तुर्की : दक्षिण तुर्कीतील अंतल्या विमानतळावर मंगळवारी (२९ जुलै) रोजी तुर्किश एअरलाइन्सच्या बोईंग ७७७ विमानाला लँडिंग गियरमध्ये धूर आढळल्यानंतर आपत्कालीन स्लाईडद्वारे प्रवाशांना बाहेर काढावे लागले. सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षितपणे बाहेर पडले असून कोणतीही दुखापत झालेली नाही. ही घटना इस्तंबूलवरून आलेले विमान धावपट्टीवर असताना घडली असम त्यावेळी धूर दिसून आला आणि तातडीने विमान रिकामे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
घनदाट जंगलात आणि अंधारातही पाहण्याची क्षमता नवी मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि अमेरिकन अंतराळ संस्था (NASA) यांनी संयुक्तपणे विकसित ...
एअरलाइन्सचे प्रवक्ते याह्या उस्तुन यांनी ‘X’ या सोशल मीडियावर सांगितले की, आपत्कालीन पथकाच्या सल्ल्यानुसार ही कारवाई करण्यात आली. मात्र या घटनेत किती प्रवासी आणि कर्मचारी सहभागी होते, याची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. धुराचे कारण बिघडलेली हायड्रॉलिक पाईपलाइन; विमानाची सखोल तांत्रिक तपासणी सुरू आहे. तुर्किश एअरलाइन्सचे प्रवक्ते याह्या उस्तुन यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासणीत धुराचे कारण बिघडलेली हायड्रॉलिक पाईपलाइन असल्याचे समोर आले आहे. सध्या या बिघाडाचे नेमकं कारण समजण्यासाठी विमानाची सखोल तांत्रिक तपासणी सुरू आहे.
तुर्कीच्या राज्य विमानतळ प्राधिकरणाचे महासंचालक एनेस चाकमाक यांनी ‘X’ वरील पोस्टमध्ये म्हटलंय की, “टॅक्सींग दरम्यान लँडिंग गियरमधून धूर निघताना एअर ट्रॅफिक कंट्रोलरने पाहिले आणि पायलटला कळवले.” ते पुढे म्हणाले, “यानंतर कंट्रोल टॉवर आणि ARFF (Aircraft Rescue and Fire Fighting) युनिट्स यांच्यात त्वरीत समन्वय साधण्यात आला आणि आमच्या टीम्स तातडीने घटनास्थळी पोहोचल्या.”
चाकमाक यांनी ‘X’वर आपत्कालीन पथक लँडिंग गियरवर पाण्याचा मारा करत असल्याचे दृश्य शेअर केले. इतर छायाचित्रांमध्ये आपत्कालीन स्लाईड्स उघडलेल्या दिसतात, तर आणखी एका व्हिडिओमध्ये तपासणीनंतर विमान सुरक्षितपणे टो करून नेले जात असल्याचे पाहायला मिळतंय. ही घटना अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाला लँडिंग गियरच्या बिघाडामुळे लागलेल्या आगीच्या अलीकडच्या घटनेनंतर घडली आहे.
Bugün İstanbul-Antalya seferini gerçekleştiren Türk Hava Yolları’na ait TK-2430 sefer sayılı Boeing 777-300 tipi uçağın inişini müteakip, taksi yolunda ilerlediği sırada iniş takımlarından duman çıktığı hava trafik kontrolörü tarafından fark edilerek pilota bilgi verilmiş;… pic.twitter.com/tgZpIF5fUt
— Enes Çakmak (@ecakmakdhmi) July 29, 2025
प्रवाशांचा अनुभव सकारात्मक
या सुटकेनंतर प्रवाशांनी दिलासा व्यक्त केला आणि कुणालाही दुखापत झाली नाही याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. काही प्रवाशांनी स्लाइड्स आणि जवळ प्रतीक्षा करणाऱ्या विमानतळ कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ व छायाचित्रे ऑनलाईन शेअर केले. अचानक आलेल्या धुरामुळे काळजी वाटली असली तरी कोणतीही गोंधळाची किंवा घाबराटीची स्थिती निर्माण झाली नाही. तुर्किश एअरलाइन्सने प्रभावित प्रवाशांना राहण्याची सोय व पुढील उड्डाणांची बुकिंग व्यवस्था केली. ग्राहक सेवा टीमने SMS व ईमेलद्वारे प्रवाशांना माफी व अद्यतने पाठवली. अनेक प्रवाशांनी म्हटले की भयावह परिस्थिती असूनही क्रूच्या शांत प्रतिसादामुळे त्यांना सुरक्षित वाटले. एका प्रवाशाने या सुटकेचे वर्णन करताना म्हटले, “अनपेक्षित पण सुरळीत झाले, सगळ्यांनी आपले काम नीट केले.” या घटनेने सिद्ध केले की आधुनिक विमान वाहतूक मानकं दुर्मिळ प्रसंगीही जीव वाचवण्यासाठी सक्षम आहेत. तुर्किश एअरलाइन्ससाठी, विशेषतः गर्दीच्या प्रवास हंगामात प्रवाशांचा विश्वास टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. विमानतळाने स्पष्ट केले आहे की विमान पुन्हा सेवेत आणण्यापूर्वी सर्व तपासण्या केल्या जातील.