
मुंबई : परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या योग्य व्यावसायिक दृष्टिकोन आणि कणखर भूमिकेमुळे एसटी महामंडळाची दरवर्षी तब्बल १२ कोटी रुपयांची बचत होणार आहे.
येत्या १ ऑगस्टपासून इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी एसटी महामंडळाला डिझेल इंधनावरील सवलत दरात प्रति लिटर ३० पैशांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दररोज सरासरी ३ लाख २३ हजार रुपये, म्हणजेच वर्षाला अंदाजे ११ कोटी ८० लाख रुपयांची बचत होईल.

गाझा : इस्रायल गाझामध्ये हमास विरोधात लढत आहे. ही लढाई सुरू असताना युरोपमधील देशांनी एक निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे इस्रायलच्या ...
गेली ७० वर्षांहून अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून डिझेल खरेदी करत आहे. सध्या दररोज एसटीला सरासरी १० कोटी ७८ लाख लिटर डिझेल लागते. एसटी महामंडळ या कंपन्यांचा मोठा ग्राहक असल्याने त्यांना प्रति लिटर सवलत मिळत होती. मात्र, वारंवार विनंती करूनही या कंपन्यांनी अनेक वर्षे सवलत दरात बदल केला नव्हता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे संबंधित कंपन्यांनी सवलत दरामध्ये वाढ करण्याचे पाऊल उचलले. यासाठी मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तीन-चार बैठका झाल्या. तसेच, डिझेल इंधन पुरवठा करणाऱ्या इतर खासगी कंपन्यांसोबतही वाटाघाटी करण्यात आल्या. एवढेच नव्हे तर, स्पर्धात्मक निविदा काढण्याची तयारीही ठेवण्यात आली होती.
या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणून, संबंधित कंपन्यांनी सवलत दरात वाढ करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार, १ ऑगस्टपासून मूळ सवलत दरात प्रति लिटर ३० पैशांची वाढ करण्यास या कंपन्यांनी सहमती दर्शवली आहे. सध्या एसटीच्या २५१ आगारांमध्ये असलेल्या पेट्रोल पंपांच्या साहाय्याने दररोज सरासरी १० कोटी ७८ लाख लिटर डिझेल इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमकडून पुरवले जाते. भविष्यात बसेसची संख्या वाढल्याने डिझेलचा वापरही वाढेल. त्यामुळे प्रति लिटर ३० पैसे वाढीव सवलत मिळाल्याने वर्षाकाठी एसटी महामंडळाची अंदाजे १२ कोटी रुपयांची अतिरिक्त बचत होईल.
"एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. अशा परिस्थितीत, जिथे जिथे पैशांची बचत आणि काटकसर करणे शक्य आहे, तिथे ती केली पाहिजे. तसेच, तिकीट विक्रीव्यतिरिक्त उत्पन्नाचे इतर स्रोत देखील निर्माण करणे गरजेचे आहे. अर्थात, या दोन्ही प्रयत्नांतून भविष्यात एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल," असा विश्वास परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.