Thursday, September 18, 2025

Schindler Electric India: मोठी बातमी, शिंडलर इलेक्ट्रिककडून भारतात ५.५ अब्ज डॉलरचा 'हा' मोठा करार

Schindler Electric India: मोठी बातमी, शिंडलर इलेक्ट्रिककडून भारतात ५.५ अब्ज डॉलरचा 'हा' मोठा करार

प्रतिनिधी:शिंडलर इंडिया व शिंडलर इलेक्ट्रिक यांच्यात मोठा करार झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. आज उर्वरित राहिलेला ३५% भागभांडवल हिस्सा (Stake) शिंडलर इलेक्ट्रिक इंडिया (Schindler Electric India) सिंगापूरच्या टेमासेक (Temasek) कंपनीकडून रोख रक्कमेने खरेदी करणार आहे. ५.५ अब्ज डॉलरचा हा व्यवहार असणार आहे. यासाठी भारततील सौद्यांसाठी असलेले नियामक मंडळ सीसीआयकडून (Competition Commission of India CCI) परवानगी मिळणे आगामी काळात कंपनीसाठी आवश्यक असेल. मात्र तूर्तास या व्यवहाराची कागदोपत्री पूर्तता आज होण्याची शक्यता आहे.

शिंडलर इंडियासाठी भारत खूप मोठे इलेक्ट्रिक मार्केट आहे. भारतीय बाजारपेठेत उत्पादनसह वितरणासाठी शिडंलर भारतात आपले बस्तान बसवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या धर्तीवर कंपनीने आपला धोरणात्मक विस्तार करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आगामी काळात शिंडलर इलेक्ट्रिक भारतीय बाजारपेठेत ३ पटीने विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही समजते. यातूनच २०१८ साली कंपनीने टेमासेक कंपनीशी भागीदारी (Partnership) केल्याने सुरू झालेल्या जॉइंट वेचंरने लार्सन अँड टयुब्रोचा इलेक्ट्रिक व ऑटोमेशन व्यवसायाचे अधिग्रहण केले होते. हा करार माहितीनुसार २०२० साली संपुष्टात आला होता.

नवीन वेंचर असलेल्या शिंडलर इलेक्ट्रिक इंडिया कंपनीतील टेमसेक कंपनीचा उर्वरित ३५% हिस्सा मुख्य कंपनी शिंडलर खरेदी करणार आहे. मेक इंडिया व डिजिटल इंडिया प्रकल्पात हातभार लावण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले होते. जा गतिक पातळीवरील शिंडलर कंपनी १८७४ साली स्थापन झाली होती. जी प्रामुख्याने एलिवेटर, लिफ्ट, व तत्सम इलेक्ट्रिक संयंत्रांचे स्वतः उत्पादन व त्यासंबंधी सेवा बाजारात पुरवते. आशियाई बाजारातही शिंडलरने आपला विस्तार करण्याचे ठरविले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >