Saturday, October 25, 2025
Happy Diwali

स्कूल व्हॅनसाठी राज्य शासन तयार करणार नवी नियमावली

स्कूल व्हॅनसाठी राज्य शासन तयार करणार नवी नियमावली
मुंबई : स्कूल व्हॅनसाठी महाराष्ट्र शासन नवी नियमावली तयार करणार आहे. रा आसनांपर्यंत विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना स्कूल व्हॅनचा दर्जा देण्याची तरतूद या नियमावलीत असेल. राज्याच्या गृह विभागाने महाराष्ट्र मोटार वाहने शालेय बस नियम, २०११ मध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार, बारा प्रवाशांपर्यंत बसण्याची क्षमता असलेले वाहन जे विशेषतः शाळेत जाणाऱ्या मुलांन वाहून नेण्यासाठी तयार केले आहे आणि चाचणी संस्थेने जारी केलेल्या प्रकारातील मान्यता प्रमाणपत्र प्राप्त आहे अशा वाहनांन स्कूल व्हॅनचा दर्जा देण्यात येणार आहे. तेरा आणि त्याहून अधिक विद्यार्थ्यांची बसण्याची क्षमत असलेल्या वाहनाला स्कूल बसचा दर्जा देण्यात येणार आहे. स्कूल व्हॅनची व्याख्या आणि सुरक्षा नियमावली निश्चित झाल्यावर राज्यातील हजारो वाहनांना अधिकृत विद्यार्थी वाहनांचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. स्कूल व्हॅन आणि स्कूल बस यांच्या मालकांची संघटना तसेच शाळा प्रशासन, वाहतूक पोलीस या सर्व यंत्रणांशी समन्वय साधून नियम निश्चित करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. या व्यवस्थेतून एक ठोस नियमावली केली जाईल. यामुळे विद्यार्थ्यांचा घर ते शाळा आणि शाळा ते घर हा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होण्यास मदत होणार आहे.
Comments
Add Comment