Saturday, August 2, 2025

Stock Market: 'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: सेन्सेक्स निफ्टी घसरला! सकाळच्या ट्रम्प यांच्या धुमाकूळीनंतर भारतीय गुंतवणूकदारांची 'गुगली' इंट्राडे अर्ध्याहून अधिक 'रिकवर' 'या' कारणामुळे

Stock Market: 'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: सेन्सेक्स निफ्टी घसरला! सकाळच्या ट्रम्प यांच्या धुमाकूळीनंतर भारतीय गुंतवणूकदारांची 'गुगली' इंट्राडे अर्ध्याहून अधिक 'रिकवर' 'या' कारणामुळे

मोहित सोमण: आज शेअर बाजाराची अखेर अपेक्षित घसरणीनेच झाली आहे.सेन्सेक्स अखेरच्या सत्रात २९६.२८ अंकाने घसरत ८११८५.५८ पातळीवर स्थिरावला आहे.निफ्टी ५० हा ८६.७० अंकाने घसरत २४७६८.२५ पातळीवर स्थिरावला आहे.मात्र सकाळचे वारे काही प्रमाणात शांत झाल्याने बाजारातील घसरण काही प्रमाणात निवळली आहे. प्रामुख्याने काल युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उशीरा घोषित केलेल्या अतिरिक्त २५% टेरिफचा प्रभाव आज बाजारात सकाळच्या सत्रात पहायला मिळाला होता. मात्र अ निश्चिततेचे वारे वाहत असताना भारतीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात 'गुगली' टाकल्याने बाजार आज मोठ्या घसरणीच्या तोंडावर सावरला आहे. सकाळी झालेली मोठी घसरण 'इंट्रांडे' संध्याकाळपर्यंत सावरली आहे.अखेरच्या सत्रात सेन्सेक्स बँक निर्देशांका त १३०.६६ अंकांने घसरण झाली असून बँक निफ्टीत १८८.७५ अंकांनी घसरण झाली. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.७०%,०.८५% घसरण झाली असून निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.९३%,१.०५% घसरण झाली आहे.आज विशेषतः सकाळी ६% पेक्षा अधिक उसळलेला वीआयएक्स अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) अखेरच्या सत्रात मात्र ३.०१% स्थिरावला आहे ज्यामुळे अर्ध्यापेक्षा अधिक पातळीने अस्थिरता आटोक्यात येण्यास मदत झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढविले ल्या टेरिफ दरवाढीचा फटका भारतीय शेअर बाजाराला जरूर बसला असला तरी तो अधिक प्रमाणात काही क्षेत्रीय विशेष समभागात अधिक बसल्याने इतर समभागात झालेल्या वाढीमुळे बाजार अखेरच्या सत्रात तरले आहे. प्रामुख्याने इंटरग्लोब एव्हिऐशन, जि ओ फायनांशियल सर्व्हिसेस, हिंदुस्थान युनिलिव्हर, गोदरेज अँग्रोवेट, पेटीएम, आयटीसी सारख्या महत्वाच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने निर्देशांक सावरण्यास मदत झाली आहे.


दुसरीकडे फेड गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांनी युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात न करण्याच्या निर्णयामुळे बाजाराला काही प्रमाणात सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली. तटस्थ व्याजदर राहिल्याने, युएस व्याजदरात कुठलाही बदल न झाल्याने परदेशी संस्था त्मक गुंतवणूकदारांनी आज आपल्या गुंतवणूकीतील रोख गुंतवणूक कमी प्रमाणात काढून घेतल्याची शक्यता आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत फंडामेंटल मजबूत असल्याने भारतीय गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूकीला प्रोत्साहन दिल्याने ही घसरण नियंत्रित राह ण्यास मदत झाली. तसेच आगामी काळात बँक ऑफ जपान आपला वित्तीय पतधोरण निकाल जाहीर करू शकते त्याचाही परिणाम आशियाई बाजारात झाला होता.


निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) अखेरच्या सत्रात बहुतांश समभागात घसरणच झाली आहे. एफएमसीजी (१.४४%), मिडिया (०.१०%) वगळता इतर समभागात घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (१.४९%), तेल व गॅस (१.४८%), मिडस्मॉल हेल्थकेअर (१.११%), फार्मा (१.३१%), मिडस्मॉल हेल्थकेअर (१.०७%) समभागात झाली आहे. आज सोन्याच्या निर्देशांकात मोठ्या प्रमाणात संध्याकाळपर्यंत घसरण झाली आहे. भारतीय बाजारपेठेत पुन्हा एकदा सोने स्वस्त झाले ते प्रामुख्याने अस्थिरतेच्या कारणामुळे झाले आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या घटत्या मागणीमुळे सोन्याचे प्रमाण मुबलक प्रमाणात असल्याने दरवाढ नियंत्रणात आली. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.१७% घसरण झाली. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या (Crude Oil) मध्ये जागतिक पातळीवरील मागणीत घसरण झाल्याने तेलाचे भावही थंड झाले. भारता तही तीच परिस्थिती कायम राहिल्याने भारतीय कमोडिटी बाजारातील कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली. जागतिक पातळीवरील विचार केल्यास संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकात ०.४१% घसरण झाली असून Brent Future निर्दे शांकात ०.५७% घसरण झाली आहे.


डॉलरच्या तुलनेत रुपयात १७ पैशांची घसरण झाल्याने शेअर बाजारात व सोन्यातही त्याचा सकारात्मक परिणाम जाणवला. भारतीय बाजारपेठेत आज परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी घसरत्या डॉलरच्या बदल्यात भारतीय बाजारपेठेत नफा बुकिंग केली अस ण्याची शक्यता आहे. भारतीय गुंतवणूकदारांनी अस्थिरतेच्या तोंडावर चांगला प्रतिसाद दिला. भारत टेरिफ वाढीला प्रतिसाद न देता राष्ट्रीय हितासाठी जे पर्याय आहेत ते अंगिकारेल असे उद्योग मंत्रालयाने म्हटल्यावर गुंतवणूकदारांना एकप्रकारे आत्मविश्वास मिळा ला होता.ज्याचा विशेष लाभ एफएमसीजी क्षेत्रात मिळाला मात्र अजूनही कंज्यूमर प्रोडक्ट, टेक्साटाईल, मेटल, खाद्यपदार्थ, इलेक्ट्रॉनिक्स यांच्यातील दबाव पातळी अजूनही संपली नाही किंबहुना त्याचाही परिणाम आगामी शेअर बाजारात बसू शकतो.


आज बीएसईत अखेरच्या सत्रात ४१५३ कंपनीच्या समभगापैकी १६०२ समभागात वाढ झाली असून २४१६ समभागात घसरण झाले दुसरीकडे एनएसईत ३०४४ कंपनीच्या समभागापैकी १०४७ समभागात वाढ झाली असून १९०७ समभागात घसरण झाली आहे. स काळी टेरिफचा निकाल येतात बीएसईत गुंतवणूकदारांचे ५.५ लाख कोटीचे नुकसान झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते जे नंतर इंट्राडेत रिकव्हर झाले आहे. याशिवाय अमेरिकेतील प्रशासनाने भारतीय सहा कंपन्यांवर इराणकडून तेल घेतल्याने प्रतिबंध ला वल्याचे म्हटले होते. याशिवाय ट्रम्प यांनी यापूर्वीच डॉलर घसरवण्यासाठी ब्रिक्स देश जबाबदार असल्याचे म्हटले होते. यासाठीच अमेरिकेन प्रशासनाने भारताचा ब्रिक्स राष्ट्रात असलेल्या समावेशामुळे प्रतिबंधक दंडाशिवाय आणखी काही पेनल्टी लावण्याचे ठरव ले आहे. यामुळेच बाजारातील अस्थिरता पाहताना देखील भारताची त्यातुलनेत झालेली घसरण पाहता निर्देशांक समाधानकारक पातळीवर म्हणावे लागेल.


आज युएस बाजाराच्या सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.२७%), नासडाक (०.१५%) बाजारात वाढ झाली आहे. घसरण एस अँड पी ५०० (०.१३%) मध्ये झाली. युरोपियन बाजारातील एफटीएसई (०.३९%) बाजारात झालेली वाढ वगळता इतर सीएससी (०.३४ %), डीएएक्स (०.०५%) समभागात घसरण झाली आहे. अखेरच्या सत्रानंतर आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टीसह (०.०२%) स्ट्रेट टाईम्स (१.०९%), हेंगसेंग (१.७७%), सेट कंपोझिट (०.१४%), जकार्ता कंपोझिट (०.८८%), शांघाई कंपोझिट (१.१९%) समभागा त घसरण झाल्याने आशियाई बाजारातील दबाव स्पष्ट झाला आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले की,'अमेरिकेची उसवत उसवत गर्तेत गेलेली अर्थव्यवस्था शिवण्याचे काम ट्रम्पं यांच्यावर आलेले आहे. जागतिक बॅक व आयएमएफ (IMF) कडुन घेत लेले कर्जावरील व्याज भरणेही शक्य होत नाहीये अशा परिस्थितीत एक विचित्र स्वभावाचा लहरी अध्यक्ष निवडला गेला आहे.जो या बँकांच्या डिफाल्टर लिस्ट मधे नाव येऊ नये यासाठीच टेरिफचे शस्त्र घेऊन आला आहे. जागतिक पातळीवर युद्धसामग्रीची विक्री म्हणावी तशी होत नाही.त्यातच धर्मादाय खर्च खूप होते.थोडक्यात स्वःताचे कर्जावरील डोंगर कमी करून घर व्यवस्थित करायची जबाबदारी या ट्रम्प महाशयांवर आली आहे. अनेक शासकीय खर्च व अधिकारी वर्गाला नारळ देण्यात आला आहे.आता थेट आयात शुल्क अचानकपणे २५% आकारण्यात येत आहे. त्यातील अनेक शुल्क अमेरिकन जनतेवर पास ऑन होणार आहेत.तरीही कोणीही अमेरिकेत कारखाने काढण्याची भाषा करत नाहीत .होंडा व टोयाटो तर अमेरिकेतील कारखाने बंद करून इतर देशात नेण्याचे ठरवले आहे.५५००० अमेरीकन बेकार होणार आहेत.ज्या पध्दतीने टेरिफचे चर्वितचर्वण मागील सात महिन्यांपासून सूरू आहे त्याला एक गोंडस नाव दिलं 'रेसिपरोकल टेरिफ'.अमेरिकन सरकार कर्जावरील हप्ते भरू शकत नाहीये हे जगजाहीर होऊ नये म्हणुन प्रत्येक देशाला वेगळा नियम प्रत्येक देशाला वेगळे करून फालतू विषयात गुंतवून ठेवले.व अमेरिकेच्या कर्जाची चर्चे एवजी टेरिफची चर्चा होत राहीली.


रेसिप्रोकल टेरिफ हा एक खोटा नरेटिव मांडण्यात आला.या मागे अमेरिकेचे अपयश दडवणे आहे.आज ब्राझील,साऊथ अफ्रिकेसारखे देश अमेरिकेला मोजत नाहीत. अमेरीकेची संपत चाललेली आर्थिक ताकद व ही ताकद युद्ध सामग्रीच्या विक्रीतून उभी राहत असते, त्याक्षेत्रात भारताची एन्ट्री व ऑपरेशन सिंदुरसारखा लाईव्ह डेमो... हे सर्व असह्य होऊन २५ % टेरिफ लादलं आहे जे जगात सर्वात जास्त आहे. आज भारताची अमेरिकेत संपूर्ण निर्यातीपैकी २ ते २.५% आहे.जर भारताने ठरवलं तर १९० देशांमधुन सहज त्याही पेक्षा जास्त निर्यात होणार आहे. एक संवेदनशील व सक्षम व भारतीय देशहित जपणारं सरकार आपल्याला लाभलं आहे त्याचीही पोटदुखी गेले ११ वर्षापासून अमेरिकेला आहेच. कोरोना काळात सर्वात स्वस्त लस जगाने वापरली... २५% टेरिफ हे ट्रम्पने भारताला दिलेलं एक चैलेंज भारत सहज स्विकार करून पुढील काळात सहज अमेरिकेपेक्षा जास्त निर्यात इतर देशात करू शकेल हे निर्विवाद आहे.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,' नव्याने टेरिफच्या धोक्यांमुळे झालेल्या अशांत सुरुवातीनंतर, भारतीय बाजार निराशावादी स्थितीत सुरू झाला.तथापि, देशांतर्गत बाजाराने चांगली सुधारणा करण्याचा प्रयत्न केला परंतु दिवसाच्या अखेरीस तो किरकोळ तोट्यासह बंद झाला, मासिक मुदत संपण्याच्या दिवशी. गुंतवणूकदारांनी स्थानिक पातळीवर केंद्रित,विवेकाधीन नसलेल्या खेळाडूंकडे, विशेषतः एफएमसीजीक डे आकर्षित झाले, जे आकर्षक मूल्यांकन, मागणीचा दृष्टिकोन आणि टेरिफ जोखमींपासून सापेक्ष इन्सुलेशन देत होते. याउलट,भारतीय ऊर्जा आयातीबद्दल अमेरिकेच्या इशाऱ्यांमुळे तेल आणि वायू समभागांना सर्वाधिक फटका बसला. एकूणच, बाजाराने सावध परंतु निवडक दृष्टिकोन दर्शविला. जवळच्या काळात अधिक अनुकूल टॅरिफ निकालासाठी बाजाराला अजूनही उच्च आशा आहेत.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की,'अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% कर आणि दंडात्मक उपाययोजना लादल्याचे परिणाम बाजारातील सहभागींनी पचवल्यामुळे दलाल स्ट्रीटच्या व्यवहारात अस्थिरता आली. बेंचमार्क निर्देशांक निफ्टी ५० आणि सेन्सेक्स  कमकुवत नोटवर उघडले, जवळजवळ १% घसरले, त्यानंतर दिवसाच्या आत तीव्र पुनर्प्राप्ती झाली आणि २४९०० अंकांवर परत आले. तथापि,व्यापाराच्या शेवटच्या तासात पुन्हा विक्रीच्या दबावामुळे निर्देशांक पुन्हा नकारात्मक क्षेत्रात आले. निफ्टी ५० अखेर ८६.७० अंकांनी किंवा ०.३५% ने घसरून २४७६८.३५ पातळीवर स्थिरावला. क्षेत्रीय व्याप्ती मोठ्या प्रमाणात नकारात्मक होती, निफ्टी एफएमसीजी निर्देशांक वगळता सर्व प्रमुख निर्देशांक लाल रंगात संपले, ज्यामुळे ट्रेंडला धक्का बसला आणि १.३% वाढ झाली. एफएमसीजी नावांमधील कामगिरी वाढत्या अस्थिरतेमुळे आणि क्षेत्रातील हेवीवेट हिंदुस्तान युनिलिव्हरच्या उत्साही भाष्यांमुळे बचावात्मक खरेदीमुळे झाली.


दुसरीकडे, निफ्टी मेटल, निफ्टी ऑइल अँड गॅस आणि निफ्टी फार्मा यासारख्या उच्च-बीटा क्षेत्रांना विक्रीचा फटका सहन करावा लागला, कारण ते टॅरिफ घोषणेमुळे वाढलेल्या जागतिक मागणीच्या चिंतेमुळे तसेच सतत मार्जिन संकुचिततेमुळे होते. व्यापक बाजा रपेठांनी सावधगिरीचे प्रतिबिंब दाखवले, निफ्टी मिडकॅप १०० आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक सुमारे १% घसरले. जोखीम-बंद भावना प्रबळ झाली, गुंतवणूकदार चक्रीय खेळी सोडून बचावात्मक मार्गाकडे वळले, ज्यामुळे समष्टि आर्थिक अनिश्चिततेमध्ये सु रक्षिततेकडे उड्डाण झाल्याचे दिसून आले.'


आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की,' १०० दिवसांच्या ईएमए (Exponential Moving Average EMA) च्या आसपास एकत्रीकरण (Consolidation) सुरू असताना दिवसाच्या आत अस्थिरतेवर दीर्घकाळ प्रकाश टाकणारा वरचा सावली असलेला निर्देशांक बुल कॅन्डल (Bull Candle) बनवला. अमेरिका-भारत टेरिफ निर्णय आणि आरबीआयचा (RBI) दर निर्णय यासारख्या प्रमुख मॅक्रो ट्रिगर्समुळे येणाऱ्या सत्रांमध्ये अस्थिरता वाढण्याची अपेक्षा आहे. आम्हाला वा टते की नजीकच्या काळात निर्देशांक २४५००-२५००० पातळीच्या परिभाषित श्रेणीत एकत्रीकरण करत राहील.नकारात्मक बाजूने, २४६००-२४४०० झोन (Zone) एक गंभीर मागणी क्षेत्र म्हणून उदयास येतो, जो प्रमुख तांत्रिक पातळींचा संगम दर्शवितो. पूर्वीचा स्विंग लो, १००-दिवसांचा एक्सपोनेन्शियल मूव्हिंग अँव्हरेज (EMA) आणि २३९३५ वरून २५६६९ पातळीपर्यंतच्या अलीकडील वरच्या हालचालीचा ६१.८% फिबोनाची रिट्रेसमेंट आहे.'


आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की,' मासिक F&O समाप्ती दरम्यान स्टॉक विशिष्ट कृती दरम्यान बँक निफ्टीने एक तेजीची कँडल तयार केली ज्यामध्ये दीर्घ खालच्या सावलीचे संकेत एकत्रीकरण झाले. गु रुवारी सत्रात निर्देशांक ५५५००-५५००० क्षेत्राच्या प्रमुख समर्थन क्षेत्रापासून (Support Zone ) पुनरागमन झाला, जो १००-दिवसांच्या ईएमए (EMA) आणि मागील वरच्या हालचालीच्या प्रमुख फिबोनाची रिट्रेसमेंट पातळींचा संगम (Integration) होता जो उच्च-संभाव्य ता मागणी क्षेत्र म्हणून अधोरेखित करतो. उच्च बाजूने की प्रतिरोध ५६३००-५६,श५०० पातळींवर ठेवला आहे जो अलिकडच्या ब्रेकडाउन क्षेत्राचा खालचा बँड आहे.एकूणच येत्या सत्रांमध्ये निर्देशांक ५५०००-५६४००पातळीच्या श्रेणीत एकत्रित (Consoli dation) होण्याची शक्यता आहे.'


त्यामुळे एकूणच बाजारातील अस्थिरतेचा प्रभाव पाहता उद्या शेअर बाजारात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तत्पूर्वी ब्लू चिप्स कंपनीच्या शेअर्सबरोबर आगामी तिमाही निकालही बाजाराची दिशा ठरवू शकतात.

Comments
Add Comment