राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ

  70

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत योजनेअंतर्गत साहित्य आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील पन्नास वर्षावरील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत वाढ देण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी घोषित केले आहे.

राज्यामधील राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान या योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ ही होती. राज्यातील अनेक कलाकार व कलाकार संघटनांनी ही मुदत वाढवावी अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली होती.

त्यांच्या विनंतीनुसार या योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात येणार आहे, अशी घोषणा मंत्री शेलार यांनी केली आहे. या संदर्भात सांस्कृतिक कार्य संचालनालयाने योग्य ती कार्यवाही करावी असे निर्देशही दिले आहेत.
Comments
Add Comment

दादर परिसरातील कबुतरांचे अन्यत्र स्थलांतर!

सोलो इमारत, पिंपळाच्या झाडांवरील वास्तव्य कमी लोकांच्या अंगावर होणारा विष्ठेचा अभिषेकही थांबला मुंबई :

सिक्रेट लॉकचा पर्दाफाश; हायवेलगतच्या टार्जन डान्सबारवर पोलिसांची धडक कारवाई, ५ बारबालांची सुटका

मुंबई : पनवेलसह मुंबईत डान्सबार सर्रास सुरू असल्याची अनेकदा प्रकरणं समोर आली आहेत. काही महिन्यांपूर्वी तर थेट

Mumbai High Court: बाणगंगेत गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन नाही, मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

मुंबई: बाणगंगा तलावात पर्यावरणपूरक मूर्तींचे विसर्जन करू देण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

जीएसटी स्लॅब बदलांमुळे दिलासा : एकनाथ शिंदे

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) रचनेतील ताज्या बदलांना

भुजबळांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील बहिष्कारावर मुख्यमंत्र्यांचं सर्वात मोठं विधान

"जोपर्यंत हे राज्य आहे, तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही.":  मुख्यमंत्री मुंबई:

टायगर मेमनच्या नातेवाईकांचा फ्लॅटवरील हक्क कोर्टाने फेटाळला

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी टायगर मेमनच्या नातेवाईकांनी दाखल केलेली याचिका