
मुंबई : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज अखेर लागला… आणि तब्बल १७ वर्षांनंतर विशेष NIA न्यायालयाने सर्व ७ आरोपींना निर्दोष मुक्त केलं! पुरावे ठोस नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयाने या प्रकरणात मोठा निकाल दिला आहे. आज मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला. यात संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली होती. आज विशेष न्यायालयाने निकाल देताना न्यायाधीश ए. के. लाहोटींकडून निकालाचं वाचन करण्यात आलं होतं.
साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, यांच्यासह अनेकांवर याप्रकरणी आरोप लावण्यात आले होते. या बॉम्बसफोट प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुंबई : १७ वर्षे न्यायालयीन सुनावणी, हजारो पुरावे आणि शेकडो साक्षीदार! २९ सप्टेंबर २००८साली मालेगाव शहर हादरवणाऱ्या भीषण बॉम्बस्फोटाला (Malegaon Blast Case Verdict) आज ...
नेमकं काय झालं होतं ?
२९ सप्टेंबर २००८ साली रमजान महिन्यात झालेल्या स्फोटात ६ जणांचा मृत्यू तर शंभरहून अधिक जखमी झाले होते. मशिदी जवळ ठेवण्यात आलेल्या दुचाकीचा स्फोट झाला होता. याप्रकरणी भाजप नेत्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित तसेच मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर आरोप आहेत. १९ एप्रिलला सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आरोपींना योग्य ती शिक्षा देण्याची मागणी एनआयएने केली होती. मालेगावात स्फोट घडवून मुस्लिम समाजात भीतीचं वातावरण पसरवून सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याच कारस्थान असल्याचं एनआयएचं म्हणणं आहे. संपूर्ण गटात आरोपींचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा पुराव्यानिशी स्पष्ट होत असल्याचं एनआयए म्हणणं आहे. मालेगाव स्फोटांचा सुरुवातीचा तपास हा दहशतवाद विरोधी पथक एटीएस ने केला होता तर २०११ साली तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे हस्तांतरित करण्यात आला होता. ७ आरोपींवर आरोप निश्चिती केल्यानंतर २०१८ मध्ये प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. आरोपींवर युएपीए कायद्याच्या दहशतवादी कृत्य करणे आणि दहशतवादी कृत्य करण्याचा कट रचणे तसेच भारतीय दंड संहितेच्या हत्या, हत्येचा प्रयत्न तसेच धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप आहे. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने ३२३ साक्षीदार तपासले असून त्यातील ३७ साक्षीदार फितूर झाले. ज्या दुचाकीत स्फोटक ठेवण्यात आली होती ती साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरची असल्याचा एटीएसचा दावा होता. २३ ऑक्टोबर २००८ मध्ये साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सुरू झालेल्या अटक सत्रात १४ नोव्हेंबर पर्यंत एकूण ११ जणांना अटक करण्यात आली. एटीएसने या प्रकरणी मोक्का लावला होता मात्र नंतर मोक्का मागे घेण्यात आला.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण काय ?
तारीख – २९ सप्टेंबर २००८
वेळ – रात्री ९:३५ नवरात्रीच्या पूर्वसंध्येला, रमजान महिन्यात
एकूण स्फोट – एक
ठिकाण – भिक्खू चौकातील एका हॉटेलजवळ
मृत्यू – ६ ठार, १०१ जखमी
तपास – एटीएस आणि त्यानंतर एनआयए तपासात सामील
आरोपींची नावे
१. प्रसाद पुरोहित
२. साध्वी प्रज्ञासिंह
३. समीर कुलकर्णी
४. रमेश उपाध्याय
५. अजय राहिरकर
६. सुधाकर द्विवेदी
७. सुधाकर चतुर्वेदी
८. रामजी कालसंग्रा – फरार
९. शामजी साहू – फरार
१०. संदीप डांगे – फरार
११. प्रविण तकलकी – फरार
१२. राकेश धावडे - फरार