Saturday, August 2, 2025

अजून पाऊस संपलेला नाही...ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जोरदार बरसणार मान्सून

अजून पाऊस संपलेला नाही...ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जोरदार बरसणार मान्सून
नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने भारतासाठी मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी (ऑगस्ट आणि सप्टेंबर) चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या काळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

कशी असेल ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाची स्थिती


हवामान विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात देशाच्या बहुतांश भागांत सरासरी (सामान्य) पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज आहे.

काही भागांत कमी पावसाची शक्यता


डॉ. महापात्रा यांनी हे देखील स्पष्ट केले की, ईशान्य भारत, त्याला लागून असलेला पूर्व भारत मध्य भारताचा काही भाग आणि दक्षिण-पश्चिम द्वीपकल्पीय भागांमध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे.

एकंदरीत, मान्सूनच्या उत्तरार्धात भारतभर चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे शेती आणि जलसाठ्यांसाठी दिलासा मिळेल.
Comments
Add Comment