झाला आहे. त्यांच्या मोहोब्बतच्या दुकानात तुष्टीकरणाच्या , द्वेषाच्या गोळ्या मिळतात हे चव्हाट्यावर आलं आहे..; असे भाजपच्या आमदार चित्रा वाघ म्हणाल्या.
हिंदू साध्वींना, राष्ट्रासाठी लढणाऱ्या अधिकाऱ्यांना खोट्या पुराव्यांत अडकवण्यात आलं. का ? एका विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी? का विशिष्ट लोकांची पापं लपवण्यासासाठी…? ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द प्रचारात आणणाऱ्यांनी देशाच्या सामाजिक ऐक्यालाच गालबोट लावणाऱ्या काँग्रेसला कायद्याचा दणका मिळाला आहे.या विकृत काँग्रेसला संविधानाचा खरा अर्थ समजेल …कारण संविधानाच्या आधारावरच सत्याचा विजय झाला आहे; असेही भाजपच्या आमदार चित्रा वाघ म्हणाल्या.
याआधी २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आला. तब्बल १७ वर्षांनंतर विशेष NIA न्यायालयाने सर्व ७ आरोपींना निर्दोष मुक्त केलं! ठोस पुराव्यांअभावी न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला.
नेमके काय झाले होते ?
मालेगावच्या मशिदी जवळ २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि शंभरहून अधिक जखमी झाले होते. मशिदी जवळ दुचाकीचा स्फोट झाला होता. या प्रकरणात कर्नल प्रसाद पुरोहितसह साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि इतरांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले होते.