
मुंबई : संपूर्ण देशाच लक्ष लागून राहिलेल्या २००८ रोजी झालेल्या मालेगाव बॉम्ब स्फोट खटल्याचा विशेष NIA न्यायालयाने आज मोठा निकाल दिला आणि साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केलं. तब्बल १७ वर्षानंतर NIA कोर्टाने हा निकाल दिला. मालेगावच्या भिक्कू चौकात २९ सप्टेंबर २००८ला बॉम्बस्फोट झाला होता. या बॉमस्फोट प्रकरणात ६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, १०१ पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले होते. आज न्यायाधीश एके लाहोटी यांच्या कोर्टाने निकाल दिला. यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर मुख्य आरोपी होत्या. निकाल वाचन करताना न्यायालयाने एक महत्त्वाच निरीक्षण नोंदवलं. बॉम्बस्फोटासाठी ज्या बाईकचा वापर झाला, ती बाईक साध्वीची होती हे सिद्ध होत नाही असं कोर्टाने म्हटलय. त्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला.
साध्वीच्या बाईकबद्दल NIA कोर्टाने काय म्हटलं?
बाईकवर ब्लास्ट झाला हे सिद्ध झालेलं नाही, असं कोर्टाने म्हटलंय. आधी नाशिक पोलीस नंतर एटीएस आणि नंतर एनआयए अशा यंत्रणांनी तपास केलेला आहे. बॉम्ब स्फोटानंतर तिथे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. बोटांचे ठसे सापडले नाही. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या नावाने असलेल्या बाईकचा चेसिस नंबर नीट सापडला न्हवता. नंबरप्लेट व्यतिरिक्त चेसिस नंबर आवश्यक असतो. आरोपींमध्ये बैठका झाल्याचा पुरावाही तपास यंत्रणांना आढळला नाही. याप्रकरणाचा कट शिजला असे सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे रेकॉर्डवर नाहीत. साध्वीच्या नावाने बाईकचा चेसिस नंबर नीट नव्हता. मोबाईलमधूनही फार काही पुरावेसुद्धा आढळले नाहीत.

मुंबई : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज अखेर लागला… आणि तब्बल १७ वर्षांनंतर विशेष NIA न्यायालयाने सर्व ७ आरोपींना निर्दोष मुक्त केलं! ...
नेमकं काय झालं होतं ?
२९ सप्टेंबर २००८ साली रमजान महिन्यात झालेल्या स्फोटात ६ जणांचा मृत्यू तर शंभरहून अधिक जखमी झाले होते. मशिदी जवळ ठेवण्यात आलेल्या दुचाकीचा स्फोट झाला होता. याप्रकरणी भाजप नेत्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित तसेच मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर आरोप आहेत. १९ एप्रिलला सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आरोपींना योग्य ती शिक्षा देण्याची मागणी एनआयएने केली होती. मालेगावात स्फोट घडवून मुस्लिम समाजात भीतीचं वातावरण पसरवून सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याच कारस्थान असल्याचं एनआयएचं म्हणणं आहे. संपूर्ण गटात आरोपींचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा पुराव्यानिशी स्पष्ट होत असल्याचं एनआयए म्हणणं आहे. मालेगाव स्फोटांचा सुरुवातीचा तपास हा दहशतवाद विरोधी पथक एटीएस ने केला होता तर २०११ साली तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे हस्तांतरित करण्यात आला होता. ७ आरोपींवर आरोप निश्चिती केल्यानंतर २०१८ मध्ये प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. आरोपींवर युएपीए कायद्याच्या दहशतवादी कृत्य करणे आणि दहशतवादी कृत्य करण्याचा कट रचणे तसेच भारतीय दंड संहितेच्या हत्या, हत्येचा प्रयत्न तसेच धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप आहे. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने ३२३ साक्षीदार तपासले असून त्यातील ३७ साक्षीदार फितूर झाले. ज्या दुचाकीत स्फोटक ठेवण्यात आली होती ती साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरची असल्याचा एटीएसचा दावा होता. २३ ऑक्टोबर २००८ मध्ये साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सुरू झालेल्या अटक सत्रात १४ नोव्हेंबर पर्यंत एकूण ११ जणांना अटक करण्यात आली. एटीएसने या प्रकरणी मोक्का लावला होता मात्र नंतर मोक्का मागे घेण्यात आला.