UPI Transactions: महत्वाचे! उद्यापासून UPI Payment व्यवहारात आमूलाग्र बदल आता व्यवहारासाठी Face Verification आणखी काही बदल झालेत ते जाणून घ्या...

प्रतिनिधी:उद्या १ ऑगस्टपासून युपीआय (Unified Payment Interface UPI) नियमावलीत खूप मोठा बदल होणार आहे. ज्यामध्ये युपीआयकडून फेस व्हेरिफिकेशनचा ऑप्शन ग्राहकांना उपलब्ध होऊ शकतो. आतापर्यंत केवळ पिनचा अथवा फिंगरप्रिंटचा वापर केला जात असे आता मात्र फेस व्हेरिफिकेशनचा वापर करून आपले युपीआय अकाउंट ग्राहकांना हाताळता येणार आहे. व्यवहारातील धोरणात्मक पारदर्शकता वाढविण्यासाठी युपीआयने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय इतर काही नियमावलीत मोठे ब दल केले आहेत.आतापर्यंत ४ अंकी पिन आधारे ग्राहक पेमेंट करू शकत असे मात्र हा कोड पिन नंबर तिराईताला माहिती पडल्यास घोटाळ्याची शक्यता अधिक असते. अशा घटना वारंवार घडल्याने हे बदल करण्याचे युपीआयचे नियामक मंडळएनपीसीआयने (National Payment Corporation of India) ठरवले आहे.

बायोमॅट्रिक आधारे पेमेंट -

आता आपल्याला बायोमेट्रिक आधारे पेमेंट करावे लागणार आहे. म्हणजेच युपीआय बायोमेट्रिकला आवश्यक असणारे सेंसर युपीआय तंत्रज्ञानात वापरू शकते. त्यामुळे अधिक पारदर्शकता येईल असे सांगण्यात आले आहे.

सर्व युपीआय सेवा प्रदात्यांना (Service Providers) ३१ जुलैपर्यंत त्यांच्या अँप्समध्ये हे बदल पूर्णपणे समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि नवीन नियम १ ऑगस्टपासून लागू केले जातील. एनपीसीआयने असा इशारा दिला आहे की पालन न केल्यास शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.

आणखी काय महत्वाचे बदल युपीआयमध्ये केले आहेत?

१. बॅलन्स चेक मर्यादा

वापरकर्त्यांना प्रत्येक युपीआय अँपमध्ये दिवसातून फक्त ५० वेळा बँक बॅलन्स तपासण्याची परवानगी असणार आहे. NPCI दिलेल्या माहितीनुसार, सर्वात लक्षणीय बदलांपैकी एक म्हणजे प्रत्येक युपीआय अँपसाठी दररोज ५० बॅलन्स चौकशीची मर्यादा असणार आहे त्याहून अधिक वेळा शिल्लक चेक करता येणार नाही. युपीआय व्यवहारात प्रचंड वाढ झाल्याने वाढता लोड कमी करण्यासाठी (API Load) कमी करण्यासाठी ही मर्यादा डिझाइन केली गेली आहे. जर एखाद्या वापरकर्त्याने ही मर्यादा गाठली तर त्या विशिष्ट अँपवर पुढील बॅलन्स चेक २४ तासांसाठी ब्लॉक केले जातील असे नियामकांनी म्हटले आहे.

२. ऑटो-बॅलन्स डिस्प्ले

प्रत्येक यशस्वी युपीआय व्यवहारानंतर, उपलब्ध बॅलन्स स्वयंचलितपणे (Automatic) डिस्प्ले ह़ोऊ शकतो.ज्यामुळे वारंवार मॅन्युअल तपासणीची फार गरज भासणार नाही.

३. व्यवहार तपासणी अनेकदा होणार प्रतिबंधित 

वापरकर्त्यांना प्रलंबित व्यवहाराची स्थिती दिवसातून फक्त तीनदाच तपासण्याची परवानगी असणार आहे. प्रत्येक तपासणीचा प्रयत्नात ९० सेकंदांचा अनिवार्य अंतर असणे आवश्यक असेल

४) अकाउंट लिंकिंग कॅप

वापरकर्ता आता एकाच युपीआय अँपवर दररोज २५ बँकट खातीच लिंक करू शकणार आहे. हे मोबाइल नंबर वापरून बँक खात्याचे तपशील मिळविण्यासाठी लागू होते मात्र आता बँकिंग एपीआय (API) मधील ऑनलाईन रहदारी चांगल्या प्रकारे नियंत्रित करण्यासाठी ही मर्यादा घालण्यात आली आहे.

५) प्राप्तकर्ताचे नाव दिसणे (दृश्यमानता) (Payee Name Visibility) -

पैसे हस्तांतरित करण्यापूर्वी, यूपीआय अँप्सनी त्यांच्या बँकेत नोंदवलेल्या पेईचे नोंदणीकृत नाव प्रदर्शित केले पाहिजे असा नियम लागू केला गेला आहे.

६) ऑटो-डेबिट विंडो प्रतिबंधित

आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे मासिक सबस्क्रिप्शन, ईएमआय किंवा गुंतवणूक हप्ते यासारख्या ऑटो-डेबिट आदेशांचाही (Auto Debit Orders) समावेश आहे.

हे शेड्यूल केलेले पेमेंट आता फक्त नॉन-पीक अवर्समध्ये प्रक्रिया केले जातील जेणेकरून इतर दैनंदिन उच्च-व्हॉल्यूम व्यवहारिक (Transactional) विंडो सुलभ होतील. आवर्ती पेमेंट (EMI),ओटीटी सबस्क्रिप्शन, म्युच्युअल फंड एसआयपी) आता फक्त नॉन-पीक अवर्समध्ये प्रक्रिया केले जातील असे एनपीसीआयने म्हटले आहे.

या काळात मर्यादा लागू -

रात्री ९:३० नंतर

सकाळी १०:०० पूर्वी
Comments
Add Comment

Nashik : नोकरीचे आमिष दाखवले अन् ३ लाख ३० हजार उकळले, गुन्हा दाखल

Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Gold Rate Today : ग्राहकांना सोन्यासारखी संधी! बाजारात सोन्याचे दर घसरले; पहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यातच सोन्याच्या दरात सलग

Nashik : वीज चोरी प्रकरणांतील कामात हलगर्जीपणा नडला, महावितरणचे कार्यकारी अभियंता निलंबित

Nashik : १ कोटी ४६ लाख रुपयांच्या औद्योगिक वीज चोरी प्रकरणातील वसुली आणि कायदेशीर कारवाईचे प्रकरण रेंगाळत ठेवणे, तसेच

PM Modi SCO Summit : बिश्केकमध्ये पंतप्रधान मोदींची पुतीन, पेझेश्कियन यांच्याशी भेट; वर्ल्ड नोमॅड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थिती

बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन