रायगड पोलिसांनी केला ‘डिजीटल अरेस्ट’ रॅकेटचा पर्दाफाश

  50

३५ मोबाईलसह ६१७५ सिमकार्ड जप्त, ११ आरोपींना अटक


अलिबाग : वयोवृद्ध नागरिकांना फसवण्यासाठी ‘डिजीटल अरेस्ट’च्या नावाखाली सुरू असलेल्या अत्याधुनिक सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश करत रायगड सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या गुन्ह्याच्या तपासात एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे ६६ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक उघड झाली आहे. आरोपींनी टेलिकॉम कंपन्यांच्या एसआयपी लाईन्सचा गैरवापर करत, बनावट कागदपत्रांद्वारे देशभरातील नागरिकांना फसवले. हे आरोपी विविध बनावट कंपन्यांच्या नावावर नागरिकांना बनवताना आढळले असून, त्यांच्या कब्जातून तब्बल ६१७५ सिमकार्ड्स, ३५ मोबाईल फोन, लॅपटॉप, स्टँप, रोकड व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.


ही कारवाई २३ मे २०२५ रोजी दाखल तक्रारीच्या अनुषंगाने सुरू करण्यात आली होती. आरोपींनी बनावट कंपन्या उघडून त्याद्वारे लोकांकडून कर्ज, ऑनलाइन नोकऱ्या, इन्व्हेस्टमेंट, स्कॉलरशिप आदींच्या आमिषाने लाखो रुपये उकळले. यात वापरलेले मोबाइल नंबर, सिमकार्ड्स, SIP LINE, आणि बनावट कागदपत्रे हे सर्व देशभरात सक्रिय असलेल्या संगठित सायबर टोळीचे पुरावे म्हणून समोर आले आहेत. या कारवाईत ३५ मोबाईल फोन्स, ४ रबर स्टँप, १ अमेझॉन कंपनीचा टॅब, १ डेल कंपनीचा लॅपटॉप, १ सोनी कंपनीचा डीपीएन स्वीच पोर्ट, १ पी.ओ.ई. स्विच, १ बँक पासबुक, कॅनरा बँक एटीएम, रोख रक्कम ६.६ लाख रुपये, ६ हजार १७५ सिम कार्डस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.



११ अटक आरोपींमध्ये अब्दुस सलाम बारभुयान, बिलाल फैजान अहमद, नदीम महमद अस्लम अहमद, लारैब मोहम्मद रफीक खान, शादान येतात अहमद खान, मोहम्मद फैसल सैराउद्दीन खान, बलमोरी विनयकुमार राव, गंगाधर गंगाराम मूटटन, अमन संतराम प्रकाश मिश्रा, मोहसिन मियां खान आणि शम्स ताहीर खान यांचा समावेश आहे. या टोळीचा प्रमुख आरोपी आदित्य उर्फ अभय मिश्रा उत्तर प्रदेशातील असून, तो ऑनलाईन स्कॉलरशिप व नोकरीच्या आमिषाने लोकांकडून पैसे उकळत होता. तो भारत, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका आदी देशांतील नागरिकांशी संपर्क साधून फसवणूक करत असे.


नागरिकांनी सतर्क राहावे, कोणत्याही अपरिचित व्यक्तीकडून आलेल्या कॉल/संदेश/ई-मेलवर विश्वास ठेवू नये. सायबर फसवणूक झाल्यास सायबर हेल्पलाईन १९३०, १९४५ किंवा १४४०७ वर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधिक्षक आँचल दलाल यांनी केले आहे.

Comments
Add Comment

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

मतदार यादीतून माझे नाव गायब होऊ शकते तर..., तेजस्वी यादवच्या या आरोपावर निवडणूक आयोगाचे आले स्पष्टीकरण

पाटणा : बिहारच्या मतदार यादीतून तेजस्वी यादव यांचे नाव वगळण्यात आलेले नाही. पाटणा जिल्हा प्रशासनाने तेजस्वी

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा