
काल उशीरा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% टेरिफसह शुल्कात्मक दंड ठोठावल्याचा निर्णय घेतल्याने बाजारात मोठा परिणाम घडला आहे. केवळ टेरिफ नाही तर युएस फेड गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांनी फेड व्याजदरात कुठलाही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केल्यानेही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय बाजारात कसा प्रतिसाद देतील यावर निर्देशांकाची अंतिम पातळी निश्चित होऊ शकते. दुसरीकडे भारतानंतर ट्रम्प यांनी सिओलवर १५% रेसिप्रोकल टेरिफ कर घोषित केला. यापूर्वी सिओलवर २५% करार घो षित केल्यानंतर आता सु़धारित १५% कर त्यांनी घोषित केला. तज्ञांच्या मते, कंज्यूमर प्रोडक्ट, काही दैनंदिन वस्तू, ऑटोमोबाईल, ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातील उत्पादनांच्या आयात निर्यातीवर टेरिफ निर्णयाचा परिणाम होऊ शकतो.अशातच प्रश्न उपस्थित राहतोय नुकत्याच युकेशी केलेल्या एफटीए द्विपक्षीय करारासह अमेरिकेतील झालेले नुकसान भारत कुठल्या देशांच्या करारानी भरून काढेल असा प्रश्न गुंतवणूकदारांना सहाजिकच पडलेला आहे. दुसरीकडे केवळ टेरिफ नाही तर प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, युएस सरकारने सहा भारतीय कंपनीवर प्रतिबंध केला आहे. इराणी पेट्रोलियम उत्पादने आयात निर्यात करत असल्याच्या आरोपावरून हे प्रतिबंध टाकण्यात आले. याबद्दल बोलताना अमेरिकेन अमेरिकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'इराणी राजवट आपल्या अस्थिर कारवायांना निधी देण्यासाठी मध्य पूर्वेतील संघर्षाला खतपाणी घालत आहे.' त्यात पुढे म्हटले आहे की, 'आज अमेरिका परदेशात दहशतवादाला पाठिंबा देण्यासाठी तसेच स्वतःच्या लोकांवर अत्याचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या महसुलाच्या प्रवाहाला रोखण्यासाठी ही कारवाई करत आहे.' असे म्हटले आहे.
भारतातील अर्थतज्ज्ञांचा म्हणत आहेत की जर हे शुल्क आर्थिक वर्ष २६ पर्यंत कायम राहिले तर ते भारताच्या जीडीपीमधून ०.२% ते ०.५% पर्यंत कमी करत हा निर्णय परिमाण करू शकतो. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटकमधील एमएसएमई आणि निर्यात केंद्रे विशेषतः धोकादायक आहेत असेही त्यांनी म्हटले. परंतु जागतिक पुरवठा साखळ्या सक्रियपणे पुन्हा आकारल्या जात असल्याने, सध्याचा व्यत्यय सखोल सुधारणा आणि नवीन बाजारपेठ शोधासाठी उत्प्रेरक ठरू शकतो असे तज्ञांनी म्हटले आहे. काल टेरिफचा निर्णय झाल्यावर गिफ्ट निफ्टीत १% घसरण झाली होती. आज सकाळीही घसरण कायम राहिली आहे. काल युएस शेअर बाजारातील डाऊ जोन्स (०.३५%), नासडाक (०.१५%) बाजारात वाढ झाली असून एस अँड पी ५०० (०.१३%) बाजारात घसरण झाली होती. युरोपियन बाजारातील तिन्ही बाजारात वाढ झाली ज्यामध्ये एफटीएसई (०.०१%), सीएसी (०.०६%), डीएएक्स (०.१८%) यांचाही समावेश आहे.
आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात गिफ्ट निफ्टी (०.८१%) कोसळल्यानंतर निकेयी २२५ (०.८४%), तैवान वेटेड (०.२३%) बाजारात वाढ झाली असून इतर सगळ्या बाजारात अस्थिरतेचा फटका बसला ज्यामध्ये स्ट्रेट टाईम्स (०.५७%), कोसपी (०.५५%), शांघाई कंपोझिट (०.६८%), सेट कंपोझिट (०.१०%), हेंगसेंग (१.३१%) यांचा समावेश आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ एचईजी (१०.०४%), सॅजिलीटी इंडिया (७.२२%), जी ई व्हर्नोव्हा (५.०%), ग्राफाईट इंडिया (४.२%), सम्मान कॅपिटल (३.८४%), न्यू इंडिया ॲशुरन्स (३.५७%), जियो फायनांशियल सर्व्हिसेस (३.०४%), झी एंटरटेनमेंट (१.०४%), हिन्दुस्तान युनिलिव्हर (०.४०%), इमामी (१.३५%), टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (२.५६%), डीसीएम श्रीराम (१.३७%) या समभागात झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण हिताची एनर्जी (५.९३%), वेलस्पून (५.२२%), अपार इंडस्ट्रीज (४.८९%), इंडस टॉवर (४.६१%),आरती इंडस्ट्रीज (३.०५%), एचपीसीएल (३.२३%), एमआरपीएल (३.२५%), जेपी पॉवर वेचंर (३.१७%) भारत फोर्ज (३%), महानगर गॅस (२.१७%) या समभागात झाली.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की,'भारतावरील २५% कर आणि रशियाकडून ऊर्जा आणि संरक्षणाशी संबंधित खरेदीसाठी अनिर्दिष्ट दंड ही भारतीय निर्यातीसाठी आणि त्यामुळे अल्पावधीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या शक्यतांसाठी खूप वाईट बातमी आहे. भारतासोबत व्यापार वाटाघाटी सुरू असल्याने, कदाचित २५% कर अखेरीस कमी होऊ शकतो. परंतु निश्चितच, भारतीय निर्यात आणि जीडीपी वाढीवर अल्पकालीन फटका बसू शकतो. हा अल्पकालीन फटका शेअर बाजारावरही अल्पावधीत दिसून येईल.गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की ऑगस्टच्या मध्यात सुरू होणाऱ्या वाटाघाटींनंतर २५% कर कमी होईल. भारतावर लादलेला २५% कर इतर देशांसोबतच्या व्यापार करारांमध्ये पोहोचलेल्या दरांपेक्षा खूपच जास्त आहे. इतर क्षेत्रांमध्ये भारताकडून चांगले सौदे मिळवण्याची आणि शेवटी २०% किंवा त्यापेक्षा कमी दराने तोडगा काढण्याची ही ट्रम्पची सामान्य रणनीती आहे. निफ्टी २४५०० च्या समर्थन पातळीच्या खाली जाण्याची शक्यता कमी आहे. गुंतवणूकदार देशांतर्गत वापराच्या थीमवर लक्ष केंद्रित करून, विशेषतः खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकिंग नावांनी, दूरसंचार, पहिल्या तिमाहीत चांगली कामगिरी करणाऱ्या भांडवली वस्तू, सिमेंट, हॉटेल्स आणि निवडक ऑटो यामध्ये ' असे म्हटले.
यामुळेच आजच्या बाजारातील परिस्थितीवर लक्ष ठेवणे गुंतवणूकदारांना महत्वाचे ठरणार आहे.